Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“आईच्या निधनाला महिनाही उलटला नाही अन्…”, Iran Israel संघर्षात कांदिवलीच्या ‘दीक्षित सोळंकी’चा मृत्यू

ओमानच्या आखातात (Gulf of Oman) एका मालवाहू ऑईल टँकरवर झालेल्या भीषण ड्रोन हल्ल्यात मुंबईतील कांदिवली येथील रहिवासी दीक्षित सोलंकी (२५) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 04, 2026 | 07:18 PM
Iran Israel संघर्षात कांदिवलीच्या 'दीक्षित सोळंकी'चा मृत्यू (Photo Credit- X)

Iran Israel संघर्षात कांदिवलीच्या 'दीक्षित सोळंकी'चा मृत्यू (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • इराण-इस्रायल युद्धाचा देशाला चटका
  • ओमानच्या आखातात ड्रोन हल्ला
  • मुंबईचा २५ वर्षीय तरुण ठार!
Indian Sailor Killed in Iran Israel War: इराण इस्रायल युद्धाच्या ज्वाळा आता अरबी समुद्रापर्यंत पोहोचल्या आहेत. ओमानच्या आखातात (Gulf of Oman) एका मालवाहू ऑईल टँकरवर झालेल्या भीषण ड्रोन हल्ल्यात मुंबईतील कांदिवली येथील रहिवासी दीक्षित सोलंकी (२५) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या संघर्षातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
🇮🇷 Iran America 🇺🇸 War/ My deepest condolences to the Solanki family of Ghogla, Diu, for the loss of their son, Dixit. He was a crew member on oil tanker in the Gulf of Oman during the ongoing conflict involving the United States, Iran/Israel. My heart goes out to your family pic.twitter.com/zzybVmnqOp — Ketan Patel (@KPatelINC) March 3, 2026

इंजिन रूममध्ये स्फोट आणि भीषण आग

मिळालेल्या माहितीनुसार, दीक्षित सोलंकी ‘MKD Vyom’ या ऑईल टँकरवर क्रू मेंबर म्हणून कार्यरत होता. मार्शल आयलंडचा ध्वज असलेले हे जहाज ओमानच्या मस्कत किनारपट्टीपासून साधारण ५२ नॉटिकल मैल अंतरावर असताना, स्फोटकांनी भरलेल्या एका मानवरहित ड्रोन बोटीने जहाजाला धडक दिली. हा हल्ला इतका भीषण होता की, जहाजाच्या इंजिन रूममध्ये मोठा स्फोट होऊन आग लागली. ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी दीक्षित इंजिन रूममध्ये आपली ड्युटी करत होता, या आगीत होरपळून त्याचा जागीच मृत्यू झाला.

Middle East War : १०० वेळा फोन केला, पण…; दुबईत अडकलेल्या भारतीय पर्यटकाचे हाल; काय आहे सत्य स्थिती?

सोलंकी कुटुंबावर दुखाचा डोंगर

दीक्षित सोलंकी हा मूळचा दीव (गुजरात) येथील रहिवासी होता, मात्र गेल्या काही वर्षांपासून तो कांदिवलीत स्थायिक झाला होता. त्याचे वडील अमृतलाल सोलंकी हे दीवमध्ये मच्छीमारीचा व्यवसाय करतात. दीक्षित हा कुटुंबातील सर्वात धाकटा मुलगा होता. धक्कादायक बाब म्हणजे, केवळ महिनाभरापूर्वीच दीक्षितच्या आईचे निधन झाले होते. आईच्या अंत्यविधीसाठी तो गावी आला होता आणि त्यानंतर पुन्हा कर्तव्यावर रुजू झाला होता. मात्र, महिना उलटत नाही तोच दीक्षितच्या मृत्यूच्या बातमीने सोलंकी कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

दुबईत अडकलेले महाराष्ट्रातील १६४ पर्यटक सुखरूप परतले

दुसरीकडे, अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे हवाई वाहतुकीवर परिणाम झाल्याने दुबईत (UAE) शेकडो भारतीय पर्यटक अडकून पडले होते. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने तत्परता दाखवत दुबईत अडकलेल्या राज्यातील १६४ पर्यटकांना सुरक्षित मायदेशी आणले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या पर्यटकांच्या प्रवासासाठी विशेष विमानांची व्यवस्था करण्यात आली होती. युएईमधील फुजैरा विमानतळावरून दोन विशेष विमानांद्वारे हे पर्यटक मुंबईत दाखल झाले. ७६ पर्यटक मंगळवारी रात्री मुंबईत पोहोचले. ८८ पर्यटकांना घेऊन दुसरे विमान रात्री उशिरा मुंबई विमानतळावर उतरले. यामध्ये पुण्यातील ‘इंदिरा स्कूल ऑफ बिजनेस स्टडीज’च्या ८४ एमबीए विद्यार्थ्यांचा आणि कर्मचारी वर्गाचा समावेश आहे. या सर्व पर्यटकांनी मायदेशी परतल्यानंतर सुटकेचा निश्वास टाकला आहे.

India Foreign Policy: हिंद महासागराचा ‘बॉस’ भारतच! जाणून घ्या काय आहे मोदी सरकारचा नवा ‘न्यू इंडिया’ फॉरेन पॉलिसी सिद्धांत

Web Title: Kandivalis dixit solanki dies in iran israel clash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 07:18 PM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • Iran-Israel War
  • Mumbai

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : स्फोटक कारखान्यांसाठी नियमांमध्ये सुधारणासाठी केंद्र शासनाकडे निवेदन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
1

Devendra Fadnavis : स्फोटक कारखान्यांसाठी नियमांमध्ये सुधारणासाठी केंद्र शासनाकडे निवेदन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Middle East War : १०० वेळा फोन केला, पण…; दुबईत अडकलेल्या भारतीय पर्यटकाचे हाल; काय आहे सत्य स्थिती?
2

Middle East War : १०० वेळा फोन केला, पण…; दुबईत अडकलेल्या भारतीय पर्यटकाचे हाल; काय आहे सत्य स्थिती?

India Foreign Policy: हिंद महासागराचा ‘बॉस’ भारतच! जाणून घ्या काय आहे मोदी सरकारचा नवा  ‘न्यू इंडिया’ फॉरेन पॉलिसी सिद्धांत
3

India Foreign Policy: हिंद महासागराचा ‘बॉस’ भारतच! जाणून घ्या काय आहे मोदी सरकारचा नवा ‘न्यू इंडिया’ फॉरेन पॉलिसी सिद्धांत

US Iran War : इराणला मोठा दणका! भारताच्या दारात विनाशकारी वॉरशिप ‘नेस्तनाबूत’; अमेरिकेने केला गेम?
4

US Iran War : इराणला मोठा दणका! भारताच्या दारात विनाशकारी वॉरशिप ‘नेस्तनाबूत’; अमेरिकेने केला गेम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.