Israel-Iran War: इराणला मोठा धक्का; इस्त्रायलने सीक्रेट न्यूक्लिअर वेपन प्लांट नष्ट केल्याचा सैन्याचा दावा
जेरूसेलम: सध्या इराण इस्त्रायल संघर्ष अधिकच तीव्र होत चालला आहे. काही दिवसांपूर्वीच इस्त्रायलचे पंतप्रधान यांनी इराणी प्रमुख खामेनेई यांच्यावर टिका केली होती. त्यांनी म्हटले होते की, इराणच्या सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांना इस्त्रायलपेक्षा आपल्या स्वत:च्या जनतेची भिती त्यांना वाटते अशी टिका त्यांनी खामेनेई सरकारवर केली होती. आता इस्त्रायलने आणखी मोठा दावा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इस्त्रायलने म्हटले आहे की, इस्रायलने ऑक्टोबर 2024 मध्ये इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये इराणचे सीक्रेट न्यूक्लिअर वेपन प्लांट नष्ट केले आहे.
इराणचे गुप्त अणु संशोधन केंद्र नष्ट
इस्त्रायली सैन्याच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहिचीनुसार, दोन महिन्यांपूर्वी इराणवर एक मोठा हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये इराणच्या गुप्त अणु संशोधन केंद्राला लक्ष्य करण्यात आले होते. यामुळे इराणच्या या अणवस्त्र संशोधन केंद्राला मोठी हानी झाली. याबाबत एक अहवाल देखील समोर आला आहे. या अहवालानुसार, तेहरानमधील 20 मैल अतंरावर दक्षिण भागांत हवाई हल्ले करण्यात आले होते.
इस्रायलच्या म्हणण्यानुसार, हा भाग तालेघन लष्करी भाग होता. या ठिकाणाला इराणच्या पूर्वीच्या अमाद अणु कार्यक्रमाचा भाग मानले जात असे. मात्र, 2003 मध्ये हा प्रकल्प थांबवण्यात आला होता. परंतु इस्रायलच्या गुप्तचर संस्थेच्या म्हणण्यानुसार, हा प्रकल्प अद्याप सक्रिय होता. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये या भागांतील दोन प्रमुख इमारती पूर्णतः उद्ध्वस्त करण्यात आल्या.
इराणच्या लष्करी संशोधनाला मोठा धक्का
मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यामध्ये प्लास्टिक स्फोटक तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अत्याधुनिक मशिन्स नष्ट झाल्या होत्या. तसेच अण्वस्त्रांच्या रचनेसाठी आणि स्फोटकांसाठीू या यंत्रणा अत्यावश्यक आहेक. इस्त्रायलच्या मते, हा हल्लाया इराणच्या गुप्त लष्करी संशोधनाला मोठा धक्का देणारा ठरला आहे. इराण नागरी वापराच्या नावाखाली अण्वस्त्र कार्यक्रम पुढे नेत असल्याचा दावा इस्त्रायल आणि अमेरिकेने ठामपणे केला आहे.
इराणची प्रतिक्रीया
मात्र, इराणने या हल्ल्यामध्ये कोणतीही मोठी हानी जाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. संयुक्त इरामी मिशननेही यावर कोणती माहिती बोलण्यास नकार दिला आहे. इराणच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या आण्विक कार्यक्रम पूर्णत: शांततापूर्ण उद्देशासाठी आहे. तर इस्त्रायच्या मते, इराणच्या आण्विक प्रकल्प प्रादेशिक आणि जागतिक सुरक्षेसाठी गंभीर आहे.
यामुळे अणस्त्रे विकसित होऊ नयेत यासाठी इस्त्रायल दीर्घ काळापासून प्रयत्न करत आहे. हा हल्ला इस्रायलच्या या रणनीतीचा भाग आहे. इराणच्या आण्विक कार्यक्रमाला मिळालेला हा फटका इराण-इस्रायल तणाव अधिक वाढवण्याची शक्यता निर्माण करतो. त्यामुळे या संघर्षावर जागतिक समुदायाचे लक्ष लागले आहे.