
pakistan bangladesh flight service resume after 14 years dhaka karachi news 2026
Bangladesh Pakistan direct flight news 2026 : दक्षिण आशियातील राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. गेल्या काही दशकांपासून एकमेकांपासून दुरावलेले पाकिस्तान (Pakistan) आणि बांगलादेश (Bangladesh) आता पुन्हा एकदा जवळ येताना दिसत आहेत. या मैत्रीचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे तब्बल १४ वर्षांनंतर दोन्ही देशांमधील थेट विमान सेवा पुन्हा सुरू झाली आहे. गुरुवारी रात्री उशिरा ‘विमान बांगलादेश एअरलाईन्स’चे पहिले विमान कराचीमध्ये उतरताच पाकिस्तानने त्याचे शाही स्वागत केले. या ऐतिहासिक घटनेमुळे भारताच्या शेजारील देशांच्या समीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गुरुवारी रात्री ८:१५ वाजता ढाका येथील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून निघालेले ‘BG341’ हे विमान रात्री ११:०३ वाजता कराचीच्या जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुखरूप उतरले. १४ वर्षांच्या दीर्घ काळानंतर बांगलादेशी विमान पाकिस्तानच्या भूमीवर उतरल्यामुळे पाकिस्तान विमानतळ प्राधिकरणाने (PAA) विमानाला पारंपारिक ‘वॉटर कॅनन सलामी’ दिली. पाकिस्तानमधील बांगलादेशचे उच्चायुक्त आणि सिंध प्रांतातील बड्या नेत्यांनी या विमानातील प्रवाशांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. विशेष म्हणजे, हे पहिलेच उड्डाण हाऊसफुल्ल (Fully Booked) होते, जे दोन्ही देशांमधील वाढत्या संपर्काचे लक्षण मानले जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia Ukraine war: पुतिन यांनी शब्द दिलाय! ट्रम्प यांचा मंत्रिमंडळ बैठकीत मोठा खुलासा; युक्रेनच्या आकाशात पसरणार शांतता
या विमान सेवेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सिंध प्रांताचे गव्हर्नर कामरान टेसोरी यांनी अत्यंत आक्रमक आणि वादग्रस्त विधान केले. टेसोरी म्हणाले, “आज अनेक वर्षांनंतर दोन्ही देशांविरुद्धचे कट रचणे संपले आहे. मला माहित आहे की बांगलादेशचे लोक पाकिस्तानवर मनापासून प्रेम करतात आणि आता हे प्रेम व्यापार व सहकार्याच्या माध्यमातून अधिक वृद्धिंगत होईल.” यावेळी त्यांनी भारतावर थेट निशाणा साधला. “भारताने दोन्ही देशांमध्ये तूट निर्माण करण्याचे काम केले होते आणि पाकिस्तानमध्ये दहशतवाद पसरवण्यासही भारतच जबाबदार आहे,” असा बिनबुडाचा आरोप त्यांनी केला.
After 14 years, the first direct flight from #Dhaka landed at #Karachi’s Jinnah International Airport, restoring nonstop air connectivity between #Bangladesh & #Pakistan. pic.twitter.com/G5k1k1PiWw
Operated by Biman Bangladesh Airlines, the service is expected to boost travel,… — ⚡️🌎 World News 🌐⚡️ (@ferozwala) January 30, 2026
credit – social media and Twitter
गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशातील सत्तांतरा नंतर भारतासोबतचे संबंध काहीसे ताणलेले आहेत. अशा परिस्थितीत बांगलादेशने पाकिस्तानकडे मैत्रीचा हात पुढे करणे हे जागतिक राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. बांगलादेशचे नागरी विमान वाहतूक सल्लागार शेख बशीरुद्दीन यांनी या सेवेला हिरवा झेंडा दाखवताना सांगितले की, यामुळे दोन्ही देशांमधील पर्यटन आणि व्यापाराला नवीन गती मिळेल. १४ वर्षांपूर्वी काही राजकीय कारणांमुळे ही सेवा बंद करण्यात आली होती, जी आता पुन्हा रुळावर आली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Asteroid 2024 YR4: धोका थेट अवकाशातून! 2032 मध्ये चंद्रावर होणार महाभयंकर भूकंप अन् पृथ्वीवर तासाला लाखो उल्कांचा वर्षाव
तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तान आणि बांगलादेशची ही जवळीक भारतासाठी चिंतेचा विषय ठरू शकते. विशेषतः जेव्हा दोन्ही देशांचे नेते भारतावर आरोप करत आहेत. मात्र, भारताने नेहमीच आपल्या शेजारील देशांशी शांततापूर्ण संबंधांचे समर्थन केले आहे. आता ही नवी विमान सेवा केवळ प्रवाशांची ने-आण करणार की दोन्ही देशांमधील राजकीय ध्रुवीकरण अधिक तीव्र करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Ans: ही सेवा तब्बल १४ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर पुन्हा सुरू झाली आहे.
Ans: त्यांनी असा आरोप केला की, भारताने पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये तूट निर्माण करण्याचे कट रचले होते आणि भारतच दहशतवादाला जबाबदार आहे.
Ans: 'विमान बांगलादेश एअरलाईन्स'ने बांगलादेशची राजधानी ढाका आणि पाकिस्तानचे शहर कराची दरम्यान ही सेवा सुरू केली आहे.