
India's 850 kamikaze drones will put the enemy to sleep ₹2,000 crore deal creates panic in Pakistan-China
Indian Army 850 Kamikaze drones deal 2025 : भारताने संरक्षण क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल उचलले असून, आता शत्रू राष्ट्रांना आकाशातूनच चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी पूर्ण केली आहे. भारतीय लष्कराने सुमारे ₹२,००० कोटी खर्च करून ८५० ‘कामिकाझे’ (Kamikaze) म्हणजेच आत्मघाती ड्रोन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या एका निर्णयामुळे सीमावर्ती भागात पाकिस्तान आणि चीनच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. हे ड्रोन केवळ साधे उडणारे यंत्र नसून, ते ‘उडते बॉम्ब’ आहेत, जे शत्रूच्या बंकरमध्ये घुसून स्फोट करण्याची क्षमता ठेवतात.
कामिकाझे ड्रोनना तांत्रिक भाषेत ‘Loitering Munition’ म्हटले जाते. हे ड्रोन एखाद्या क्षेपणास्त्रासारखे काम करतात, पण त्याहीपेक्षा घातक ठरतात. प्रक्षेपण केल्यानंतर हे ड्रोन बराच वेळ आकाशात घिरट्या घालत शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवतात. जसा एखादा बंकर, दहशतवादी तळ किंवा लष्करी वाहन नजरेस पडते, तसे हे ड्रोन थेट त्यावर आदळतात आणि स्वतःसह शत्रूचा नाश करतात. यांचा आकार लहान असल्यामुळे शत्रूच्या रडार यंत्रणेला चकवा देणे यांना सहज शक्य होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Jeffrey Epstein: जगातील सर्वात मोठे स्कँडल! पण ट्रम्पसाठी फाईल्समध्ये दस्तऐवजांची फेरबदल कूटनीती; ‘अनेक’ नावे गुलदस्त्यात
भारतीय लष्कराचा हा निर्णय ‘ऑपरेशन सिंदूर’मधील मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर घेण्यात आला आहे. या ऑपरेशनमध्ये भारतीय ड्रोननी अवघ्या काही तासांत दहशतवाद्यांचे नऊपैकी सात तळ उद्ध्वस्त केले होते. पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देताना ड्रोननी सीमेपलीकडील दहशतवादी मुख्यालयाची अक्षरशः धूळदाण उडवली होती. जेव्हा पाकिस्तानी लष्कर दहशतवाद्यांच्या मदतीला धावून आले, तेव्हा याच ड्रोननी त्यांचेही मोठे नुकसान केले. या विजयाने सिद्ध केले की, भविष्यातील युद्धे जमिनीवर कमी आणि आकाशातून तंत्रज्ञानाच्या जोरावर अधिक लढली जातील.
BIG Indian Army to buy 850 Kamikaze drones worth Rs 2000 crore 🔥 ANI pic.twitter.com/sRVThCthAl — Frontalforce 🇮🇳 (@FrontalForce) December 19, 2025
credit : social media and Twitter
या कराराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व ८५० ड्रोन पूर्णपणे भारतात तयार केले जाणार आहेत. केंद्र सरकारने भारतीय स्टार्टअप्स आणि संरक्षण कंपन्यांना ही मोठी ऑर्डर दिली आहे. लष्कराचे ध्येय केवळ ८५० ड्रोनपर्यंत मर्यादित नाही, तर भविष्यात ३०,००० अशाच प्रकारच्या छोट्या आणि मोठ्या ड्रोनचा ताफा तयार करण्याचे नियोजन आहे. यामुळे दुर्गम पहाडी भागात जिथे आपले सैनिक पोहोचणे कठीण असते, तिथे हे ड्रोन शत्रूचा कर्दनकाळ ठरतील.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Justice For Deepu Das: बांगलादेशातील हिंसेवर मोठी अपडेट! 7 आरोपी गजाआड; थरकाप उडवणारा खुलासा आला समोर
लष्कर आता आपल्या प्रत्येक पायदळ (Infantry) बटालियनला तंत्रज्ञानाने सज्ज करत आहे. प्रत्येक बटालियनमध्ये आता एक विशेष ‘आशानी प्लाटून’ (Ashani Platoon) असेल. या प्लाटूनमधील सैनिकांचे एकमेव काम हे अत्याधुनिक ड्रोन चालवणे आणि त्याद्वारे अचूक हल्ला करणे हे असेल. हे सैनिक शत्रूच्या लपण्याच्या जागा शोधण्यात आणि विशेष मोहिमा पार पाडण्यात तज्ञ असतील. भारतीय लष्करासोबतच नौदल आणि हवाई दलही या तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. चीन आणि पाकिस्तानने भारताच्या या कराराचा धसका घेतला असून, त्यांनीही आपापसात ड्रोन सहकार्यासाठी चर्चा सुरू केली आहे. मात्र, स्वदेशी तंत्रज्ञानामुळे भारताचे पारडे जड राहणार आहे. आकाशातून शत्रूचा मागोवा घेऊन त्यांना कायमचे संपवण्याची ही भारताची ‘न्यू इंडिया’ स्टाईल रणनीती आहे.
Ans: कामिकाझे ड्रोनना 'आत्मघाती ड्रोन' म्हणतात. हे ड्रोन लक्ष्याचा शोध घेऊन थेट त्यावर आदळतात आणि स्फोट करून शत्रूचा नाश करतात.
Ans: भारतीय लष्कराने ८५० ड्रोन खरेदी करण्यासाठी ₹२,००० कोटींच्या कराराला मंजुरी दिली आहे.
Ans: हे ड्रोन रडारला चकवा देऊ शकतात आणि 'ऑपरेशन सिंदूर' सारख्या मोहिमांमध्ये मानवी जीव धोक्यात न घालता शत्रूचे तळ उद्ध्वस्त करण्यास मदत करतात.