Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World War3: जगाचा अंत जवळ? Iran-Israel युद्धाने ओलांडल्या सर्व मर्यादा; 6 शहरांत मिसाईल्सचा थरार, इराणचा निशाणा नेतन्याहू-ट्रम्प

IranI srael War: मध्यपूर्वेत सुरू झालेले युद्ध आता अधिक तीव्र युद्धाकडे वाटचाल करत आहे. इस्रायलच्या सततच्या हल्ल्यांनंतर, इराणनेही आता आपली तयारी पूर्ण केली आहे. इराणच्या सरकारी प्रवक्त्याने इस्रायलला आव्हान दिले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Feb 28, 2026 | 02:13 PM
iran israel war 2026 threat to netanyahu trump tehran bombing updates

iran israel war 2026 threat to netanyahu trump tehran bombing updates

Follow Us
Follow Us:
  • इराणचे थेट आव्हान
  • ६ शहरांवर भीषण हल्ले
  • आणीबाणी जाहीर

Iran Israel War live updates 2026 : मध्यपूर्वेतील संघर्षाने आता एका अत्यंत भयानक युद्धाचे रूप धारण केले आहे. इस्रायलने इराणवर(Iran-Israel War) केलेल्या विनाशकारी हवाई हल्ल्यानंतर इराणच्या सरकारी प्रवक्त्याने संपूर्ण जगासमोर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Israeli Prime Minister Benjamin Netanyahu) आणि अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांना उघड धमकी दिली आहे. “तुम्ही युद्ध सुरू करण्याचे धाडस केले आहे, पण आता हे युद्ध कधी आणि कसे संपवायचे हे आम्ही ठरवू,” या इराणच्या विधानाने तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडल्याचे संकेत मिळत आहेत. इराणमधील अनेक शहरांत सध्या धुराचे लोट आणि स्फोटांचे आवाज ऐकू येत असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे.

तेहरानसह ६ प्रमुख शहरे इस्रायली हल्ल्याने हादरली!

आज पहाटेपासूनच इस्रायली लढाऊ विमानांनी इराणच्या हवाई हद्दीत घुसून एकापाठोपाठ एक भीषण हल्ले केले. राजधानी तेहरान हे मुख्य लक्ष्य होते. सूत्रांनुसार, राष्ट्रपती निवासस्थानाच्या अगदी जवळ असलेल्या लष्करी प्रतिष्ठानांवर आणि इराणच्या शक्तिशाली गुप्तचर संस्थांवर (Intelligence Agencies) अचूक बॉम्बफेक करण्यात आली आहे. केवळ तेहरानच नव्हे, तर इराणमधील इतर पाच मोठ्या शहरांमध्येही अशाच प्रकारचे हल्ले झाल्याचे वृत्त आहे. अनेक सरकारी इमारती आणि सुरक्षा तळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून इराणमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: इराणचा सूर्य मावळणार? अमेरिकन शक्तीसह इस्रायलचा इराणवर क्षेपणास्त्र महाप्रहार; खामेनींचा राजवाडा, तेहरानही मातीमोल

अणु चर्चा रखडली आणि युद्धाचा भडका उडाला!

हे हल्ले अशा वेळी झाले आहेत जेव्हा अमेरिका आणि इराणमध्ये ‘न्यूक्लियर डील’बाबत चर्चा सुरू होती. अमेरिकेचा आग्रह आहे की इराणने आपले युरेनियम समृद्धीकरण पूर्णपणे थांबवावे, तर इराणने या अटी फेटाळून लावल्या आहेत. या राजनैतिक वादाचे रूपांतर आता लष्करी संघर्षात झाले आहे. इराणचे म्हणणे आहे की त्यांचा अणुकार्यक्रम शांततेसाठी आहे, परंतु इस्रायल आणि अमेरिकेला इराणची ही वाढती शक्ती धोक्याची वाटत आहे. परिणामी, ट्रम्प प्रशासनाच्या सक्रिय पाठिंब्याने इस्रायलने इराणला मुळासकट उपटून टाकण्याची मोहीम सुरू केली आहे.

Iran Military Says : Dear Americans, Your president is Netanyahu, and Trump is his puppet pic.twitter.com/dl8Lq0RpPl — Durgesh Shukla (@mydurgeshshukla) February 28, 2026

credit – social media and Twitter

इस्रायलमध्ये हाय अलर्ट आणि आणीबाणीची घोषणा

इराणकडून होणाऱ्या संभाव्य प्रतिहल्ल्याच्या भीतीने इस्रायल सरकारने संपूर्ण देशात आणीबाणीची स्थिती जाहीर केली आहे. नागरिकांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे, असे सांगत नेतन्याहू सरकारने शाळा, महाविद्यालये आणि अनावश्यक खाजगी कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. इस्रायली लष्कराने (IDF) आपल्या ‘आयर्न डोम’ आणि इतर संरक्षण प्रणालींना हाय अलर्टवर ठेवले आहे. इराण कधीही बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी इस्रायलवर हल्ला करू शकतो, असा इशारा गुप्तचर संस्थांनी दिला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Attacks Iran: युद्ध पेटले! इस्रायलचा इराणवर विध्वंसक युद्धजन्य हल्ला; तेहरानमध्ये स्फोटांची मालिका अन् आकाशात धुराचे लोट

जागतिक परिणाम आणि धोक्याची घंटा

इराणच्या प्रवक्त्याने दिलेली धमकी ही केवळ पोकळ घोषणा नसून, ती इराणच्या बदललेल्या लष्करी रणनीतीचे प्रतीक आहे. जर इराणने प्रत्युत्तर दिले, तर या युद्धात अमेरिका देखील थेट सामील होऊ शकते. यामुळे खनिज तेलाचे भाव गगनाला भिडू शकतात आणि जागतिक अर्थव्यवस्था कोलमडू शकते. सध्या तेहरानच्या रस्त्यांवर लष्कराचा कडक पहारा असून, इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांनीही लष्कराला ‘आरपार’च्या लढाईचे आदेश दिल्याचे समजते.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने इस्रायल आणि अमेरिकेला नेमकी काय धमकी दिली आहे?

    Ans: इराणने म्हटले आहे की, इस्रायल आणि अमेरिकेने हे युद्ध सुरू केले असले तरी, त्याचा शेवट इराण आपल्या पद्धतीने करेल आणि तो अत्यंत विनाशकारी असेल.

  • Que: इस्रायलने इराणमधील कोणत्या ठिकाणांना लक्ष्य केले आहे?

    Ans: इस्रायलने तेहरानसह ६ शहरांमधील लष्करी तळ, गुप्तचर संस्थांचे मुख्यालय आणि राष्ट्रपती निवासस्थानाजवळच्या भागांवर हवाई हल्ले केले आहेत.

  • Que: या युद्धाचा जागतिक बाजारावर काय परिणाम होईल?

    Ans: या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होण्याची आणि जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे.

Web Title: Iran israel war 2026 threat to netanyahu trump tehran bombing updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • Iran-Israel War

संबंधित बातम्या

Diet Coke Price Hike: मिडल ईस्टच्या युद्धाचा डाएट कोकवरही परिणाम? भारतात दर वाढले, नेमकं दरामागील गणित काय?
1

Diet Coke Price Hike: मिडल ईस्टच्या युद्धाचा डाएट कोकवरही परिणाम? भारतात दर वाढले, नेमकं दरामागील गणित काय?

पुन्हा पसरली झोळी! पाकिस्तानने अमेरिकेकडे केली 96000 कोटी रुपयांची मोठी मागणी; काय आहे आता नवा प्लॅन?
2

पुन्हा पसरली झोळी! पाकिस्तानने अमेरिकेकडे केली 96000 कोटी रुपयांची मोठी मागणी; काय आहे आता नवा प्लॅन?

Rupee vs Dollar: रुपया पुन्हा घसरला, डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर! पण ही अवस्था का?
3

Rupee vs Dollar: रुपया पुन्हा घसरला, डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर! पण ही अवस्था का?

Mojtaba Khamenei इराणमध्ये नाहीतच? इस्रायली सुरक्षा अधिकाऱ्याचा दावा; वडिलांच्या अंत्यविधीलाही न जाण्यामागचे रहस्य उघड
4

Mojtaba Khamenei इराणमध्ये नाहीतच? इस्रायली सुरक्षा अधिकाऱ्याचा दावा; वडिलांच्या अंत्यविधीलाही न जाण्यामागचे रहस्य उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.