Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi Israel Visit : इस्रायली संसदेत कडाडले PM मोदी; ‘नेसेट’मधून दहशतवादावर दिला गंभीर इशारा

PM Modi Israel Visit : पंतप्रधान मोदी इस्रायलच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस असून त्यांनी पहिल्या दिवशी इस्रायली संसदेला संबोधित केले. यावेळी त्यांनी दहशतवादावर कडक इशारा दिला.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 26, 2026 | 09:19 AM
Pm Modi Address to Israel Parliament

Pm Modi Address to Israel Parliament

Follow Us
Close
Follow Us:
  • पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौऱ्याचा आज दुसरा दिवस
  • पहिल्या दिवशी इस्रायसी संसदेत कडाडले पंतप्रधान मोदी
  • नेसेटमधून दहशतवादावर दिला गंभीर इशारा
Pm Modi Address to Israel Parliament : जेरुसेलम : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) इस्रायलच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस असून  त्यांनी जेरुसेल येथे इस्रायली संसद नेसेटला संबोधित केले आहे. असे करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. नेसेटचे सभापती अमीर ओहाना यांनी पंतप्रधान मोदींची स्वागत केले असून त्यांना नेसेटच्या पदकाचे अध्यक्ष म्हणून सन्मानित केले. या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी नेसेटला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी दहशतवादावर प्रहार केला. तसेच त्यांनी भारत आणि इस्रायली मैत्रीचे एक नवे पर्व सुरु झाल्याचे अधोरेखित केले.

जगात भारी आपले PM Narendra Modi! ‘नमस्ते अन् शालोम’चा जयघोष; इस्त्रायलमध्ये जोरदार स्वागत

दहशतवादावर पंतप्रधानांची कडाडून टिका 

पंतप्रधान मोदींनी इस्रायली संसदेत दहशतवादावर तीव्र प्रहार केला. ०७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर झालेल्या हमासच्या हल्ल्यावर त्यांनी निषेध नोंदवला. पंतप्रधानांनी म्हटले की, आम्ही मुंबईवरील हल्ला विसरु शकत नाही आणि इस्रायलवरील ७ ऑक्टोबरचा हल्लाही विसरु शकत नाही.

पंतप्रधान मोदींनी ठामपणे सांगितले की, निरापराध नागरिकांची हत्या कोणत्याही परिस्थिती स्वीकारली जाणार नाही. पंतप्रधान मोदींनी दहशतवादावर झिरो टॉलरन्सची भूमिका पुन्हा एकदा जगासमोर मांडली. तसेच त्यांनी दहशतवादावर दुहेरी निकष न ठेवता संपूर्ण देशाला एकत्र येण्याचेही आवाहन केले.

मोदींच्या वाढदिवसाचे इस्रायलशी कनेक्शन

पंतप्रधान मोदींनी संसदेत त्यांच्या जन्मदिनाचा संदर्भ दिला. त्यांनी म्हटले की,  १७ सप्टेंबर १९५० रोजी त्यांचा जन्म झाला होता, हा तोच दिवस आहे जेव्हा भारताकडून इस्रायलला अधिकृतपणे मान्यता मिळाली होती. त्यांनी दोन्ही देशातील संबंध घट्ट असल्याचे म्हटले. भारत आणि इस्रायलचे संबंध २००० वर्षे जुने असल्याचे सांगत त्यांनी  पहिल्या युद्धत शहीद झालेल्या भारतीय सैनिकांचे स्मरण केले.

इस्रायल भारत मैत्रीचे पर्व

याच वेळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netnyahu) यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींनी आपले भाऊ म्हणून संबोधले.  पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात वसुधैव कुटुंबकम आणि इस्रायलच्या टिक्कुन ओलमचाही उल्लेख केला.

दोन्ही देशांत अनेक महत्वाच्या मुद्यांवर करार होण्याची शक्यता

पंतप्रधानांच्या या भेटीत इस्रायल (Israel) आणि भारतामध्ये अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांतील आर्थिक सहकार्य वाढविण्यासाठी भारत-मध्य पूर्व-युरोप कॉरिडॉर आणि I2U2 करार होईल. ज्यामुळे दोन्ही देशांच्या व्यापाराला चालना मिळेल. तसेच दोन्ही देशात मुक्त व्यापार करारावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर देखील चर्चेची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

PM Modi Israel Visit : पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस; अनेक महत्त्वपूर्ण करार होण्याची शक्यता

💡

Frequently Asked Questions

  • Que: पंतप्रधान मोदींनी इस्रायली संसदेत दहशतवादावर काय म्हटले?

    Ans: पंतप्रधान मोदींनी इस्रायली संसदेत बोलताना दहशतादला कोणत्याही परिस्थिती स्वीकारले जाणार नाही असे म्हटले. तसेच त्यांनी भारतातील मुंबईवरील आणि इस्रायलवरील हमासच्या दहशतवादी हल्ल्याचाही तीव्र निषेध नोंदवला. संपूर्ण जगाला त्यांनी दहशतवादाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले.

  • Que: पंतप्रधान मोदींच्या जन्मदिनाचा इस्रायलशी काय संबंध आहे?

    Ans: पंतप्रधान मोदींच्य म्हणण्यानुसार, त्यांचा जन्म १७ सप्टेंबर १९५० रोजी झाला होता, आणि याच दिवशी इस्रायलला अधिकृतपणे मान्यता मिळाली होती.

Web Title: Pm modi israel visit address to israel parliament warning on terrorism from knesset

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 08:55 AM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Israel
  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

PM Modi Israel Visit : पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस; अनेक महत्त्वपूर्ण करार होण्याची शक्यता
1

PM Modi Israel Visit : पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस; अनेक महत्त्वपूर्ण करार होण्याची शक्यता

जगात भारी आपले PM Narendra Modi! ‘नमस्ते अन् शालोम’चा जयघोष; इस्त्रायलमध्ये जोरदार स्वागत
2

जगात भारी आपले PM Narendra Modi! ‘नमस्ते अन् शालोम’चा जयघोष; इस्त्रायलमध्ये जोरदार स्वागत

Nuclear Threat: आता ‘पाकिस्तान’ इस्रायलच्या निशाण्यावर; ‘इस्लामिक अणुबॉम्ब’ नष्ट करण्यासाठी ज्यू राष्ट्राचा महाभयंकर प्लॅन
3

Nuclear Threat: आता ‘पाकिस्तान’ इस्रायलच्या निशाण्यावर; ‘इस्लामिक अणुबॉम्ब’ नष्ट करण्यासाठी ज्यू राष्ट्राचा महाभयंकर प्लॅन

War Alert: इकडे तेल अवीवमध्ये PM मोदी, तर ‘तिकडे’ लँड झाले अनेक अमेरिकन F-22 फायटर जेट; ‘इस्लामिक नाटो’चे अस्तित्व संपवणारा प्लॅन
4

War Alert: इकडे तेल अवीवमध्ये PM मोदी, तर ‘तिकडे’ लँड झाले अनेक अमेरिकन F-22 फायटर जेट; ‘इस्लामिक नाटो’चे अस्तित्व संपवणारा प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.