फोटो सौजन्य: सोशल मीडिया
लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी दिवाळी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. लंडनमधील 10 डाउनिंग स्ट्रीट येथे पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सामुदायिक नेते, राजकीय नेते आणि हिंदू समुदायातील प्रमुख व्यक्तींनी आपली उपस्थिती दर्शवली होती. कार्यकर्माच्या सुरूवातील दिवे लावण, पारंपारिक कुचीपुडी नृत्याचे सादरीकरण आणि पंप्रधानांचे भाषण असे कार्क्रम सादर करण्यात आले. मात्र या कार्यक्रमामध्ये मांसाहारी जेवण आणि मद्याचा समावेश असल्यामुळे ब्रिटनमधील हिंदू समुदायाचे लोकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
ब्रिटनमधील हिंदू समाजाच्या धार्मिक भावनांना धक्का
दिवाळीच्या पवित्र सणाचे आयोजन पारंपरिक पद्धतीने मांस-मद्यविना साजरी केली जाते. मात्र, ब्रिटनच्या यावर्षीच्या पार्टीत लँब कबाब, बिअर, आणि वाईनसारखे पदार्थ पाहुण्यांना दिले गेले. यामुळे ब्रिटनमधील हिंदू समाजाच्या धार्मिक भावनांना धक्का बसला आहे. प्रख्यात हिंदू पंडित सतीश के शर्मा यांनी पंतप्रधान कार्यालयावर “संवेदनशीलता आणि साध्या सल्लामसलतीचा अभाव” असल्याचा आरोप केला आहे. सतीश के शर्मा यांनी नमूद केले की, मागील 14 वर्षांपासून डाउनिंग स्ट्रीटमधील दिवाळी कार्यक्रमात मांस आणि मद्यविना हा सण साजरा केला गेला. मात्र यावेळी अचानक मांसाहारी पदार्थांचा समावेश करण्यात आल्याचे पाहून हिंदू समाजात तीव्र अस्वस्थता पसरली आहे.
पंतप्रधानांना एक औपचारिक नोटीस
सतीश के शर्मा यांनी निराशा व्यक्त केली असून त्यांनी म्हटले आहे की, मांसाहार आणि मद्याचा समावेश दिवाळीच्या पवित्रतेचा अपमान आहे. याबाबत सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी पंतप्रधानांच्या सल्लागारांना या बाबतीत अधिक जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय त्यांनी पंतप्रधानांना एक औपचारिक नोटीसही पाठवली आहे. या नोटीसमध्ये त्यांनी हिंदू समुदायाच्या धार्मिक भावनांचा आदर करण्याची मागणी केली आहे.
ब्रिटीश हिंदू आणि भारतीय समुदायाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्थांमध्ये नाराजी
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटीश हिंदू आणि भारतीय समुदायाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एनसाएट संस्था युकेनेही या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या संस्थांच्या म्हणण्यानुसार, दिवाळीच्या पवित्र सणात मांस आणि मद्याचा समावेश करणे हा धार्मिक परंपरांचा अपमान आहे. त्यांनी डाउनिंग स्ट्रीटला या मुद्द्यावर अधिक जागरूकता ठेवण्याचे आणि भविष्यात असेच आयोजन करण्यापूर्वी धार्मिक भावना लक्षात घेण्याचे आवाहन केले आहे.
हिंदू समाजाकडून घटनेचा तीव्र निषेध व्यक्त
या कार्यक्रमामुळे ब्रिटनमधील हिंदू समुदायात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका ऑनलाइन पोस्टमध्येही म्हटले आहे की, मेन्यू निवडीमुळे दिवाळी सणाच्या धार्मिक परंपरांविषयी आदर आणि समज नसल्याचे स्पष्ट होते. ब्रिटनमधील हिंदू समाजाने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला असून, भविष्यात अशा चुकांची पुनरावृत्ती टाळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
हे देखील वाचा- युक्रेनचा रशियावर मोठा हल्ला; मॉस्कोच्या शस्त्रास्त्र कारखान्यावर ड्रोनचा कहर