Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel Syria War : पुढची NEWS सांगायचीही संधी न देता, इस्रायलने केला थेट सीरियन टीव्ही चॅनेलवरच बॉम्बहल्ला; पाहा VIRAL VIDEO

Israel Air Strikes on Syria: सुवेदा येथून सीरियन सैन्याला माघार घेण्याचा इशारा दिल्यानंतर इस्रायलने ही कारवाई केली आहे. सुवेदामध्ये सक्तीची कारवाई सुरूच राहील असे इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 17, 2025 | 11:19 AM
Israeli airstrike hits during Syrian anchor's live broadcast she flees in fear

Israeli airstrike hits during Syrian anchor's live broadcast she flees in fear

Follow Us
Close
Follow Us:

Israel Syria War Viral Video : सीरियातील राजधानी दमास्कसमध्ये एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एका स्थानिक टीव्ही चॅनेलवर महिला अँकर थेट प्रक्षेपणात बातम्या वाचत असताना, इस्रायली हवाई दलाने अचानक बॉम्बहल्ला केला. स्फोट इतका प्रचंड होता की अँकर घाबरून स्टुडिओतून धावत बाहेर पडली. या घटनेचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

इस्रायलकडून दमास्कसमध्ये थेट हल्ला

१६ जुलै २०२५ रोजी इस्रायलने सीरियाविरुद्ध कारवाईचा मोठा टप्पा सुरू केला. इस्रायली लष्कराने सीरियाची राजधानी दमास्कसमधील संरक्षण मंत्रालयाजवळ आणि राष्ट्रपती राजवाड्याजवळ ड्रोनच्या माध्यमातून हल्ले केले. या हल्ल्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सीरियन लष्करी तळ आणि प्रशासनावर दबाव आणणे.  इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गालांत आणि इस्रायल काट्झ यांनी सोशल मीडियावरून या कारवाईची पुष्टी केली आहे. मंत्री काट्झ यांनी सांगितले की, “दमास्कसच्या संरक्षण मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर अचूक हल्ला केला गेला असून, हे हल्ले आता सुरूच राहणार आहेत.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 8 वर्षांची तपश्चर्या! रशियाची ‘ती’ रहस्यमय साध्वी, गोकर्ण जंगलात गुहा, गुहेत रुद्र मूर्ती; वाचा ‘ही’ गूढ रंजक कहाणी

सुवैदामधील संघर्ष आणि ड्रुझ समुदायाच्या रक्षणाची जबाबदारी

सध्या सीरियाच्या दक्षिणेकडील सुवैदा भागात स्थानिक सुरक्षा दल आणि ड्रुझ समुदाय यांच्यात संघर्षाचे वातावरण तापले आहे. ड्रुझ हा एक धार्मिक वांशिक समुदाय असून, त्यांची उपस्थिती सीरिया, लेबनॉन, जॉर्डन आणि इस्रायलमध्ये आढळते. इस्रायलने उघडपणे जाहीर केले आहे की ते सीरियामधील ड्रुझ लोकांच्या संरक्षणासाठी आयडीएफ (इस्रायली डिफेन्स फोर्सेस) मार्फत कारवाई करत आहेत. सुवैदामधून सीरियन सैन्य माघारी जाईपर्यंत इस्रायलचा हल्ला सुरूच राहील, असा स्पष्ट इशारा इस्रायलने दिला आहे. “आमचे इशारे संपले आहेत. आता कठोर कारवाई होणार,” असे इस्रायली संरक्षणमंत्र्यांनी ठणकावले.

החלו המכות הכואבות pic.twitter.com/1kJFFXoiua — ישראל כ”ץ Israel Katz (@Israel_katz) July 16, 2025

credit : social media

तिसऱ्या दिवशीही सलग हल्ला; सीरियन लष्कराचे मोठे नुकसान

हा इस्रायलकडून सलग तिसऱ्या दिवशी सीरियावर हल्ला करण्यात आला आहे. मंगळवारी (१५ जुलै) इस्रायली हवाई दलाने सुवैदा आणि आसपासच्या सीरियन सैन्याच्या गाड्यांच्या काफिल्यावर हल्ला केला. यामध्ये अनेक सैनिक जखमी आणि ठार झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यामुळे स्थानिक ड्रुझ समुदाय, बेदौइन जमाती आणि सीरियन सरकारमध्ये निर्माण झालेल्या संघर्षात आणखी तीव्रता आली आहे.

थेट अँकरवर बॉम्बहल्ला  भयचकित करणारा क्षण

या सर्व घडामोडींमध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे एका महिला अँकरवर थेट प्रक्षेपणादरम्यान झालेला हल्ला. स्फोटाचा आवाज आणि धुराचे लोट स्टुडिओपर्यंत पोहोचले आणि अँकर घाबरून धावत बाहेर गेली. हे दृश्य पाहून संपूर्ण जग हादरले असून, युद्धाची भीषणता किती टोकाची जाऊ शकते, याचे जिवंत उदाहरण ठरले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ब्रह्मांड अफाट आहे! पृथ्वीभोवती फिरत आहेत ‘लपलेले चंद्र’? संशोधनातून उघड झाले मिनीमूनचे अद्भुत रहस्य

सीरिया-इस्रायल संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता

सीरियामधील लष्करी हालचाली, ड्रोन हल्ले आणि ड्रुझ समुदायाशी संबंधित राजकीय समीकरणांमुळे परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली आहे. दोन्ही देशांतील तणाव दिवसेंदिवस वाढत असून, या संघर्षाचे पडसाद संपूर्ण पश्चिम आशियावर उमटू शकतात.

Web Title: Israeli airstrike hits during syrian anchors live broadcast she flees in fear

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2025 | 11:19 AM

Topics:  

  • Israel
  • Israel Attack
  • Syria
  • syria news
  • third world war

संबंधित बातम्या

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा
1

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

Israel जगाचा नाश करणार! ‘या’ देशाचा खेळ खल्लास; अमेरिकेतून नेत्यानाहूंनी दिला भयंकर इशारा
2

Israel जगाचा नाश करणार! ‘या’ देशाचा खेळ खल्लास; अमेरिकेतून नेत्यानाहूंनी दिला भयंकर इशारा

Israel Maritime : इस्रायलने पाकिस्तानकडे जाणाऱ्या तेल टँकरवर केला हल्ला; 24 क्रू मेंबर्सना ठेवले ओलीस
3

Israel Maritime : इस्रायलने पाकिस्तानकडे जाणाऱ्या तेल टँकरवर केला हल्ला; 24 क्रू मेंबर्सना ठेवले ओलीस

आशेचा किरण की आणखी एक राजकीय वादळ? 50 जहाजांचा ‘हा’ ताफा इस्रायल आणि अमेरिकेसाठी डोकेदुखी; गाझाच्या दिशेने रवाना
4

आशेचा किरण की आणखी एक राजकीय वादळ? 50 जहाजांचा ‘हा’ ताफा इस्रायल आणि अमेरिकेसाठी डोकेदुखी; गाझाच्या दिशेने रवाना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.