इस्त्रायलचा मध्य गाझातील शाळांवर हल्ला
नवी दिल्ली: सध्या इस्त्रायल-हिजबुल्लाह, इराण-इस्त्रायल, आणि इस्त्रायल-हमास यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे मध्येपुर्वेत तिसऱ्या महायुद्धाचे चिन्ह दिसून येत आहे. यामुळे जगातील अनेक देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. एककीकडे इस्त्रायल हिजबुल्लाहवर सातत्याने हवाई हल्ले करत आहे. तर दुसरीकडे रविवारी इस्त्रायलने गाझावर हल्ले केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गाझामध्ये इस्त्रायलने मुलांच्या शाळांवर आणि मशिदींवर हल्ले केले असून यामध्ये एकून 20 जणांचा मृत्यू झाला आहे.
अनेक निर्वासित शिबिरांवर इस्त्रायलचे हल्ले
मीडिया रिपोर्टनुसार, मृतांमध्ये नवजात बालकांचा देखील समावेश आहे. याशिवाय युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क्स एजन्सी फॉर पॅलेस्टाईन रिफ्युजीज (UNRWA) द्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळेत झालेल्या हल्ल्यांमुळे 5 हजाराहून अधिक लोकांनी आश्रय घेतला आहे. याशिवाय, उत्तर गाझामध्ये अल साती कॅम्पमध्ये देखील हल्ला झाला होता ज्यामध्ये पात मुळे ठार झाली अशी माहिती हॉस्पिटच्या अदिकाऱ्यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, याआधी इस्त्रायली सैन्याने मध्य गाझातील नुसरत निर्वासिक शिबिरावर देखील हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये देखील अनेक कुटूंबाना आपला जीव गमवावा लागला. नंतर दुसरा हल्ला बुरेझ निर्वासितक छावणीवर इस्त्रायली रणगाड्यांनी गोळीबार केला होता ज्यामध्ये सहाजण ठार झाले.
7 ऑक्टोबर 2023 पासून इस्त्रायल-हमास संघर्ष सुरू
वर्ष 2023 मध्ये हमासने 7 ऑक्टोबरच्या दिवशी इस्रायलवर हल्ला केला तेव्हापासून गाझामध्ये संघर्ष सुरू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, गाझा पट्टीतून सुमारे 2,500 दहशतवाद्यांनी इस्रायली सीमा ओलांडली, ज्यामुळे अनेक बळी आणि ओलीस पकडले गेले. या हल्ल्यांनतरच इस्रायलने हमासच्या विरोधात प्रत्युत्तरासाठी हल्ला सुरू केला, संपूर्ण दहशतवादी गट नष्ट करू असा इशारा हमासला दिली. तसेच नागरिकांची जीवितहानी कमी करण्याचा प्रयत्न केला.
हिजबुल्लाहचे इस्त्रायलवर आत्मघाती ड्रोन हल्ले
लेबनॉनच्या दक्षिण भागात इस्रायल आणि हिजबुल्लाहच्या लष्करामध्ये भीषण जमीनी आणि हवाई युद्ध सुरू आहे. दरम्यान, या हल्ल्यांचे प्रत्युत्तर म्हणून हिजबुल्लाहने रविवारी रात्री इस्त्रायलच्या लष्करी तळांना लक्ष्य करत प्राणघातक ड्रोन हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यांमध्ये चार सैनिकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर 60 जवान जखमी झाले आहेत. हिजबुल्लाहने इस्त्रायलच्या लष्करी तळांवर दोन आत्मघाती ड्रोन हल्ले केले आहेत.
हे देखील वाचा- हिजबुल्लाहचा इस्रायलवर ड्रोन हल्ला, लष्करी तळाला लक्ष्य; 4 जवान शहीद, 60 जखमी