Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्त कार्यालयाबाहेर खलिस्तानी समर्थकांकडून तिरंग्याचा अपमान, सुरक्षेत कुचराई करणाऱ्या ब्रिटनला भारत सरकारनं विचारला जाब

भारत सरकारने ब्रिटिश राजनैतिक अधिकाऱ्यांकडून भारतीय उच्चायुक्तांच्या सुरक्षेत झालेल्या कुचराईबद्दलही नाराजी व्यक्त केली आहे. आंदोलकांना भारतीय उच्चायुक्तांच्या कार्यालय परिसरात येण्यापासून थांबवण्यात आलं नाही. त्यावेळी ब्रिटिश सुरक्षा पूर्णपणे अनुपस्थित होती.

  • By साधना
Updated On: Mar 20, 2023 | 12:40 PM
khalistani disownes tiranga

khalistani disownes tiranga

Follow Us
Close
Follow Us:

लंडन : पंजाबमध्ये अमृतपाल सिंग (Amrutpal Singh) याच्या विधानांनंतर गेल्या काही दिवसांपासून पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे. त्याचे पडसाद थेट लंडनमध्ये उमटले असून तेथील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाबाहेर खलिस्तानी समर्थकांनी आंदोलन (Khalistani Attack On Indian High Commission Office Flag) केलं आहे. या समर्थकांनी कार्यालयाबाहेरच्या भारतीय राष्ट्रध्वज अर्थात तिरंग्याचाही अपमान केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावेळी अमृतपाल सिंग याच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकारावर भारत सरकारनं (Indian Government) ब्रिटनला सुनावलं आहे.

[read_also content=”गॅँगस्टरने आता ईमेलवरून दिली सलमान खानला धमकी, गॅलॅक्सीवर वाढला पोलिसांचा पहारा, मुंबई पोलिसांची उडाली झोप https://www.navarashtra.com/movies/salman-khan-security-increased-after-threatening-via-email-nrsr-377220.html”]

लंडनमध्ये काही कथित खलिस्तानी समर्थकांनी भारतीय उच्चायुक्त कार्यालयाबाहेर केलेल्या आंदोलनादरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान केला. या आंदोलनादरम्यान भारताचा राष्ट्रध्वज खाली उतरवण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. मात्र, वेळीच भारतीय उच्चायुक्ताच्या सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

#WATCH | United Kingdom: Khalistani elements attempt to pull down the Indian flag but the flag was rescued by Indian security personnel at the High Commission of India, London.

(Source: MATV, London)

(Note: Abusive language at the end) pic.twitter.com/QP30v6q2G0

— ANI (@ANI) March 19, 2023

या घटनेचा भरत सरकारकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर याविषयीची प्रेस रिलीज शेअर केली आहे. “ब्रिटनच्या भारतातील सर्वात ज्येष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांना नवी दिल्लीत हजर राहण्याचे आदेश भारत सरकारने दिले आहेत. लंडनमधील प्रकाराबद्दल भारतानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे”, असं यात लिहिलं आहे.

India lodges strong protest with UK.

Press Release ➡️ https://t.co/Apz9tgy1Ki pic.twitter.com/PV2VyUw1Lt

— Arindam Bagchi (@MEAIndia) March 19, 2023

सुरक्षेत कुचराई केल्याबद्दल नाराजी
यावेळी भारत सरकारने ब्रिटिश राजनैतिक अधिकाऱ्यांकडून भारतीय उच्चायुक्तांच्या सुरक्षेत झालेल्या कुचराईबद्दलही नाराजी व्यक्त केली आहे. “या आंदोलकांना भारतीय उच्चायुक्तांच्या कार्यालय परिसरात येण्यापासून थांबवण्यात आलं नाही. त्यावेळी ब्रिटिश सुरक्षा पूर्णपणे अनुपस्थित होती. यासंदर्भात व्हिएन्ना करारानुसार ब्रिटिश सरकारच्या कर्तव्याची जाणीव या ब्रिटिश अधिकाऱ्यांना करून देण्यात आली आहे”, असंही भारत सरकारकडून कळवण्यात आलं आहे.

ब्रिटिश सरकारची उदासीनता
“भारतीय उच्चायुक्त कार्यालय परिसर आणि कर्मचारी यांच्या सुरक्षेबाबत ब्रिटिश सरकारची उदासीनता भारताला अस्वीकारार्ह आहे. हे खपवून घेतलं जाणार नाही. यावर ब्रिटिश सरकार तातडीने पावलं उचलून योग्य ती कारवाई करेल अशी अपेक्षा आहे. संबंधितांचा शोध घेऊन त्यांना अटक करावी आणि त्यांच्यावर योग्य त्या नियमानुसार कायदेशीर शिक्षाही केली जावी”, असंही परराष्ट्र विभागाकडून ब्रिटिश सरकारला सांगण्यात आलं आहे.

Web Title: Khalistani attack on indian high commission office flag in london nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2023 | 12:37 PM

Topics:  

  • Amritpal Singh
  • britain
  • Khalistani Movement
  • Marathi News

संबंधित बातम्या

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे
1

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी
2

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?
3

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन
4

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.