Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle-East Tension: खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणचा ‘विनाशकारी’ अवतार; अमेरिकन नौदलाच्या ताफ्यावर हल्ला, आता Trump काय करणार?

इराणने रविवारी अमेरिकेची बलाढ्य युद्धनौका 'अब्राहम लिंकन' हिला लक्ष केल्याचा दावा केला आहे. चार बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने हा भीषण हल्ला करण्यात आल्याचे इराणच्या अधिकृत वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 01, 2026 | 08:33 PM
खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणचा 'विनाशकारी' अवतार (Photo Credit - X)

खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणचा 'विनाशकारी' अवतार (Photo Credit - X)

Follow Us
Follow Us:

  • खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणचा ‘विनाशकारी’ अवतार
  • अमेरिकन नौदलाच्या ताफ्यावर हल्ला
  • आता Trump काय करणार?
Middle-East Tension: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येनंतर इराण आणि अमेरिका-इस्रायलमधील संघर्ष आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. इराणने रविवारी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत अमेरिकेची बलाढ्य युद्धनौका ‘अब्राहम लिंकन’ (Abraham Lincoln) हिला लक्ष केल्याचा दावा केला आहे. चार बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने हा भीषण हल्ला करण्यात आल्याचे इराणच्या अधिकृत वृत्तसंस्थेने म्हटले आहे. या घटनेमुळे डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून संपूर्ण जगात युद्धाचा धोका वाढला आहे.

‘ऑपरेशन ट्रू प्रॉमिस ४’ अंतर्गत मोठी कारवाई

इराणची अधिकृत न्यूज एजन्सी ‘इर्ना’ (IRNA) आणि ‘इराणी रिव्होल्युशनरी गार्ड्स’ने (IRGC) जारी केलेल्या चौथ्या निवेदनानुसार, ही कारवाई ‘ऑपरेशन ट्रू प्रॉमिस ४’ चा भाग आहे. खामेनेईंच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराणच्या सशस्त्र दलांनी अमेरिका आणि इस्रायलच्या विविध ठिकाणांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. याच मोहिमेअंतर्गत अमेरिकन एअरक्राफ्ट कॅरिअरवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला.

The IRGC in its 4th statement regarding Operation True Promise 4, announced: Following the Iran’s Armed Forces’ actions and the attack on the targets of the US-Israeli enemies, the US military’s aircraft carrier, the Abraham Lincoln, was struck by four ballistic missiles. — IRNA News Agency ☫ (@IrnaEnglish) March 1, 2026

“समुद्र आणि जमीन शत्रूसाठी स्मशानभूमी ठरेल” – IRGC

युद्धनौकेवर हल्ला केल्यानंतर ‘इराणी रिव्होल्युशनरी गार्ड्स’ने अमेरिकेला थेट इशारा दिला आहे. आयआरजीसीने म्हटले की, “आम्ही चार बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी अमेरिकन एअरक्राफ्ट कॅरिअर ‘लिंकन’ला अचूक लक्ष्य केले आहे. दहशतवादी हल्लेखोरांसाठी आता ही जमीन आणि समुद्र वेगाने स्मशानभूमी ठरू लागला आहे.” दरम्यान, अयातुल्ला खामेनेई यांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी इराणने आखाती देशांमधील अमेरिकन हालचालींना उत्तर देण्यास सुरुवात केल्याने तणाव कमालीचा वाढला आहे.

Iran-Israel युद्धाचा मोठा फटका हवाई वाहतुकीवर! मध्यपूर्वेतील १८०० हून अधिक विमाने रद्द; हजारो प्रवासी विमानतळांवर अडकले

अबू धाबीच्या नौदल तळावर ड्रोन हल्ला

केवळ अमेरिकन युद्धनौकाच नव्हे, तर इराणने संयुक्त अरब अमिरातीमधील (UAE) तळांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. यूएईच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अबू धाबी येथील ‘अल सलाम’ नौदल तळावर इराणने ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यामुळे तळावरील गोदामाला मोठी आग लागली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, ड्रोन हल्ल्यामुळे दोन कंटेनर जळून खाक झाले असून विशेष सुरक्षा पथकाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे.

अमेरिकेची भूमिका अद्याप अस्पष्ट

इराणने आपल्या युद्धनौकेवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा केला असला तरी, अमेरिकन संरक्षण विभाग किंवा ट्रम्प प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. ‘अब्राहम लिंकन’ या युद्धनौकेचे नेमके किती नुकसान झाले आहे, याची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते. खामेनेईंच्या निधनानंतर इराणचे स्वरूप अधिक ‘विनाशकारी’ झाले असून, त्यांनी पुकारलेल्या या उघड युद्धामुळे येत्या २४ तासांत मध्य पूर्वेतील समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Israel Vs Iran War: इराणचे राष्ट्राध्यक्ष संतापले! खामेनेईंच्या मृत्यूचा बदला घेणार; ‘या’ मोठ्या घोषणेमुळे जागतिक विश्वात खळबळ

Web Title: Irans destructive incarnation after khameneis death attack on us navy fleet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 08:33 PM

Topics:  

  • America
  • Dolald Trump
  • Iran-Israel War

संबंधित बातम्या

Trump Tariff : कॅनडावरील टॅरिफला अमेरिकेतच विरोध; ५७% नागरिक नाराज
1

Trump Tariff : कॅनडावरील टॅरिफला अमेरिकेतच विरोध; ५७% नागरिक नाराज

Barron Trump बॅरन ट्रम्पला कुठे मारायचे? इराणच्या हिटलिस्टवर ट्रम्प यांचा मुलगा; 10 दशलक्ष डॉलर बक्षीस अन्  3D VIDEO
2

Barron Trump बॅरन ट्रम्पला कुठे मारायचे? इराणच्या हिटलिस्टवर ट्रम्प यांचा मुलगा; 10 दशलक्ष डॉलर बक्षीस अन् 3D VIDEO

Ashwini Bhave USA Home: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी मराठी कलाकारांची खास भेट; घराजवळची बाग पाहून नीना कुलकर्णी भारावल्या
3

Ashwini Bhave USA Home: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी मराठी कलाकारांची खास भेट; घराजवळची बाग पाहून नीना कुलकर्णी भारावल्या

US Space Academy: अंतराळ युद्धाची तयारी की चंद्र-मंगळावर वर्चस्वाचा प्लॅन? अमेरिकेने केली जगातील पहिल्या ‘स्पेस अकादमी’ची घोषणा
4

US Space Academy: अंतराळ युद्धाची तयारी की चंद्र-मंगळावर वर्चस्वाचा प्लॅन? अमेरिकेने केली जगातील पहिल्या ‘स्पेस अकादमी’ची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.