इस्लामाबाद : पाकिस्तानातील सीमा हैदर (Seema Haider) ही भारतातील तरूणाच्या प्रेमापोटी आपला देश सोडून भारतात आली आहे. तिची सध्या चर्चा सुरु असतानाच आता भारतीय असलेल्या अंजू ही पाकिस्तान (Anju in Pakistan) गेल्याचे समोर आले आहे. तिने तिचा धर्म सोडून मुस्लिम धर्म स्वीकारला आहे. त्यामुळे भारताची अंजू आता पाकिस्तानात फातिमा झाली आहे. इतकेच नाहीतर तिन पाकिस्तानच्या नसरुल्लाहशी लग्नही केले आहे.
अंजू आणि नसरुल्लाह यांचा एक व्हिडिओही समोर आला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अंजूचे आधीच भारतात लग्न झालेले असून, तिला दोन मुले आहेत. पाकिस्तानात जाऊन अंजूने नसरुल्लासोबत कोर्ट मॅरेज केल्याचा दावा पाकिस्तानी मीडियामध्ये केला जात आहे. तसेच नसरुल्लासोबत लग्न केल्यानंतर अंजूने मुस्लिम धर्म स्वीकारला आहे. तिने आपले नाव बदलून फातिमा ठेवले आहे. अंजूने नसरुल्लासोबत कोर्ट मॅरेज केल्याचा दावा एका टीव्हीच्या माध्यमातून केला जात आहे.
अंजूने नसरुल्लाहसोबत कोर्ट मॅरेज केले आहे. दोघांनी जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या स्थानिक न्यायालयात लग्न केले आहे. अंजूला पोलिस संरक्षणात नसरुल्लाच्या घरी पाठवले. अंजूचा जन्म यूपीच्या कैलोर गावात झाला. पण लग्नानंतर ती राजस्थानमधील अलवरमध्ये राहत होती. नसरुल्लाह आणि अंजू यांची 2019 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली. त्यानंतर त्यांचे प्रेमसंबंध जुळले.