Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sindh Debate : ‘दिवसा स्वप्नं पाहणं बंद करा’ ; राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर भडकले सिंधचे CM

Sindh Debate : भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या सिंध प्रांतावरील विधानामुळे पाकिस्तानात जळफळाट झाला आहे. सिंध प्रांताचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी राजनाथ सिंह यांच्या विधानावर संताप व्यक्क केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 25, 2025 | 02:51 PM
Indian Defence Minister Rajnath Singh and Sindh Chief Minister Murad Ali Shah

Indian Defence Minister Rajnath Singh and Sindh Chief Minister Murad Ali Shah

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तान-भारतात पुन्हा वाद पेटला
  • सिंध प्रांतावरुन राजनाथ सिंह यांच्या विधानवर संतापले पाकिस्ताने
  • सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांची जोरदार टीका
India-Pakistan Sindh Debate : नवी दिल्ली : भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्या अलीकडील विधानामुळे पाकिस्तानी राजकरणींचा जळफळाट झाला आहे. दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सिंधी समुदायाच्या एका कार्यक्रमात राजनाथ सिंह म्हटले होते की, सिंध हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि भविष्यात सीमा बदलू शकतात. त्यांच्या या विधानानंतर पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Sindh Debate : लवकरच भारत करणार सिंध काबीज? राजनाथ सिंहांच्या ‘अशा’ युद्धप्रेरित धगधगत्या वक्तव्यावर पाकिस्तानचा जळफळाट

मुराद अली शाह यांच्या भारतीय नेत्यांवर उपहासात्मक टीका

सिंध प्रांताचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी राजनाथ यांच्या विधानावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी संरक्षण मंत्र्‍यांच्या विधानाला विसंगत, तथ्यहीन, निराधार आणि कल्पानात्मक म्हटले आहे. मुराद अली शाह यांनी सांगितले आहे की, सिंध हा पाकिस्तानचा भाग आहे, जो त्याची ओळख, भाषा आणि संस्कृतीवर ठाम आहे. मुराद यांनी म्हटले की, भारक केवळ कल्पनेच्या जगातच सिंध प्रांताला आपला भाग मानू शकतो. तसेच त्यांनी भारतीय नेत्यांवर उपहासात्मक टीप्पणी करत, त्यांना दिवसा स्वप्ने पाहणे थांबवण्याचा सल्ला दिला आहे.

सिंध प्रांतावर मुराद यांचा दावा

मुराद अली शाह यांनी दावा केला आहे की सिंध प्रांत १९३६ मध्ये ब्रिटिशांनी बॉम्बे प्रेसीडेंटपासून वेगळा केला होता. यानंतर सिंध प्रांताचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले. पूर्वी पाकिस्तान यामध्ये नव्हता. तसेच सिंध प्रांतात हिंदू लोकसंख्या अधिक होती. पण आता सिंध पाकिस्तानचा भाद आहे.

पाकिस्तानची टीका 

याशिवाय पाकिस्तानने (Pakistan) देखील राजनाथ यांच्या विधानावर कडक शब्दात टीका केली आहे. त्यांनी राजनाथ यांच्या सिंध प्रांतावरील विधानाला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन म्हटले आहे. तसेच भारताच्या दृष्टीकोनाला अस्वीकाहार्य म्हटले आह. पाकिस्तानच्या मते, राजनाथ सिंह यांचे विधान हे विस्तारतावादी आणि हिंदुत्ववादी विचारसरणीचे आहे.

भारत आणि पाकिस्तान तणाव 

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव हा ऐतिहासिक भाग आहे. दोन्ही देशांतील राजकीय, लष्करी, आणि भौगोलिक संबंध अधिक गुंतागुंतीचे आहेत. अशा परिस्थिती सिंध प्रांतावरील राजनाथ सिंह यांचे विधान हे दोन्ही देशात नवा वाद निर्माण करणार आहे. या विधानामुळे पाकिस्तानला धोका जाणवत आहे. पूर्वी पाकिस्तान देखील भारताचाच भाग होता. तेव्हा भारताला हिंदुस्तान या नावाने ओळखले जायचे. पण १९४७ मध्ये इंग्रजांची राजवट संपली हिंदुस्तानची भारत-पाकिस्तान अशी फाळणी झाली. तेव्हापासून आतापर्यंत दोन्ही देशांत तणाव कायमस्वरुपी आहे.

Web Title: Indian defense minister rajnath singh dig comments on pakistan cm murad ali shah

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 02:51 PM

Topics:  

  • Pakistan News
  • Rajnath Singh
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.