एपस्टाईन फाइल्स प्रसिद्ध झाल्या, पण त्या ट्रम्पला वाचवण्यासाठी... सुरू झाला एक नवीन वाद ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Jeffrey Epstein files release December 2025 : अमेरिकेच्या (America) इतिहासातील सर्वात वादग्रस्त आणि रहस्यमयी प्रकरणांपैकी एक असलेल्या ‘जेफ्री एपस्टाईन’ (Jeffrey Epstein) प्रकरणाने पुन्हा एकदा जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि राजकीय ओढाताणीनंतर, अमेरिकेच्या न्याय विभागाने या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांचा पहिला संच सार्वजनिक केला आहे. मात्र, या फाईल्स बाहेर येताच पारदर्शकतेपेक्षा वादाचे वादळ अधिक निर्माण झाले आहे. या कागदपत्रांमध्ये जगातील काही सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या नावांचा उल्लेख असल्याने खळबळ उडाली आहे.
अब्जाधीश जेफ्री एपस्टाईन हा अल्पवयीन मुलींच्या लैंगिक तस्करीच्या रॅकेटचा मास्टरमाईंड होता. २०१९ मध्ये न्यू यॉर्कच्या तुरुंगात त्याचा संशयास्पद मृत्यू झाला (ज्याला अधिकृतपणे आत्महत्या म्हटले गेले). एपस्टाईनचे संबंध जगातील राजकारणी, सेलिब्रिटी आणि बड्या उद्योगपतींशी होते. नुकताच ‘एपस्टाईन फाइल्स पारदर्शकता कायदा’ संमत करण्यात आला, ज्यानुसार १९ डिसेंबर ही ही कागदपत्रे सार्वजनिक करण्याची अंतिम तारीख होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या प्रचारादरम्यान या फाईल्स पूर्णपणे उघड करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु आता प्रसिद्ध झालेल्या फाईल्समुळे नवा राजकीय वाद सुरू झाला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Release The Files : अमेरिकेचा सत्तेच्या पडद्यामागील ‘डर्टी गेम’! ‘Epstein Files’ जगासमोर येताच गळून पडणार ‘अनेक’ प्रख्यात मुखवटे
प्रसिद्ध झालेल्या फाइल्समध्ये काही धक्कादायक फोटो आणि नोंदी आहेत: १. बिल क्लिंटन यांचे फोटो: एका फोटोमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन ‘हॉट टब’ मध्ये दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये ते एपस्टाईनची सहकारी घिसलेन मॅक्सवेल हिच्यासोबत पोहताना दिसत आहेत. २. सेलिब्रिटींची नावे: पॉप स्टार मायकल जॅक्सन, मिक जॅगर, वुडी ॲलन आणि प्रसिद्ध विचारवंत नोम चॉम्स्की यांची नावे आणि फोटो या कागदपत्रांमध्ये समोर आले आहेत. ३. डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव: ट्रम्प यांचे नाव ‘फ्लाइट लॉग्स’ आणि संपर्क पुस्तकांमध्ये आहे. मात्र, तपासात असे दिसून आले की ट्रम्प आणि एपस्टाईन यांचे संबंध १९९० च्या दशकात होते आणि नंतर ते संपुष्टात आले होते.
Epstein files dropped via DOJ after Trump urged release + AG Pam Bondi’s Transparency Act deadline. BIG NB: docs are real, but Epstein’s email claims are unverified. They don’t allege Trump wrongdoing—only mention him. No law enforcement records tie Trump to Epstein crimes. pic.twitter.com/TRnh5MzfWx — Comedy Threads (@Abiaonline1) December 20, 2025
credit : social media and Twitter
या फाईल्स सार्वजनिक करण्यात आल्या असल्या तरी, टीकाकारांच्या मते यात प्रचंड “सेन्सॉरशिप” (Redaction) करण्यात आली आहे. फाईल्समधील २५४ महिला मालिश करणाऱ्यांची यादी असलेली पाने पूर्णपणे काळ्या रंगाने लपवण्यात आली आहेत. न्याय विभागाने सुरक्षेचे कारण दिले असले तरी, डेमोक्रॅटिक नेत्यांनी आरोप केला आहे की ट्रम्प सरकार आपल्या सोयीची नावे लपवत आहे. सिनेट नेते चक शुमर यांनी याला “निवडक पारदर्शकता” म्हटले असून, ट्रम्प यांना त्यांच्या भूतकाळातील संबंधांपासून वाचवण्यासाठी हे केले जात असल्याचा आरोप केला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIRAL: ‘सेक्स टॉय ते काँडोम..’ Epstein Files फोटोंनी जगभरात आश्चर्याचा स्फोट; अमेरिकेत ट्रम्पसोबत सर्वच दिग्गज वादाच्या भोवऱ्यात
एपस्टाईनकडे त्याच्या ‘क्लायंट्स’ची यादी होती का? तो या बड्या लोकांना ब्लॅकमेल करत होता का? हे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. जुलैमध्ये एफबीआयने एका मेमोत म्हटले होते की एपस्टाईनकडे अशी कोणतीही अधिकृत क्लायंट लिस्ट नव्हती. मात्र, आता समोर आलेल्या कागदपत्रांमुळे लोकांचा संशय अधिक बळावला आहे. जरी नाव किंवा फोटो असणे हा गुन्ह्याचा पुरावा नसला, तरी नैतिकतेच्या पातळीवर या जागतिक नेत्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पुढील काही आठवड्यांत लाखो अतिरिक्त कागदपत्रे सार्वजनिक केली जाणार आहेत. या प्रकरणातील गुपिते जशी बाहेर येतील, तशी अमेरिकेच्या राजकारणातील समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Ans: या फाईल्स लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टाईनच्या तपासाशी संबंधित असून, त्यात त्याच्याशी संबंधित उच्च-प्रोफाइल व्यक्तींच्या भेटीगाठी आणि व्यवहारांच्या नोंदी आहेत.
Ans: हे दोन्ही नेते १९९० च्या दशकात एपस्टाईनच्या सामाजिक वर्तुळात होते, त्यामुळे त्यांचे नाव फ्लाइट लॉग्स आणि फोटोंमध्ये आढळून आले आहे.
Ans: अमेरिकेच्या न्याय विभागाच्या मते, पीडितांची ओळख जपणे आणि चालू तपासाची गोपनीयता राखण्यासाठी काही संवेदनशील माहिती लपवण्यात आली आहे.






