खामेनेईंचं गुप्त ठिकाण टार्गेटवर! अमेरिकेला धमकी देताच इस्रायलने डागली मिसाईल
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी आज राष्ट्राला संबोधित केलं. लाईव्ह टीव्ही भाषणानंतर काही मिनिटांतच इस्रायली लढाऊ विमानांनी तेहरानच्या लावीझान भागात मीसाईल डागल्या. त्यामुळे इराणचं सर्वोच्च नेतृत्त्व इस्रायलच्या टार्गेटवर असल्याचं माणलं जातं आहे. लावीझा खामेनेईंचं संभाव्य गुप्त ठिकाण मानलं जातं. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलची खामनेईंना धमकी आणि इराणचा अमेरिकाला इशारा यामुळे भीषण युद्धाची शक्यता वर्तवली जात आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अलीकडेच उघडपणे म्हटलं होतं की जर खामेनींना संपवलं गेलं तर युद्ध आणि इराणी राजवट दोन्ही संपूष्टात येईल, असं म्हटलं होतं. त्यानंतर लगेचंच हा हल्ला झाला आहे. तणावाला आणखी बळकटी देत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही काल मंगळवारी रात्री, ते कुठे आहेत याची आम्हाला माहिती आहे. पण आम्ही त्यांना अजून मारलेलं नाही, असा धमकी वजा इशारा दिला होता.
Iran Israel War : इस्रायलसाठी अमेरिका घेणार युद्धात उडी; इराणचे अणुतळ उद्ध्वस्त करण्याची कुटील योजना
खामेनेईं यांना तेहरानच्या ईशान्येकडील भागातील लवीझानमधील एका भूमिगत बंकरमध्ये हलवण्यात आलं आहे, असं वृत्त इराणी माध्यमांनी वृत्त दिलं होतं. त्यामुळे इस्रायलने त्या भागातील बंकरला लक्ष्य केले असावं अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र सध्या, या हल्ल्याबद्दल इस्रायल किंवा इराणकडून कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही, परंतु या घटनेमुळे दोन्ही देशांमधील आधीच युद्धजन्य परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
इराणची राजधानी तेहरानच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात स्फोट झाल्याचे वृत्त आहे. इराण इंटरनॅशनलच्या मते, नागरिकांनी पाठवलेल्या व्हिडिओंमध्ये पूर्व आणि पश्चिम तेहरानमध्ये मोठे स्फोट झाल्याचं दिसून येत आहे. राजधानीच्या पूर्वेकडील डोंगराळ भागात नोबोन्याद परिसराजवळ एक मोठा स्फोट झाल्याचे एका व्हिडिओमध्ये दिसून येते. इतर व्हिडिओंमध्ये पूर्वेकडील पारडिस फेज-८, पश्चिमेकडील चितगढजवळील शहरक-ए-एस्तेघलाल आणि पूर्वी इंधन डेपोला लक्ष्य करण्यात आलेल्या शहरन परिसरात इस्रायली हल्ल्यांचे वृत्त आहे.याशिवाय, उत्तर तेहरानमधील सोल स्ट्रीटजवळ आणखी एक स्फोट झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यांबद्दल इराणी सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही, परंतु नागरिकांमध्ये भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झालं आहे.