Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Masood Azhar : ‘जिहादसाठी…’ जैशचा दहशतवादी मसूद अझर गडगंज संपत्तीचा मालक; ‘एका’ ऑडिओने पाकिस्तानात मोठी खळबळ

Pakistan News : या ऑडिओमध्ये, मसूद अझहर स्वतःला अत्यंत श्रीमंत असल्याचे सांगतो, जिहादसाठी निधीची कमतरता नसल्याचा दावा करतो आणि एका नवीन जिहादी नेटवर्कमध्ये महिलांना भरती करण्याची योजना उघड करतो.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 17, 2025 | 03:45 PM
india operation sindoor masood azhar audio claims his higher wealth than musk zuckerberg

india operation sindoor masood azhar audio claims his higher wealth than musk zuckerberg

Follow Us
Close
Follow Us:
  • जैश प्रमुख मसूद अझहरचा नवीन ऑडिओ समोर
  • महिला जिहादी नेटवर्कचा खुलासा 
  • भारताच्या ऑपरेशन सिंदूरचा मोठा परिणाम

Masood Azhar wealth claim : भारतात दहशतवादी कारवाया( Terrorist activities) घडवून आणणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या (Jaish-e-Mohammed) प्रमुख मसूद अझहरचे (Masood Azhar) नवे ऑडिओ रेकॉर्डिंग समोर आले असून, त्यात त्याने स्वतःला “जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपेक्षा अधिक संपत्तीचा मालक” असल्याचा विचित्र दावा केला आहे. एलोन मस्क आणि मार्क झुकरबर्ग यांची संपत्तीही माझ्या पुढे काहीच नाही, असे तो सांगताना ऐकू येतो. त्याचा उद्देश, जिहादच्या नावाखाली तरुणांना आकर्षित करणे आणि त्यांना कट्टरवादाच्या मार्गावर ढकलणे असल्याचे दिसते.

ऑपरेशन सिंदूरनंतर वाढलेली धडपड

भारतीय सुरक्षादलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर या महत्त्वाच्या कारवाईनंतर मसूद अझहर आणि त्याची संघटना हादरून गेली आहे. अलीकडेच, दिल्लीतील मोठ्या हल्ल्याचा कट उधळण्यात आला आणि मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली. या कटात सामील असलेला आत्मघाती बॉम्बर डॉ. उमर मोहम्मद हा जैशचा सदस्य असल्याचेही तपासात स्पष्ट झाले. या घटनांनंतर मसूद अझहरने आपले समर्थक एकत्र ठेवण्यासाठी आणि नव्या लोकांना आकर्षित करण्यासाठी या ऑडिओ संदेशांचा वापर सुरू केला आहे, असा सुरक्षा संस्थांचा अंदाज आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sheikh Hasina Death Sentence : ‘ऑडिओ, साक्ष आणि पुरावे…’; अखेर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंडाची शिक्षा

महिला जिहादी नेटवर्क ‘जमात-उल-मोमिनत’चा पर्दाफाश

अलीकडे समोर आलेल्या दुसऱ्या ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे—मसूद अझहरने महिला दहशतवाद्यांचे स्वतंत्र नेटवर्क तयार केल्याचा खुलासा.

या गटाचे नाव आहे ‘जमात-उल-मोमिनत’.

बहावलपूरमधील मरकझ उस्मान ओ अली येथे दिलेल्या भाषणात अझहर महिलांना जिहादसाठी मानसिकरीत्या तयार करण्याची प्रक्रिया स्पष्टपणे सांगताना ऐकू आला. पुरुष दहशतवाद्यांसाठी असणाऱ्या ‘दौरा-ए-तरबियत’ प्रशिक्षणासारखेच महिलांसाठी ‘दौरा-ए-तस्किया’ नावाचा कोर्स ठेवण्यात आल्याचेही त्याने सांगितले. अझहरचे वक्तव्य अधिक धक्कादायक असे की, “या कोर्समध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना मृत्यूनंतर थेट स्वर्गात स्थान मिळेल.” अशा प्रकारच्या भ्रामक आश्वासनाद्वारे तो महिलांना कट्टरवादात खेचण्याचा प्रयत्न करत आहे.

दुसऱ्या टप्प्यात धार्मिक कट्टरवादाचे प्रशिक्षण

प्राथमिक प्रशिक्षणानंतर महिलांना दुसऱ्या टप्प्यात ‘दौरा-ए-आयत-उल-निसा’ या प्रशिक्षणात पाठवले जाईल. येथे त्यांना इस्लामिक ग्रंथांच्या निवडक अर्थांचे ब्रेनवॉशिंग करून जिहादसाठी प्रेरित केले जाईल. या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे महिलांना दहशतवादी कारवायांमध्ये थेट सहभागी करणे आणि त्यांची भूमिकाही पुरुषांइतकीच सक्रिय करणे.भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या मते, हा बदल पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांची नवी रणनीती दर्शवतो, कारण अनेक जुन्या नेटवर्कवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 15 भारतीय स्टार्टअप्स दुबईत चमकणार; Dubai Air Show 2025 मध्ये भारताचे तंत्रज्ञान ठरणार सर्वात मोठे आकर्षण

मसूद अझहरच्या दाव्यांचा उद्देश काय?

सुरक्षा तज्ज्ञांच्या मते,

  • पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय दडपण,
  • भारताच्या यशस्वी ऑपरेशन्समुळे झालेल्या फटक्यांनंतर
    अझहरला आपल्या संघटनेला पुन्हा क्रियाशील ठेवण्यासाठी खोटे दावे करावे लागत आहेत.

जिहादसाठी पैशांची कोणतीही कमतरता नाही, जगातील सर्व संपत्ती त्याच्याजवळ आहे—असे बोलून तो नवे सदस्य आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु सत्य हे की, आंतरराष्ट्रीय निर्बंध, निधीवरची नजर आणि प्रादेशिक दबावामुळे जैश-ए-मोहम्मदची वास्तविक ताकद कमी होत आहे.

भारतीय सुरक्षादल सतर्क

भारतीय एजन्सींनी दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांवर होणारा संभाव्य हल्ला थांबवला असून, यावरून त्यांची दक्षता आणि माहिती संकलन क्षमता सिद्ध झाली आहे. तज्ज्ञ सांगतात की, अझहरचे ऑडिओ हे भारताच्या कारवाईमुळे झालेल्या मोठ्या धक्क्याचे संकेत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मसूद अझरच्या नवीन ऑडिओमध्ये काय दावा करण्यात आला आहे?

    Ans: त्याने स्वतःला मस्क-झुकरबर्गपेक्षा श्रीमंत सांगत जिहादासाठी अमर्याद निधी असल्याचा दावा केला.

  • Que: महिलांसाठी तयार करण्यात आलेले ‘जमात-उल-मोमिनत’ म्हणजे काय?

    Ans: जैशची महिला जिहादी शाखा, जिथे महिलांना प्रशिक्षण देऊन दहशतवादात ढकलले जाते.

  • Que: भारताच्या ऑपरेशन सिंदूरचा जैशवर कोणता परिणाम झाला?

    Ans: मोठे कट उधळले गेले, स्फोटके जप्त झाली आणि जैशची हालचाल मोठ्या प्रमाणात कमकुवत झाली.

Web Title: India operation sindoor masood azhar audio claims his higher wealth than musk zuckerberg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2025 | 03:45 PM

Topics:  

  • international news
  • richest person
  • terrorist

संबंधित बातम्या

ISIS विरुद्ध तुर्कीचे खळखट्याक! New Year ला हल्ल्याचा डाव उधळला; तब्बल 482…
1

ISIS विरुद्ध तुर्कीचे खळखट्याक! New Year ला हल्ल्याचा डाव उधळला; तब्बल 482…

2026 Predictions: रशिया पुन्हा बनणार जगाचा ‘बॉस; अमेरिका भारतासमोर झुकणार? पाहा काय सांगतेय भविष्याची नांदी
2

2026 Predictions: रशिया पुन्हा बनणार जगाचा ‘बॉस; अमेरिका भारतासमोर झुकणार? पाहा काय सांगतेय भविष्याची नांदी

Xu-Bo : 100 मुलांचा बाप आता मस्कच्या घरी सोयरीकेसाठी धडपड; ‘या’ चिनी अब्जाधीशाचा वेडेपणा की वारसाचा अजब ध्यास
3

Xu-Bo : 100 मुलांचा बाप आता मस्कच्या घरी सोयरीकेसाठी धडपड; ‘या’ चिनी अब्जाधीशाचा वेडेपणा की वारसाचा अजब ध्यास

Khaleda Zia: PM मोदींचा ‘तो’ खास संदेश! खालिदा झियांचे सुपुत्र तारिक रहमान व S. Jaishankar यांच्या भेटीने जागतिक राजकारणात खळबळ
4

Khaleda Zia: PM मोदींचा ‘तो’ खास संदेश! खालिदा झियांचे सुपुत्र तारिक रहमान व S. Jaishankar यांच्या भेटीने जागतिक राजकारणात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.