Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pakistani Terrorist : मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी अब्दुल रहमान मक्कीचा मृत्यू…

दहशतवादी अब्दुल रहमान मक्की याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. 2003 मध्ये, संयुक्त राष्ट्रांनी मक्कीला जागतिक दहशतवादी घोषित केले होते, तो लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख आणि दहशतवादी हाफिज सईदचा मेहुणा होता.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Dec 27, 2024 | 02:12 PM
India's enemy terrorist Abdul Rehman Makki dies of heart attack

India's enemy terrorist Abdul Rehman Makki dies of heart attack

Follow Us
Close
Follow Us:

इस्लामाबाद : मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज अब्दुल रहमान मक्की याचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे त्यांचे निधन झाले. मक्कीचे जमात-उद-दावा कमांडर हाफिज सईदशी जवळचे संबंध होते आणि तो त्याचा मेहुणा होता. हाफिज सदाईने अब्दुल रहमान मक्की याला जमात उद दावाचा उपप्रमुख बनवले होते. जमात उद दावानेही मक्कीच्या मृत्यूची पुष्टी करणारे निवेदन जारी केले आहे. मक्की गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याचे दहशतवादी संघटनेचे म्हणणे आहे. त्यांचा मधुमेह वाढल्याने त्यांना उपचारासाठी लाहोरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याच दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.

जमात-उद-दावाने म्हटले आहे की, मक्कीला शुक्रवारी सकाळी हृदयविकाराचा झटका आला आणि लाहोरमधील एका खासगी रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. त्याच्यावर कारवाई करण्याची भारताकडून सातत्याने मागणी होत होती आणि पाकिस्तानकडून त्याच्या हवाली करण्याच्या अनेक मागण्या होत्या. त्यानंतरही पाकिस्तान हाफिज सईद आणि त्याच्या समर्थकांना प्रोत्साहन देत आहे. हे लोक पाकिस्तानात केवळ दहशतवादी कारवाया करत नाहीत तर दहशतवादासाठी निधीही गोळा करत आहेत. ते केवळ दिखाव्यासाठी असले तरी, खूप दबावानंतर, पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने 2020 मध्ये अब्दुल रहमान मक्की यांना 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याच्या आरोपावरून मक्की यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘साधी राहणी, उच्च विचारसरणी’ असा होता भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा जीवनप्रवास

संयुक्त राष्ट्रांनी मक्कीला जागतिक दहशतवादी घोषित केले होते

2003 मध्ये, संयुक्त राष्ट्रांनी मक्कीला जागतिक दहशतवादी घोषित केले होते, तो लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख आणि दहशतवादी हाफिज सईदचा मेहुणा होता. लष्कराचा वॉन्टेड दहशतवादी हाफिज अब्दुल रहमान मक्की यांचा पाकिस्तानमध्ये मृत्यू झाला आहे. मक्की हा लष्कर-ए-तैयबा (एलईटी)चा उपप्रमुख आणि हाफिज मोहम्मद सईदचा नातेवाईक होता. वृत्तानुसार, मक्कीच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे. 2023 मध्ये, मक्कीला संयुक्त राष्ट्रांनी जागतिक दहशतवादी घोषित केले होते, ज्या अंतर्गत त्याची संपत्ती जप्त करण्यात आली होती. याशिवाय मक्कीवर प्रवास आणि शस्त्रास्त्रांवर निर्बंध लादण्यात आले होते.

हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला

हाफिज अब्दुल रहमान मक्की यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तो मुंबई हल्ल्याचा सूत्रधार, दहशतवादी हाफिज सईदचा मेहुणा आणि प्रतिबंधित जमात-उद-दावाचा उपप्रमुख होता. जमात-उद-दावा (JUD) च्या म्हणण्यानुसार, अब्दुल रहमान मक्की हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते आणि त्यांच्यावर लाहोरमधील एका खाजगी रुग्णालयात उच्च मधुमेहावर उपचार सुरू होते, ‘मक्का यांना आज सकाळी हृदयविकाराचा झटका आला आणि रुग्णालयात मृत्यू झाला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : LAC वरील गतिरोध संपवण्याच्या करारानंतरही तिथे काय करत आहे चिनी सैन्य? भारताचे ड्रॅगनला प्रत्युत्तर

टेरर फंडिंग प्रकरणात 6 महिन्यांची शिक्षा झाली होती

जेयूडी प्रमुख हाफिज सईदचा मेहुणा मक्की याला पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने 2020 मध्ये टेरर फंडिंग प्रकरणात 6 महिन्यांची शिक्षा सुनावली होती. मिळालेल्या माहितीनुसार, टेरर फंडिंग प्रकरणात शिक्षा सुनावल्यानंतर मक्कीने आपल्या हालचाली कमी केल्या होत्या. पाकिस्तान मुताहिदा मुस्लिम लीग (PMML) ने एका निवेदनात म्हटले आहे की मक्की हे पाकिस्तानी विचारसरणीचे समर्थक होते.

 

Web Title: Indias enemy terrorist abdul rehman makki dies of heart attack nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2024 | 02:05 PM

Topics:  

  • Lashkar-e-Taiba terrorist

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.