इस्त्रायलचा लेबनॉनवर पुन्हा कहर; हवाई हल्ल्यात लहान मुलांसह 40 जणांचा मृत्यू
जेरूसेलम: गेल्या काही महिनाभरापासून इस्त्रायल व लेबनॉनमधील संघर्ष गंभीर बनला आहे. इस्त्रायली सैन्य सातत्याने लेबनॉनवर हवाई हल्ले करत आहे. या हवाई हल्ल्यामध्ये अनेक नागिकांनी आपला जीव गमवला आहे. दरम्यान इस्त्रायलने पुन्हा एकदा लेबनॉनवर हवाई हल्ला केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यांमध्ये किमान 40 लोकांचा मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये महिलांसह लहान मुलांचा देखील समावेश आहे.
टायर आणि बालबेक या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस
मीडिया रिपोर्टनुसार, इस्त्रायल लष्कराने हे हल्ले टायर आणि बालबेक या शहरांवर केले आहेत. यामुळे या भांगांमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. टायर शहराच्या किनारपट्टीवर इस्त्रायलने हल्ला करण्यापूर्वी काही भाग रिकामे करण्याचे आदेश दिले होते असे इस्त्रायली संरक्षण दलाने सांगितले आहे. परंतु आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यापूर्वी कोणताही अधिकृत इशारा मिळाला नव्हता. यामुळे अनेक नागरिकांचे प्राण गेले आहेत.
हे देखील वाचा- उत्तरी गाझामध्ये इस्त्रायलची हल्ल्यांची मालिका सुरूच; बॉम्बफेकमध्ये 10 जणांचा मृत्यु
पाठोपाठ दोन दिवस इस्त्रायचे लेबनॉनवर हल्ले सुरूच
लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री झालेल्या हवाई हल्ल्यात सात लोक ठार झाले आणि मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. बचाव कार्य सुरू असून मृतांच्या अवयवांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी केली जात आहे. त्यानंतर झालेल्या अन्य हल्ल्यात 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये हिजबुल्ला व त्याचा सहयोगी अमल गटातील सात डॉक्टरांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. इस्रायली हल्ल्यांमुळे लेबनॉनमधील अनेक नागरिक विस्थापित झाले आहेत.
हिजबुल्लाच्या पायाभूत सुविधांवर हल्ले
इस्रायलच्या सैन्याने हिजबुल्लाच्या पायाभूत सुविधांवर हल्ले केले असून त्यामध्ये त्यांचे शस्त्रागार, ऑपरेशनल अपार्टमेंट आणि इतर महत्त्वपूर्ण स्थळांचा समावेश आहे. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने याबाबत एक अहवाल जारी केला आहे. अहवालानुसार, गेल्या वर्षभरात इस्रायलच्या हल्ल्यांमुळे 3,136 लोकांचा मृत्यू झाला असून जवळपास 15,979 लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये लहान मुले आणि महिलांचाही समावेश आहे.
संघर्ष अधिकच तीव्र
मात्र इस्त्रायचे लेबनॉनवरील हल्ले सुरूच आहेत. या संघर्षाला आणखी धार मिळाली आहे. कारण हिजबुल्लाहने प्रत्युत्तरादाखल इस्रायलवर रॉकेट आणि ड्रोन हल्ले केले आहेत. त्यांनी तेल अवीवजवळील एका लष्करी कारखान्यावर हल्ला केला. सप्टेंबरपासून संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढत चालला आहे. शांतता स्थापनेसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न होणे आवश्यक आहे.
हे देखील वाचा- ब्रिटनच्या दिवाळीपार्टीत मटन-चिकनचा मेन्यू; ब्रिटीश हिंदूमध्ये तीव्र नाराजी