Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इशाक दार यांचा खोटारडेपणा उघड; AI-निर्मित बातमीचा हवाला देत पाक लष्कराचे खोटे कौतुक, ‘डॉन’ने केला पर्दाफाश

Pakistan Army AI praise : ऑपरेशन सिंदूरदरम्यान झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी AI-निर्मित खोट्या वृत्तपत्राचा हवाला देत संसदेत बनावटी प्रशंसेचा दावा केला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 16, 2025 | 02:22 PM
Ishaq Dar's lies exposed Dawn exposes fake praise of Pakistan Army citing AI-generated news

Ishaq Dar's lies exposed Dawn exposes fake praise of Pakistan Army citing AI-generated news

Follow Us
Close
Follow Us:

Pakistan Army AI praise : पाकिस्तानची खोटेपणाची यंत्रणा पुन्हा एकदा जगासमोर उघड झाली आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी AI-निर्मित खोट्या वृत्तपत्राचा हवाला देत संसदेत बनावटी प्रशंसेचा दावा केला, मात्र त्यांचा हा खोटारडेपणा ‘डॉन’सारख्या पाकिस्तानातील प्रतिष्ठित वृत्तपत्रानेच भांडाफोड करत उघड केला आहे.

इशाक दार यांनी संसदेत वक्तव्य करताना म्हटले की, ब्रिटनमधील ‘द डेली टेलिग्राफ’ या नामांकित वृत्तपत्राने पाकिस्तानच्या हवाई दलाचे कौतुक केले असून, त्यांच्या क्षमतेची प्रशंसा करत त्यांना “आकाशाचा निर्विवाद राजा” असे संबोधले आहे. मात्र डॉनने या दाव्याची तथ्य पडताळणी करत हे वृत्त संपूर्णपणे खोटे असून, त्या लेखाचा फोटो AI तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बनवलेला असल्याचे उघड केले.

पाकिस्तानी लष्कराच्या पराभवावर झाकण घालण्याचा प्रयत्न

संपूर्ण घटना ऑपरेशन सिंदूर या भारतीय लष्करी प्रतिकाराच्या पार्श्वभूमीवर घडली. भारताने पाकिस्तानच्या कुरापतींना उत्तर देताना मोठा लष्करी कारभार केला. या ऑपरेशनमध्ये भारताने पाकिस्तानचे ५ लढाऊ विमाने पाडली, ज्यात २ जेएफ-१७ आणि एक मिराज विमानाचा समावेश होता. याशिवाय, भारताने पाकिस्तानचे लष्करी तळही उद्ध्वस्त केले, त्यामुळे पाकिस्तानच्या हवाई दलाचे मोठे नुकसान झाले. या लाजिरवाण्या पराभवावर झाकण टाकण्यासाठीच इशाक दार यांनी संसदेत बनावटी माहितीचा वापर करून देशवासीयांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : POK वाचवण्यासाठी पाकिस्तानची ‘नवी चाल’; भारतावर दबाव आणण्यासाठी चीनला खेचले मैदानात

AI-निर्मित लेखाचा बनाव आणि ‘डॉन’ची तथ्यतपासणी

इशाक दार यांनी ‘द डेली टेलिग्राफ’चा हवाला देत ज्या लेखाचा फोटो संसदेत दाखवला, तो AI च्या मदतीने तयार केलेला बनावटी फोटो असल्याचे ‘डॉन’ने स्पष्ट केले. ‘डॉन’ने आपल्या तथ्यतपासणीत नमूद केले की, डेली टेलिग्राफच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त स्रोतावर असा लेख किंवा फोटो उपलब्ध नाही. पाकिस्तानी मंत्री संसदेसारख्या सर्वोच्च व्यासपीठावर अशा खोट्या माहितीचा प्रसार करत असल्याने देशाची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मोठ्या प्रमाणावर मलीन झाली आहे.

Pakistan’s propaganda is quickly falling apart, exposing a web of lies and desperation. In a blatant attempt to save face, Deputy Prime Minister Ishaq Dar misled the country’s Senate by claiming that The Telegraph had declared the Pakistan Air Force as the “Undisputed King of the… pic.twitter.com/MBA6gVb5M6 — Amit Malviya (@amitmalviya) May 16, 2025

credit : social media

देशांतर्गत टीकेचा भडीमार, राजकीय नाकर्तेपणाचे दर्शन

इशाक दार यांच्या वक्तव्यानंतर पाकिस्तानमध्येच राजकीय आणि लष्करी वर्तुळातून मोठा संताप व्यक्त करण्यात आला आहे. अनेक नेत्यांनी दार यांच्यावर खोटे बोलल्याचा आरोप करत निषेध केला, तर काहींनी पाकिस्तान सरकारच्या माहिती खात्याच्या निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित केले. एका बनावट AI लेखाच्या आधारावर पाकिस्तानच्या लष्कराचे खोटे कौतुक करणे म्हणजे शासकीय नाकर्तेपणाचा परमोच्च टप्पा, अशी प्रतिक्रिया काही राजकीय निरीक्षकांनी दिली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘अवकाशातून अणु क्षेपणास्त्रांचा पाऊस…’ चीनच्या Orbital Nuclear Weapons Project मुळे जगभरात चिंता

 पाकिस्तानची जागतिक प्रतिमा आणखी ढासळली

या संपूर्ण प्रकारामुळे पाकिस्तानची जागतिक पातळीवरील प्रतिमा आणखी उध्वस्त झाली आहे. एकीकडे लष्कराचे भीषण नुकसान झाले असताना, दुसरीकडे त्याच्या खोट्या यशाचे गोडवे गाणे म्हणजे शासकीय विश्वासार्हतेचा पूर्णपणे संकोच होणे आहे. AI-निर्मित बनावट माहितीचा हवाला देऊन संसदेत भाष्य करणाऱ्या परराष्ट्र मंत्र्यांमुळे पाकिस्तानची फजिती झाली असून, भविष्यात सरकारकडून दिली जाणारी कोणतीही माहिती विश्वासार्ह राहील का? असा प्रश्न सध्या पाकिस्तानच्या जनतेपासून ते आंतरराष्ट्रीय समुदायापर्यंत सर्वांनाच पडला आहे.

Web Title: Ishaq dars lies exposed dawn exposes fake praise of pakistan army citing ai generated news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2025 | 02:16 PM

Topics:  

  • AI model
  • india pakistan war
  • Operation Sindoor

संबंधित बातम्या

पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटला! ‘या’ दहशतवाद्याने सरकार आणि सैन्याशी संबंधावर थेट दिली कबुली
1

पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटला! ‘या’ दहशतवाद्याने सरकार आणि सैन्याशी संबंधावर थेट दिली कबुली

Kashmir At UN : ‘7 भारतीय विमाने पाडली…’; UNGA मध्ये शाहबाज शरीफचे भारताविरुद्ध पुन्हा आक्षेपार्ह आणि खोटे दावे
2

Kashmir At UN : ‘7 भारतीय विमाने पाडली…’; UNGA मध्ये शाहबाज शरीफचे भारताविरुद्ध पुन्हा आक्षेपार्ह आणि खोटे दावे

ISIRun : पाकिस्तानचा भारताविरुद्ध नवा हेरगिरीचा कट; कराचीतील आयएसआयचे युनिट 412 सक्रिय
3

ISIRun : पाकिस्तानचा भारताविरुद्ध नवा हेरगिरीचा कट; कराचीतील आयएसआयचे युनिट 412 सक्रिय

MIG 21 Retirement: भारताचा ‘बादशाह’ निवृत्त! मिग-21 ने अनेकदा पाकड्यांना चारली धूळ; पहा Video
4

MIG 21 Retirement: भारताचा ‘बादशाह’ निवृत्त! मिग-21 ने अनेकदा पाकड्यांना चारली धूळ; पहा Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.