
Iran Protest 2026: जग संपणार? इराणचा नाश निश्चित; 'Wing Of Zion' इस्त्रायलबाहेर, विषय काय?
इराणवर अमेरिका, इस्त्रायलकडून कधी हल्ला होण्याचा अंदाज
भारताचे आपलत्या नागरिकांना देश सोडण्याचे आदेश
इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहूंचे विमान देशाबाहेर रवाना
इराणमधील परिस्थितीत सध्या बिकट होत चालली आहे. इराणच्या खामेनेई सरकारविरोधी आंदोलनाने तीव्र रुप धारणे केले आहे. निदर्शने अधिक हिंसक झाली आहे. इराणवर कोणत्याही क्षणी हल्ला होण्याची शक्यता आहे. अमेरिका किंवा इस्त्रायल कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. त्यातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान यांचे विमान ‘विंग ऑफ जायन’ अचानक इस्त्रायलच्या बाहेर पडून भूमध्य सागराच्या दिशेने निघून गेल्याचे समजते आहे. त्यामुळे जग आता युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पंतप्रधान नेतन्याहूंचे विमान अचानक इस्त्रायलबाहेर गेल्याने इराण इस्त्रायलवर हल्ला करणार अशी देखील चर्चा सुरू झाली आहे. या विमानाने दक्षिण इस्त्रायलच्या एअर फोर्स बेसवरून उड्डाण केल्याचे समोर आले आहे. याआधी देखील तणावाचे वातावरण असताना हे विमान इस्त्रायलच्या बाहेर गेले आहे. जेव्हा-जेव्हा इराणविरुद्ध संघर्ष तीव्र होतो, तेव्हा हे विमान इस्त्रायलच्या बाहेर पाठवले जाते.
13 एप्रिल 2024 मध्ये देखील इराणने मिसाईल हल्ला केल्यावर ‘विंग ऑफ जायन’ हे विमान इस्त्रायलबाहेर पाठवण्यात आले होते. हे विमान ज्या एअरबेसवर असते, तोच एअरबेस इराणने लक्ष्य केला होता. त्यानंतर 13 जून रोजी इस्त्रायलने इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ला केला होता. त्यानंतर काही वेळाने हे विमान इस्त्रायलच्या बाहेर गेले होते.
इराणमधील परिस्थिती बिकट
इराणमधील परिस्थितीत सध्या बिकट होत चालली आहे. इराणच्या खामेनेई सरकारविरोधी आंदोलनाने तीव्र रुप धारणे केले आहे. निदर्शने अधिक हिंसक झाली आहे. यामुळे प्रचंड अस्थिरतेचे वातावरण पसरले आहे. या निदर्शनांमध्ये आतापर्यंत २००० लोकांचा मृत्यू झाल्याचे आणि अनेजण जखमी झाल्याचे समोर आले आहे. याच वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत.
Iran Crisis : इराणमधील परिस्थिती बिकट! MEA चा भारतीयांना तातडीने देश सोडण्याचा इशारा
तेहरानमधील भारतीय दूतावासाने इराणमधील भारतीय नागरिकांसाठी सूचना जारी केला आहेत. या सूचनांमध्ये दूतावासाने पर्यटकांना व्यावसायिक उड्डाणांसह उपलब्ध असलेल्या पर्यायांचा वापर करत इराण सोडण्याचा सल्ला दिला आहेत. सध्या इराणमधील परिस्थिती भयकंर झाली असल्यानेच हा इशारा जारी करण्यात आला आहे. शिवाय इराणविरोधी अमेरिकेच्या संभाव्य हल्ल्याची शक्यताही वाढली आहे. यामुळे दूतावासेन भारतीय नागरिकांना सर्तक राहण्याचे आणि अशांततेच्या प्रदेशात प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.