
iran missile attack on dimona little india israel marathi community safety
Iran Missile Attack Little India Dimona Israel 2026 : मध्य-पूर्वेतील युद्ध (US-Israel Iran War) आता अशा वळणावर आले आहे जिथे केवळ इस्रायलच नाही, तर तिथे राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. शनिवारी रात्री इराणने इस्रायलवर केलेल्या भीषण क्षेपणास्त्र हल्ल्याने संपूर्ण जगाला हादरवून सोडले. पण या हल्ल्याची सर्वात भयानक झळ बसली ती ‘दिमोना’ (Dimona) या शहराला. या शहराला इस्रायलचं ‘लिटल इंडिया’ म्हटलं जातं. इथल्या गल्ल्यांमध्ये मराठी ऐकू येते, भारतीय पदार्थ मिळतात आणि भारताशी घट्ट नातं असलेले लोक राहतात. इराणच्या एका क्षेपणास्त्राने या शांत शहराचे रूपांतर स्मशानशांततेत केले आहे.
Video footage from inside a home in Dimona, Southern Israel, shows the moment that an Iranian medium-range ballistic missile struck a nearby residential area of the city, resulting in injured to at least 54. pic.twitter.com/H9DPdO4zJI — OSINTdefender (@sentdefender) March 21, 2026
credit – social media and Twitter
दिमोना हे शहर इस्रायलमधील भारतीय-ज्यू समुदायाचे मुख्य केंद्र आहे. विशेषतः महाराष्ट्रातील कोकण आणि मुंबई भागातून गेलेले ‘बेने इस्रायली’ ज्यू येथे मोठ्या संख्येने स्थायिक आहेत. येथील बाजारपेठांमध्ये भारतीय दुकाने आहेत आणि अनेक घरांमध्ये आजही मराठी संस्कृती जपली जाते. इराणने या शहराला लक्ष्य करणे म्हणजे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारतीय समुदायाला जखम देण्यासारखे आहे. हल्ल्याच्या वेळी अनेकांना आपल्या कुटुंबातील लोकांशी संपर्क साधता आला नाही, ज्यामुळे भारतात असलेल्या त्यांच्या नातेवाईकांमध्येही घबराट पसरली आहे.
Footage shows the moment an Iranian ballistic missile struck the southern city of Dimona this evening. pic.twitter.com/fCYwtgAj5x — Emanuel (Mannie) Fabian (@manniefabian) March 21, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Vs UAE: इराणने संयुक्त अरब अमिरातीला का धाडलंय नुकसानभरपाईचं पत्र? मध्य-पूर्वेतील युद्धाला आता ‘कायदेशीर’ वळण
दिमोना हे केवळ एक शहर नाही, तर ते इस्रायलचे ‘अणु शहर’ मानले जाते. शहरापासून अवघ्या १३ किमी अंतरावर इस्रायलचे अत्यंत गोपनीय ‘नेगेव्ह अणुकेंद्र’ आहे. इराणची क्षेपणास्त्रे या केंद्राच्या इतक्या जवळ पोहोचणे, ही इस्रायलसाठी धोक्याची घंटा आहे. इस्रायलची ‘ॲरो’ (Arrow) आणि ‘डेव्हिड्स स्लिंग’ ही संरक्षण यंत्रणा इराणची जड स्फोटके असलेली क्षेपणास्त्रे रोखू शकली नाहीत. एक क्षेपणास्त्र थेट निवासी भागात कोसळले, ज्यामध्ये एका १२ वर्षांच्या चिमुकल्यासह ४७ जण जखमी झाले.
CCTV footage captures the moment the Iranian missile struck its target in Dimona. Follow Press TV on Telegram: https://t.co/LWoNSpkc2J pic.twitter.com/KBMeclFa8m — Press TV 🔻 (@PressTV) March 21, 2026
credit – social media and Twitter
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या घटनेला ‘कठीण संध्याकाळ’ असे संबोधले आहे. निवासी इमारतींच्या मध्ये क्षेपणास्त्र पडल्यामुळे लोकांच्या घरांच्या काचा फुटल्या, भिंती कोसळल्या आणि लोक सैरावैरा धावू लागले. इराणने दावा केला आहे की, इस्रायलचे आकाश आता पूर्णपणे असुरक्षित झाले आहे. दुसरीकडे, इस्रायलने याला ‘नागरी वस्तीवरील भ्याड हल्ला’ म्हटले असून, याचा बदला घेण्याची घोषणा केली आहे.
More footage showing an interceptor trying yet failing to down and the resulting impact of an Iranian ballistic missile earlier in the Southern Israeli city of Dimona. pic.twitter.com/L17NnVwBBo — OSINTdefender (@sentdefender) March 21, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Alert : लंडन, पॅरिस, बर्लिन इराणच्या क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात; ‘या’ हल्ल्याची झळ भारतालाही, इस्रायलने जगाला का केलं अलर्ट?
दिमोनामध्ये राहणारे लोक जरी इस्रायली नागरिक असले, तरी त्यांचे मूळ भारतात आहे. तिथे आजही मराठी भाषा बोलली जाते. या हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये अनेक भारतीय वंशाचे लोक असण्याची शक्यता आहे. इस्रायलमधील परराष्ट्र मंत्रालयाने इराणवर जाणीवपूर्वक नागरी वस्तीला लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे, ज्यामुळे या युद्धाला आता अधिक हिंसक वळण मिळण्याची शक्यता आहे.
🚨 INSANE FOOTAGE CAPTURES THE MOMENT AN IRANIAN BALLISTIC MISSILE SLAMS INTO THE SOUTHER ISRAELI CITY OF DIMONA https://t.co/HULEh4bKhA pic.twitter.com/zBsekUSP3U — Breaking911 (@Breaking911) March 22, 2026
credit – social media and Twitter
Ans: इस्रायलमधील दिमोना (Dimona) या शहराला 'लिटल इंडिया' म्हटले जाते, कारण येथे भारतीय-ज्यू समुदाय मोठ्या संख्येने राहतो.
Ans: दिमोना हे शहर इस्रायलच्या मुख्य अणुकेंद्राजवळ (Shimone Peres Negev Nuclear Center) असल्याने इराणने सामरिकदृष्ट्या या भागावर हल्ला केला.
Ans: प्राथमिक माहितीनुसार, या हल्ल्यात ४७ जण जखमी झाले असून, अनेकांची प्रकृती गंभीर आहे. सुदैवाने अद्याप कोणत्याही मृत्यूची अधिकृत नोंद नाही.