Israel-Hamas War: आर्त किंकाळ्यांनी हादरलं हमास! इस्त्रायलच्या अति भयानक हल्ल्यात 32 लोकांच्या चिंधड्या
इस्त्रायलचा हमासवर भीषण हल्ला
तब्बल 32 लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता
हमासला नष्ट करणारच – इस्त्रायलचा निर्धार
Wolrd War News: गेले अनेक महीने इस्त्रायल आणि हमासमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. हमासला नष्ट केल्याशिवाय शांत बसणार नाही असा निर्धारच इस्त्रायल केला आहे. आज इस्त्रायलने हमासवर आजवरचा सर्वात भीषण हल्ला केला आहे. हमासवर इस्त्रायलने भयानक हवाई हल्ला केला आहे. यामध्ये तब्बल 32 लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे.
गेले अनेक दिवस इस्त्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. पॅलेस्टाईनला देश म्हणून मान्यता दिल्याने इस्त्रायलचा रंग अनावर झाला आहे. काहीही झाले तरी हमासला नष्ट केल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही असे इस्त्रायलने स्पष्ट केले आहे. आज इस्त्रायलने हमासच्या भागात भयानक हवाई हल्ला केला आहे. यामध्ये तब्बल 32 किंवा त्यापेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे.
काल रात्री इस्तायलने हमासवर हवाई हल्ले केले. हे हल्ले इतके भीषण स्वरूपाचे होते की त्यात अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. गाझा पट्टीत इस्त्रायलने केलेला हा आजवरचा सर्वात मोठा हल्ला असल्याचे म्हटले जात आहे.
इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष शिगेला
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत (UNGA) शुक्रवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांनी एक धडक भाषण केले. या भाषणात त्यांनी थेट आणि कठोर शब्दांत जाहीर केले की इस्रायल कधीही पॅलेस्टाईनला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणार नाही. त्यांच्या या भूमिकेवर सभागृहात उपस्थित अमेरिकन शिष्टमंडळाने उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला, ज्यामुळे पुन्हा एकदा जगासमोर अमेरिकेचा ठाम इस्रायल-समर्थक दृष्टिकोन स्पष्ट झाला.
नेतन्याहूंचे भाषण संपताच सभागृहात उपस्थित अमेरिकन शिष्टमंडळाने उभे राहून जोरदार टाळ्या वाजवल्या. अमेरिका गेल्या अनेक दशकांपासून इस्रायलचा प्रमुख मित्रदेश राहिला आहे. या वेळीही अमेरिकेने नेतान्याहूंच्या शब्दांना दिलेला खुला पाठिंबा म्हणजे पॅलेस्टिनी राज्यत्वाच्या मागणीला आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र विरोधाचा सामना करावा लागणार असल्याचे संकेत आहेत.
तथापि, नेतान्याहूंच्या भाषणाचा दुसरा पैलूही लक्षवेधी ठरला. अनेक देशांचे प्रतिनिधी त्यांच्या भाषणापूर्वीच सभागृहातून बाहेर पडले होते. त्यामुळे नेतान्याहू बोलत असताना UNGA हॉल जवळजवळ रिकामाच होता. हे दृश्य इस्रायलविरोधी भूमिकेचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील निषेध असल्याचे मानले जात आहे. यातून इस्रायल सध्या कोणत्याही द्वि-राज्यीय उपायांना तयार नसल्याचे स्पष्ट झाले. इस्रायलची ही कठोर भूमिका पाहता पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.