India's ally finds oil twice Saudi's size a new war looms
Guyana‑scale oil discovery : रशियाच्या शास्त्रज्ञांनी अंटार्क्टिकामधील वेडेल समुद्राखाली तब्बल 511 अब्ज बॅरल तेलसाठ्याचा शोध लागल्याचा दावा केला असून, यामुळे संपूर्ण जागतिक ऊर्जा राजकारणात खळबळ उडाली आहे. सौदी अरेबियाच्या तुलनेत जवळपास दुप्पट प्रमाणात काळ्या सोन्याचे हे भांडार असल्याने, ही बाब केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनातून नव्हे, तर राजनैतिक आणि सामरिकदृष्ट्याही अतिशय संवेदनशील ठरत आहे.
या दाव्यानुसार, वेडेल समुद्राखालील तेलसाठा जगात आतापर्यंत ज्ञात असलेल्या सगळ्यात मोठ्या साठ्यांपेक्षा अधिक आहे. अहवालानुसार, या क्षेत्रातील साठा उत्तर समुद्राच्या ५० वर्षांच्या उत्पादनाच्या १० पट आहे आणि सौदी अरेबियाच्या साठ्यांपेक्षा दुप्पट. त्यामुळे यामुळे जागतिक ऊर्जा राजकारणात नवा ध्रुव उदयास येण्याची चिन्हं आहेत.
वेडेल समुद्र हे अंटार्क्टिकामधील ‘ब्रिटिश क्लेम्ड टेरिटरी’चा भाग आहे. यावर युकेसोबतच अर्जेंटिना आणि चिली यांचेही प्रादेशिक दावे आहेत. रशियाने या भागात तेल सापडल्याचा दावा केल्यानंतर हे तिढे अधिक गुंतागुंतीचे बनले आहेत. या साठ्यांवर हक्क सांगण्यासाठी आगामी काळात नवे राजनैतिक संघर्ष उद्भवण्याची शक्यता आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 3500 वर्षांपूर्वीचे हरवलेले शहर सापडले! पेरूमधील ‘पॅनिको’चा शोध म्हणजे कॅरल संस्कृतीतील ऐतिहासिक क्रांती
1959 मध्ये झालेला ‘अंटार्क्टिक करार’ हा अंटार्क्टिक खंड फक्त वैज्ञानिक आणि शांततामूलक हेतूंसाठी वापरण्याचे बंधन घालतो. या करारानुसार कोणताही देश अंटार्क्टिकामधील नैसर्गिक संसाधनांचा व्यावसायिक वापर करू शकत नाही. मात्र, रशियाचे अलीकडील संशोधन आणि हालचाली या कराराच्या भावनेविरुद्ध असल्याचे मानले जात आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, वैज्ञानिक संशोधनाच्या नावाखाली तेलसाठ्यांचा शोध घेणे म्हणजे अप्रत्यक्ष उल्लंघन आहे.
रशिया-युक्रेन युद्धानंतर आधीच रशिया आणि पाश्चिमात्य देशांमध्ये तणावाच्या लाटा उसळल्या आहेत. अशावेळी अंटार्क्टिकात सापडलेला तेलसाठा नवा संघर्ष निर्माण करणारा मुद्दा ठरू शकतो. नाटो देश आणि अमेरिका यांना भीती आहे की रशिया अंटार्क्टिकाचा वापर ऊर्जा वर्चस्व आणि सामरिक दबावासाठी करेल.
अंटार्क्टिकात चीनने आधीच ५ वैज्ञानिक तळ उभारले असून, त्याच्या संशोधन आणि धोरणात्मक हालचाली पाश्चिमात्य देशांमध्ये चिंता निर्माण करत आहेत. रशिया आणि चीनमध्ये वाढणाऱ्या सामरिक भागीदारीच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही देश अंटार्क्टिक कराराला थेट आव्हान देऊ शकतात, असे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. यामुळे एक नवी जागतिक ‘ध्रुवीय शीतयुद्ध’ सुरू होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
भारताने अंटार्क्टिक संशोधनात आपले स्थान बळकट केले असले तरी, या संभाव्य संघर्षामुळे भारतासारख्या उभरत्या शक्तींना धोरणात्मक पुनर्रचना करावी लागेल. रशियाचा पारंपरिक मित्र देश म्हणून भारतासाठी हे आव्हान संधी आणि चिंता अशा दोन्ही रूपात समोर येऊ शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : आता ‘या’ दोन महासत्ता ठरणार मोठ्या महाविनाशामागचे कारण? आता NATO प्रमुखांचेही याबाबत गंभीर भाकीत
रशियाने केलेला तेलसाठ्यांचा दावा केवळ वैज्ञानिक यश नव्हे, तर जागतिक राजकारणाच्या पटावरील मोठा हलवून टाकणारा चाल ठरू शकतो. अंटार्क्टिका कराराच्या चौकटीत राहून संसाधनांवर नियंत्रण ठेवणे ही आता सर्व देशांसाठी मोठी कसोटी ठरणार आहे. अशा परिस्थितीत, जगाला एक नवीन ध्रुवीय संघर्ष आणि सामरिक स्पर्धा पाहावी लागणार का, हे येणारा काळच ठरवेल.