Israel’s PM Benjamin Netanyahu to visit Hungary despite ICC arrest warrant
नवी दिल्ली: एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या संभाव्य अटकेबद्दल आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमनेस्ट इंटरनेशनलने हंगेरी सरकराला नेतन्यांहून हंगेरीत आल्यास अटक करण्याची मागमी केली आहे. एमनेस्टी इंटरनॅशलने हंगेरी सरकारला नेतन्याहूंना अटक करुन इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट (ICC) कडे सोपवण्यास सांगितले आहे.
एमनेस्टीच्या या मागणीने खळबळ उडाली असून ही मागणी अशा वेळी करम्यात आली आहे जेव्हा पंतप्रदान बेंजामिन नेतन्याहू हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ओर्बन यांच्या निमंत्रणावर जाणार आहेत.
गेल्या वर्षी नोव्हेंबर 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (ICC) इस्रायल पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंविरोधात अटक वॉरंट जारी केले होते.य नेतन्याहूंवर गाझा युद्धादरम्यान युद्ध गुन्हे आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांचा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये भूकेला एक शस्त्र म्हणून वापरणे, सामान्य नागरिकांवरील हल्ले, हत्या आणि छळाचा समावेश आहे.
हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ओर्वन यांचे नेतन्याहूंशी घनिष्ठ संबंध आहेत. यामुळे ओर्बन ICC चे अटक वॉरंट लागू करणार नाही असे संकेत दिले जाक आहे. मात्र हंगेरी ICC चा सदस्य असल्याने त्यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेसांचे पालन करणे बंधनकारक आहे.
दरम्यान एमनेस्टी इंटरनॅशनलच्या जागतिक धोरण प्रमुख एरिका ग्वेरा-रोसास यांनी म्हटले आहे की, नेतन्याहूंना अटक झाली नाही, तर भविष्यामध्ये इस्रायलला गंभीर गुन्हे करण्यास प्रोत्साहन मिळेल.
एमनेस्टी इंटरनॅशनलच्या म्हणण्यानुसार नेतन्याहूंच्या हंगेरी दौरा ICC आणि आंतरराष्ट्रीय कायद्याची अवहेलना आहे. यामुळे युरोपियन युनियनचा हंगेरीवर दबाव वाढत आहे. नेतन्याहूंन अटक करण्यासाठी युरोपियन नेत्यांनीही हंगेरीकडे मागणी केली आहे.
सध्या हंगेरी सरकारकडून आणि इस्रायलकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र यामुळे युरोपमध्ये मानवाधिका आणि आंतरराष्ट्रीय न्याय व्यवस्थेत मोठी चर्चा सुरु आहेय हंगेरीने ICC च्या आदेशांचे पालने न केल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची शक्यता आहे. सध्या इस्रायल गाझा युद्धावरुन आंतरराष्ट्रीय टीकांचा सामाना करत आहे.शिवाय नेतन्याहूंच्या संभाव्य. अटकेमुळे इस्रायलसाठी नवीन कूटनीतिक संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे सध्या मोठी खळबळ उडाली असून हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे की, हंगेरी आपल्या मित्र देशाची साथ देणार की, न्यायव्यवस्थेचा बाजूने उभा राहणार.