
Deepu Das Bhaluka Bangladesh murder news
Deepu Das Bhaluka Bangladesh murder News : शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर बांगलादेशात (Bangladesh) सुरू झालेला हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता या आगीत पुन्हा एकदा अल्पसंख्याक हिंदू समाजाला ओढले जात आहे. ‘इन्कलाब मंच’चे प्रवक्ते उस्मान हादी (Osman Hadi) यांच्या निधनाची बातमी येताच बांगलादेशातील विविध शहरांमध्ये कट्टरपंथी गटांनी हैदोस घातला आहे. भालुका परिसरातून समोर आलेल्या एका घटनेने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. येथे एका निष्पाप हिंदू तरुणाला जमावाने केवळ धर्मावरून लक्ष्य करत त्याची क्रूर हत्या केली आहे.
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भालुका येथे राहणाऱ्या दीपू दास या हिंदू तरुणाला कट्टरपंथी जमावाने घेरले. सुरुवातीला त्याला लाथाबुक्क्यांनी आणि काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर क्रूरतेची सीमा ओलांडत, त्याला दोरीने एका झाडाला उलटे टांगण्यात आले. एवढ्यावरच न थांबता, त्या तरुणाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. सोशल मीडियावर या अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेचे व्हिडिओ व्हायरल होत असून, त्यात जमाव जिहादी घोषणा देताना दिसत आहे. या घटनेमुळे बांगलादेशातील हिंदू कुटुंबांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sharif Osman Hadi: एक गोळी डोक्यात लागली आणि ‘तो’ रक्ताच्या थारोळ्यात; उस्मान हादीच्या हत्येमुळे बांगलादेश हिंसाचाराने पेटला
उस्मान हादी हे कट्टरपंथी इस्लामिक संघटना ‘इन्कलाब मंच’चे महत्त्वाचे नेते होते. १२ डिसेंबर रोजी ढाका येथे त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता, ज्यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. १८ डिसेंबर रोजी सिंगापूरमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हादी हे आगामी १२ फेब्रुवारी २०२६ ची निवडणूक लढवणार होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या समर्थकांनी या हत्येचा बदला घेण्याच्या नावाखाली हिंदूंची घरे, दुकाने आणि मंदिरांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.
This is fate of minorities in neighbouring Islamic country. Dipu Chandra Das (30) lynched by majority in Bangladesh.pic.twitter.com/jifeZW1tLq — Dinesh (@FactswithDinesh) December 19, 2025
credit : social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bangladesh Violence: रक्ताने माखला लोकशाहीचा चेहरा! ‘भारतामुळे’ बांगलादेशात पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न; VIDEO VIRAL
मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने शांततेचे आवाहन केले असले तरी, जमिनीवरची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. ढाका आणि चितगावसारख्या मोठ्या शहरांमध्ये हिंदूंना उघडपणे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तोंडावर अशा प्रकारे अल्पसंख्याकांना लक्ष्य करणे, हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक मानले जात आहे. मानवाधिकार संघटनांनी या घटनेचा निषेध केला असून आंतरराष्ट्रीय समुदायाने यामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी केली जात आहे. बांगलादेशातील ही परिस्थिती केवळ एका देशापुरती मर्यादित नसून, दक्षिण आशियातील शांततेसाठी मोठे आव्हान आहे. धर्माच्या नावाखाली होणारा हा नरसंहार थांबवणे आता जागतिक समुदायाची जबाबदारी बनली आहे.
Ans: बांगलादेशातील भालुका येथे दीपू दास या हिंदू तरुणाची कट्टरपंथीयांनी निर्घृण हत्या केली.
Ans: उस्मान हादी हे 'इन्कलाब मंच' या इस्लामिक संघटनेचे प्रवक्ते आणि विद्यार्थी नेते होते, ज्यांचा सिंगापूरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Ans: बांगलादेश निवडणूक आयोगाने १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सार्वत्रिक निवडणुका घेण्याची घोषणा केली आहे.