Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel Iran War: “नाव किंवा ठिकाण काहीही असो, खात्मा निश्चितच…”, इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याला इस्रायलची धमकी

स्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी इराणच्या संभाव्य सर्वोच्च नेत्याला कडक इशारा दिला आहे. इराणने इस्रायलविरोधी धोरण सुरू ठेवल्यास, नव्या नेत्याचा शोध घेऊन त्याचा खात्मा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 04, 2026 | 07:56 PM
इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याला इस्रायलची धमकी (Photo Credit- X)

इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याला इस्रायलची धमकी (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • “नाव किंवा ठिकाण काहीही असो, खात्मा निश्चितच…”
  • इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याला इस्रायलची धमकी
  • वाचा काय म्हणाले…
Iran-Israel War News: मध्य पूर्वेतील इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध आता अत्यंत भीषण वळणावर पोहोचले आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी इराणच्या संभाव्य सर्वोच्च नेत्याला उडवून देण्याचा थेट इशारा दिला आहे. बुधवारी ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट केलेल्या एका आक्रमक निवेदनात काट्झ यांनी स्पष्ट केले की, इराणचा नवा नेता जर इस्रायलचा विनाश आणि अमेरिकेला धमकावण्याचे धोरण सुरू ठेवणार असेल, तर तो इस्रायलच्या ‘हिट लिस्ट’वर असेल.

‘लायन रोअर’ मोहिमेद्वारे इराणला चिरडण्याचा संकल्प

संरक्षण मंत्री काट्झ यांनी इराणच्या भावी नेतृत्वाला उद्देशून म्हटले की, “इराणचा जो कोणी नवा नेता नियुक्त होईल, त्याने जर इस्रायलचा द्वेष आणि प्रादेशिक देशांना धमकावणे सुरूच ठेवले, तर त्याचे नाव किंवा तो लपलेले ठिकाण याने काहीही फरक पडणार नाही; आमचे सैन्य त्याचा शोध घेऊन खात्मा करेल.”

BREAKING 🚨 🇮🇷 Israel’s Defence Minister Israel Katz warns that Mojtaba Hosseini Khamenei, reportedly elected as Iran’s new Supreme Leader, would be a target for elimination 🤯 🇮🇱 Israel has reportedly carried out massive strikes since yesterday. Official confirmation is… pic.twitter.com/nAhuG4WRaK — Hinduism_and_Science (@Hinduism_sci) March 4, 2026

पंतप्रधानांच्या संमतीने इस्रायली संरक्षण दलाला (IDF) ‘ऑपरेशन लायन रोअर’ (Operation Lion Rore) अंतर्गत पूर्ण तयारीत राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मोहिमेद्वारे इराणची लष्करी क्षमता मोडीत काढणे आणि तिथल्या जनतेला हुकूमशाहीतून मुक्त करणे, असे दुहेरी उद्दिष्ट इस्रायलने ठेवले आहे. विशेष म्हणजे, अली खामेनीई यांचा मुलगा मोजतबा खामेनीई यांची नवे सर्वोच्च नेते म्हणून निवड झाल्याच्या चर्चांदरम्यान हे विधान आले आहे.

US Iran War : इराणशी युद्धात अमेरिका संपणार? अवघ्या १० दिवसांचाच शस्त्रसाठा शिल्लक; होणार महाभयंकर विनाश

डोनाल्ड ट्रम्प यांचे दीर्घकालीन युद्धाचे संकेत

या संघर्षाने आता पाचव्या दिवसात प्रवेश केला असून संपूर्ण आखाती देश हादरले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध केवळ काही दिवस न चालता अनेक आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त काळ खेचले जाण्याचे संकेत दिले आहेत. बुधवारी तेहरानच्या आसपास प्रचंड स्फोटांचे आवाज ऐकू आले, ज्याला इराणच्या सरकारी टीव्हीनेही दुजोरा दिला आहे. इराणमध्ये आतापर्यंत सुमारे ८०० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

मिसाईल आणि ड्रोन हल्ल्यांनी आखात धगधगले

युद्धाच्या ताज्या घडामोडींनुसार, इस्रायलने इराणच्या मिसाईल लॉन्च साईट्स आणि अण्वस्त्र संशोधन केंद्रांवर जोरदार हवाई हल्ले केले आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे इस्रायलच्या दिशेने डागली, परंतु इस्रायलच्या प्रगत हवाई संरक्षण यंत्रणेने बहुतांश क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केली. दुसरीकडे, इराण समर्थित गटांनी सौदी अरेबियातील अमेरिकन दूतावास आणि युएईमधील अमेरिकन वाणिज्य दूतावासावर ड्रोन हल्ले केले आहेत. यामुळे ऊर्जा पुरवठा आणि विमान वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे. या संघर्षात आतापर्यंत ११ इस्रायली नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

US Iran War : इराणला मोठा दणका! भारताच्या दारात विनाशकारी वॉरशिप ‘नेस्तनाबूत’; अमेरिकेने केला गेम?

Web Title: Israel threatens irans new supreme leader

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 07:56 PM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • Iran-Israel War
  • World news

संबंधित बातम्या

US Iran Conflict : चीनने इराणला केली लष्करी मदत? अखेर अमेरिकेच्या ‘त्या’ दाव्याबद्दल सत्य समोर आलंच
1

US Iran Conflict : चीनने इराणला केली लष्करी मदत? अखेर अमेरिकेच्या ‘त्या’ दाव्याबद्दल सत्य समोर आलंच

Iran Attack Kuwait : मध्यपूर्वेत युद्धाचे ढग गडद! कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण ड्रोन हल्ला; इराणवर संशयाची सुई
2

Iran Attack Kuwait : मध्यपूर्वेत युद्धाचे ढग गडद! कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण ड्रोन हल्ला; इराणवर संशयाची सुई

E-Challan : वाहनधारकांनो त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा ट्रॅफिक पोलिसांच्या नवीन नियमांमुळे अडकाल मोठ्या अडचणीत
3

E-Challan : वाहनधारकांनो त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा ट्रॅफिक पोलिसांच्या नवीन नियमांमुळे अडकाल मोठ्या अडचणीत

CIA vs ODNI: अमेरिकेत अंतर्गत कलह! सीआयएने इराणची गुप्त माहिती रोखली; सर्वोच्च गुप्तचर संस्थांमध्ये ‘या’ मोठ्या कारणामुळेच जुंपली
4

CIA vs ODNI: अमेरिकेत अंतर्गत कलह! सीआयएने इराणची गुप्त माहिती रोखली; सर्वोच्च गुप्तचर संस्थांमध्ये ‘या’ मोठ्या कारणामुळेच जुंपली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.