रक्ताने माखले इराणचे रस्ते! केवळ दोन रात्रीत १२,००० लोकांचा नरसंहार? खामेनींच्या 'डेथ ऑर्डर'ने जग हादरले; पाहा भीषण वास्तव ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Iran protest massacre 12000 killed report : इराणमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या जनआक्रोशाने आता अशा थराचा हिंसक वळण घेतले आहे, ज्याची कल्पनाही करवत नाही. ‘इराण इंटरनॅशनल’ (Iran International) या प्रतिष्ठित वृत्तसंस्थेने दिलेल्या खळबळजनक अहवालानुसार, ८ आणि ९ जानेवारीच्या रात्री इराणमध्ये आधुनिक इतिहासातील सर्वात मोठे हत्याकांड घडले आहे. सरकारी आणि सुरक्षा सूत्रांच्या हवाल्याने या अहवालात दावा करण्यात आला आहे की, केवळ ४८ तासांत किमान १२,००० निष्पाप नागरिकांना सुरक्षा दलांनी ठार केले आहे.
जेव्हा इराण सरकारने संपूर्ण देशातील इंटरनेट सेवा खंडित केली होती, तेव्हा जगाला वाटले की ही केवळ माहिती दाबण्याची प्रक्रिया आहे. मात्र, त्या ‘डिजिटल अंधारा’च्या आड एक भीषण नरसंहार शिजत होता. सूत्रांनुसार, इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने ‘शूट टू किल’ (बघताच क्षणी गोळ्या घालण्याचे) आदेश दिले होते. रस्ते, गल्लीबोळ आणि अगदी रुग्णालयांच्या बाहेरही आंदोलकांवर मशीनगनने गोळीबार करण्यात आला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Video Viral: फोर्ड प्लांटमध्ये ट्रम्पला राग अनावर; ‘पीडोफाईल प्रोटेक्टर ‘ म्हणणाऱ्या माणसाकडे पाहून केले आक्षेपार्ह हावभाव
हा हिंसाचार उत्स्फूर्त नव्हता, तर तो सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या थेट मार्गदर्शनाखाली आखलेला एक क्रूर कट होता, असे अहवालात म्हटले आहे. या कारवाईला इराणच्या तिन्ही प्रमुख शाखांची मान्यता होती. इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) आणि बासिज मिलिशियाने (Basij) मशहाद, इस्फहान आणि केरमानशाह सारख्या शहरांमध्ये तरुण आंदोलकांना लक्ष्य केले. मृतांपैकी ७०% पेक्षा जास्त लोक हे ३० वर्षांखालील ‘जेन झेड’ (Gen Z) पिढीतील तरुण आहेत, ज्यांना इराणचे भविष्य मानले जात होते.
🚨 BREAKING: The Iranian revolution is an unstoppable tsunami! In Iran, 2,000 protesters died in 48 hours. Islamist Khamenei has shut off the Internet.
Elon Musk opened up Starlink.#DigitalBlackoutIran #Iran #Trump #IranRevolution2026 #Israel #USA #UK #Tehran #Australia #NYC pic.twitter.com/eCHcwAySUC — Bhāratavarṣam (@OriginsOfIndia) January 11, 2026
credit : social media and Twitter
इराण सरकारने हा नरसंहार लपवण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली आहे. स्थानिक वर्तमानपत्रे बंद करण्यात आली असून, केवळ सरकारी टीव्ही चॅनेल (IRIB) वरून चुकीची माहिती पसरवली जात आहे. डॉक्टरांना आणि परिचारिकांना धमकावण्यात आले आहे की त्यांनी मृतांचा आकडा कोणालाही सांगू नये. तरीही, काही धाडसी वैद्यकीय कर्मचारी आणि प्रत्यक्षदर्शींनी ‘इराण इंटरनॅशनल’ला दिलेल्या माहितीनुसार, शवागारे मृतदेहांनी तुडुंब भरली असून अनेक मृतदेहांची विल्हेवाट गुपचूप लावली जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Protests : ‘हल्ला केल्यास स्वतःचीच कबर खोदून घ्याल’ इराणच्या समर्थनात उभे ठाकले ‘हे’ तीन शक्तिशाली देश; डोनाल्ड ट्रम्प हैराण
मानवाधिकार कार्यकर्त्या मसिह अलिनजाद यांनी या घटनेला ‘युद्ध गुन्हे’ (War Crimes) म्हटले आहे. अॅम्नेस्टी इंटरनॅशनल आणि ह्युमन राइट्स वॉच यांनी या सामूहिक हत्याकांडाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. इंटरनेट नसल्यामुळे इराणमधील लोकांचा आवाज जगापर्यंत पोहोचत नाहीये, पण ‘स्टारलिंक’ (Starlink) आणि इतर उपग्रह माध्यमांतून बाहेर येणारे व्हिडिओ इराणमधील या भयानक क्रूरतेची साक्ष देत आहेत.
Ans: 'इराण इंटरनॅशनल'च्या अहवालानुसार ८-९ जानेवारी २०२६ दरम्यान किमान १२,००० लोक मारले गेल्याचा दावा करण्यात आला आहे, जो इराणच्या आधुनिक इतिहासातील सर्वात मोठा आकडा आहे.
Ans: सर्वोच्च नेते अली खामेनी आणि सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेला या पूर्वनियोजित हत्येसाठी जबाबदार धरले जात आहे.
Ans: सुरक्षा दलांनी केलेल्या क्रूर कारवाईची आणि मोठ्या प्रमाणात झालेल्या जीवितहानीची माहिती जगापासून लपवण्यासाठी सरकारने इंटरनेट ब्लॅकआउट केला होता.






