'Joy Bangla' आता बांगलादेशाची राष्ट्रीय घोषणा नाही; सर्वाेच्च न्यायालयाचा आदेश
ढाका: बांगलादेशातील सुप्रीम कोर्टाने मोहम्मद युनूस सरकारच्या याचिकेवर एक मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार, ‘Joy Bangla’ आता देशाची राष्ट्रीया घोषणा राहणार नाही. या निर्णयामुळे बांगलादेशातीय राजकीय वातावरणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. पूर्व राष्ट्रपती व बांग्लादेशचे संस्थापक शेख मुजीबुर्रहमान यांच्या फोटोला आधीच चलनी नोटांवरून हटविण्यात आले आहे. आता ‘Joy Bangla’ या नाऱ्याला राष्ट्रीय दर्जा नाकारून त्याऐवजी नव्या नाऱ्याचा विचार सुरू आहे.
शेख मुजीबुर्रहमान यांच्या विचारसरणीशी संबंधित अनेक गोष्टींना हटवण्याचा मोहम्मद यूनुस सरकारचा हा निर्णय मानला जात आहे. बांगलादेशात शेख हसीना यांच्या देश सोडून गेल्यानंतर मोहम्मद युनूस सरकार मोठे बदल करत आहे. 2022 मद्ये बांगलादेशाच्या उच्च न्यालयाने जॉय बांगला हा राष्ट्रीय नारा घोषित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शाळा, महाविद्यावये तसेच शासकीय कार्यक्रमांमध्ये हा नारा बंधनकारक करण्यात आला होता. मात्र, मोहम्मद यूनुस सरकारने या आदेशाला आव्हान दिले आणि सुप्रीम कोर्टात विशेष याचिका दाखल केली.
तख्तापलटानंतर युनूस सरकारकडून मोठे बदल
10 डिसेंबर 2024 रोजी सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीश सैयद रिफात अहमद यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निर्णय दिला की ‘Joy Bangla’ राष्ट्रीय नारा म्हणून राहणार नाही. या संदर्भात सरकारचे प्रतिनिधित्व करणारे अतिरिक्त ॲटर्नी जनरल अनीक आर हक यांनी न्यायालयासमोर सरकारची बाजू मांडली. यापूर्वी, चालू महिन्यात मोहम्मद यूनुस सरकारने चलनी नोटांवरील शेख मुजीबुर्रहमान यांची प्रतिमा काढून, त्याऐवजी धार्मिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक घटकांचे चित्रण करण्याचा निर्णय घेतला होता.
तसेच, ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या तख्तापलटानंतर माजी पंतप्रधान शेख हसीना देश सोडून गेल्यापासून सरकारकडून मोठे बदल केले जात आहेत. या निर्णयामुळे बांग्लादेशच्या राष्ट्रीय ओळखीत बदल होण्याची शक्यता आहे. ‘Joy Bangla’ हा नारा 1971 च्या स्वातंत्र्यलढ्याशी जोडलेला असल्याने अनेकांचे भावनिक संबंध आहेत. तरीही, या बदलांमुळे बांग्लादेशात नवा राजकीय अध्याय सुरू होत असल्याचे जाणवते. पुढे या नाऱ्याच्या जागी काय स्वीकारले जाते, याकडे देशाचे व जगाचे लक्ष असेल.
शेख हसीना यांचा मोहम्मद यूनुस यांच्यावर आरोप
तसेच बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी मोहम्मद यूनुस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शेख हसीना यांनी म्हटले आहे की, यूनुस यांनी देशात अस्थिरता निर्माण केली असून, हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध यांसारख्या अल्पसंख्याकांवर हल्ल्यांसाठी त्यांना जबाबदार धरले आहे.