डिएगो गार्सिया हल्ल्यानंतर इस्रायलचा इशारा: लंडन, पॅरिस, बर्लिन इराणच्या क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात; 'या' हल्ल्याची झळ भारतालाही पोहोचली ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Iran Missile Range 4000km London Paris Berlin : मध्य-पूर्वेतील संघर्ष (US-Israel Iran War) आता केवळ प्रादेशिक राहिला नसून त्याने जागतिक युद्धाचे रूप धारण केले आहे. हिंद महासागरातील अमेरिका आणि ब्रिटनचा अत्यंत महत्त्वाचा लष्करी तळ असलेल्या ‘डिएगो गार्सिया’ (Diego Garcia) वर इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याने पाश्चात्य जगाच्या झोपा उडवल्या आहेत. या हल्ल्याने हे सिद्ध केले आहे की, इराणकडे आता अशी शस्त्रे आहेत जी केवळ इस्रायलच नाही, तर संपूर्ण युरोप आणि भारताच्या काही भागांनाही उद्ध्वस्त करू शकतात.
डिएगो गार्सिया हा तळ इराणपासून सुमारे ३,८०० किलोमीटर अंतरावर आहे. आतापर्यंत जगाला वाटत होते की इराणच्या क्षेपणास्त्रांचा पल्ला फक्त २,००० किलोमीटरपर्यंत मर्यादित आहे. मात्र, शनिवारी इराणने दोन टप्प्यांची आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे (ICBM) डागून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. जरी ही क्षेपणास्त्रे अमेरिकेने हवेतच नष्ट करण्याचा प्रयत्न केला असला, तरी इराणने आपली ‘रीच’ (पोहोच) जगाला दाखवून दिली आहे. इस्रायली लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल आयल झमीर यांनी स्पष्ट केले आहे की, हे तंत्रज्ञान युरोपातील प्रमुख राजधान्यांसाठी थेट मृत्यूचा सापळा ठरू शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: 24 मार्चला होणार महायुद्ध? 48 तासांचा काऊंटडाऊन सुरु; ट्रम्पची अट न मानल्यास इराणमध्ये पसरणार अंधाराचे साम्राज्य
इस्रायली संरक्षण दलाने (IDF) ‘X’ वर एक नकाशा शेअर केला आहे, जो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या नकाशात इराणच्या नव्या क्षेपणास्त्रांचा ४,००० किमीचा पल्ला दाखवण्यात आला आहे. या पल्ल्यात लंडन, पॅरिस, बर्लिन, रोम आणि माद्रिद यांसारखी महत्त्वाची युरोपीय शहरे येतात. इस्रायलचे म्हणणे आहे की, इराणची ही दहशतवादी राजवट आता केवळ मध्य-पूर्वेपुरती मर्यादित राहिलेली नसून ती एक जागतिक आपत्ती बनली आहे. ब्रिटनने आपल्या तळांचा वापर अमेरिकेला इराणवर हल्ला करण्यासाठी दिल्यास, ब्रिटनला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी आधीच दिला आहे.
Surprise! Iranian regime caught lying again trying to hide that Iran developed missiles to threaten all of Europe. Feb 28, 2026 – Iran’s FM:
“We kept the range of our missiles below 2,000 km.” March 21, 2026 – Iran targets Diego Garcia, ~4,000 km away. 4,000 km from Iran… pic.twitter.com/wDIoVFpHYm — Israel Foreign Ministry (@IsraelMFA) March 21, 2026
credit – social media and Twitter
इस्रायलने जारी केलेल्या नकाशात इराणच्या क्षेपणास्त्रांचा पल्ला भारताच्या सीमेपर्यंत पोहोचलेला दिसत आहे. ४,००० किमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे विकसित करणे म्हणजे इराण आता आशिया, आफ्रिका आणि युरोप या तिन्ही खंडांवर नियंत्रण मिळवू शकतो. जरी इराण आणि भारताचे संबंध मित्रत्वाचे असले, तरी या प्रदेशातील वाढती अस्थिरता आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची शर्यत भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने आव्हानात्मक ठरू शकते. विशेषतः अरबी समुद्रातील व्यापारी जहाजांवर होणारे हल्ले आणि आता लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे यामुळे भारताची ‘मॅरिटाईम सिक्युरिटी’ धोक्यात येऊ शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Alert : आता युद्धाची वेळ! ’24 तासांत देश सोडा’, सौदीने इराणला दाखवला आरसा; राजदूतांना गाशा गुंडाळण्याचे आदेश
ब्रिटनच्या जॉइंट फोर्सेस कमांडचे माजी प्रमुख जनरल सर रिचर्ड यांनी बीबीसीशी बोलताना कबूल केले की, इराणच्या या नवीन क्षमतेने पाश्चात्य देशांना चक्रावून सोडले आहे. “आम्ही इराणला कमी लेखत होतो, पण आता आमची सुरक्षा यंत्रणा पुन्हा तपासावी लागेल,” असे त्यांनी म्हटले आहे. डिएगो गार्सियावरील हा हल्ला केवळ एका लष्करी तळावरील हल्ला नसून, तो जागतिक महासत्तांना दिलेला इशारा आहे.
Ans: इस्रायली लष्कराच्या दाव्यानुसार, इराणने ४,००० किमी पल्ल्याची आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे विकसित केली आहेत.
Ans: डिएगो गार्सिया हा हिंद महासागरातील अमेरिका आणि ब्रिटनचा संयुक्त लष्करी तळ आहे. ब्रिटनने अमेरिकेला इराणविरोधी मोहिमेसाठी हा तळ वापरू दिल्याने इराणने येथे हल्ला केला आहे.
Ans: इराणची क्षेपणास्त्रे आता लंडन, पॅरिस आणि बर्लिनपर्यंत पोहोचू शकतात, ज्यामुळे नाटो (NATO) देशांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.






