Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

North Korea: हुकूमशहाच्या देशात लोकशाहीची हत्या! 99.93% मतं मिळवून किम जोंग उन पुन्हा विजयी; मात्र 18 हजार मते विरोधात कशी?

Kim Jong Un : उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांनी ९९.९३% बहुमताने संसदीय निवडणुका जिंकल्या आहेत. उत्तर कोरियाच्या निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, अंदाजे ९९.१ टक्के मतदान झाले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 18, 2026 | 02:03 PM
kim jong un wins north korea election with 99 percent votes mandatory voting news

kim jong un wins north korea election with 99 percent votes mandatory voting news

Follow Us
Follow Us:
  • ९९.९३% बहुमताने विजय
  • मतदान न करणे म्हणजे ‘देशद्रोह’
  • निवडणूक की केवळ औपचारिकता?

North Korea Election Results 2026 : जगातील सर्वात रहस्यमय आणि क्रूर मानल्या जाणाऱ्या उत्तर कोरिया (North Korea) या देशातून एक मोठी बातमी समोर येत आहे. उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन (North Korea’s supreme leader Kim Jong Un) यांनी पुन्हा एकदा संसदीय निवडणुकांमध्ये अभूतपूर्व यश मिळवले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, किम जोंग उन यांनी ९९.९३% मते मिळवून आपल्या सत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. विशेष म्हणजे, ज्या देशात हुकूमशाही आहे, तिथे निवडणुका का घेतल्या जातात आणि मतदानाची टक्केवारी इतकी प्रचंड कशी असते, यावर आता जगभरात चर्चा सुरू झाली आहे.

कोळशाच्या खाणीत किम जोंग उन यांचे मतदान

१५ मार्च रोजी उत्तर कोरियाच्या ‘सर्वोच्च जनसभे’साठी (Supreme People’s Assembly) मतदान पार पडले. या निवडणुकीत किम जोंग उन स्वतः एका कोळशाच्या खाणीत जाऊन मतदान करताना दिसले. उत्तर कोरियाच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये किम जोंग उन अत्यंत साध्या पद्धतीने कामगारांसोबत उभे राहून आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. या निवडणुका पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी घेण्यात आल्या होत्या, ज्याचा उद्देश किम यांच्या वर्कर्स पार्टीची पकड अधिक घट्ट करणे हा होता.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Deportation: अमेरिकेतून भारतीयांची ‘सन्मानाने’ हकालपट्टी? 2 लाख रुपये घ्या आणि देश सोडा; ताजमहाल फोटोने आणखी पेटला वाद

मतदान न करणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण?

उत्तर कोरियाच्या संविधानानुसार, १७ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला मतदान करणे अनिवार्य आहे. इथे मतदान करणे हा हक्क नसून तो एक ‘देशद्रोह’ टाळण्याचा मार्ग मानला जातो. जर एखाद्या नागरिकाने मतदान केले नाही, तर त्याचा अर्थ तो सरकारच्या विरोधात आहे असा होतो आणि त्याला कठोर शिक्षा भोगावी लागते. इतकेच नाही तर चीन आणि रशियामध्ये राहणाऱ्या उत्तर कोरियन नागरिकांनाही आपल्या मायदेशी येऊन किंवा तिथूनच मतदानाचा हक्क बजावावा लागतो. ९९.१% मतदानाची आकडेवारी ही केवळ जनतेचे प्रेम नसून ती हुकूमशहाची भीती असल्याचे पाश्चात्य तज्ज्ञांचे मत आहे.

2026 North Korea parliamentary elections 🔴PTC+Allies – 99.93% (-0.07)
⚪️Against – 0.07% (+0.07)
(+/- vs last election) pic.twitter.com/hsCn4ZPp1v — OSZ (@OpenSourceZone) March 17, 2026

credit – social media and Twitter

विरोधक शून्य, केवळ किम यांचेच वर्चस्व

उत्तर कोरियाच्या ६८७ जागांच्या जनसभेत विरोधी पक्षाची कोणतीही भूमिका नसते. या सभागृहाचे काम केवळ किम जोंग उन यांनी घेतलेल्या निर्णयांवर आणि धोरणांवर कायदेशीर शिक्कामोर्तब करणे इतकेच असते. किम हे केवळ राजकीय नेते नसून ते लष्कराचे प्रमुख देखील आहेत. सत्ता त्यांना वारसाहक्काने मिळाली आहे आणि कोणालाही त्यांना आव्हान देण्याची मुभा नाही. त्यांच्यावर त्यांचे स्वतःचे काका आणि भाऊ यांच्या हत्येचेही गंभीर आरोप आहेत, ज्यामुळे त्यांची प्रतिमा एक अत्यंत निर्दयी शासक म्हणून जगात निर्माण झाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: ‘इराण युद्ध अमेरिकेला भिकेला लावणार, चीनविरुद्धची आमची तयारी…’ ट्रम्पवर टीकेची धार तीव्र, खासदार आक्रमक

निवडणुकांचा खरा उद्देश काय?

अनेकांना प्रश्न पडतो की, जर सत्तापालट होणारच नसेल तर निवडणुकांचा हा फार्स कशासाठी? संरक्षण तज्ज्ञांच्या मते, या निवडणुकांच्या माध्यमातून किम जोंग उन आपल्या जनतेवर असलेल्या नियंत्रणाची चाचणी घेतात. तसेच, आंतरराष्ट्रीय समुदायाला आपल्याकडे जनतेचे समर्थन असल्याचे दाखवण्यासाठी ९९.९३% सारखी आकडेवारी जाहीर केली जाते. थोडक्यात, ही निवडणूक नसून ती किम जोंग उन यांची शक्ती प्रदर्शनाची एक पद्धत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: उत्तर कोरियात निवडणुका का घेतल्या जातात?

    Ans: उत्तर कोरियात निवडणुकांचा उद्देश सरकार बदलणे नसून, किम जोंग उन यांच्या सत्तेला कायदेशीर मान्यता देणे आणि जनतेवरील नियंत्रण तपासणे हा असतो.

  • Que: किम जोंग उन यांना किती मते मिळाली?

    Ans: अधिकृत आकडेवारीनुसार, किम जोंग उन यांनी ९९.९३% मते मिळवून विजय मिळवला असून ९९.१% मतदान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

  • Que: उत्तर कोरियात मतदान करणे अनिवार्य आहे का?

    Ans: होय, उत्तर कोरियात १७ वर्षांवरील प्रत्येक नागरिकासाठी मतदान करणे अनिवार्य आहे; मतदान न करणे हा तिथे देशद्रोह मानला जातो.

Web Title: Kim jong un wins north korea election with 99 percent votes mandatory voting news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 02:03 PM

Topics:  

  • elections
  • Kim Jong Un
  • North Korea

संबंधित बातम्या

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?
1

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या हालचाली वाढल्या; भाजप करणार घटक पक्षांशी चर्चा,  सम्राट महाडिक यांच्यावर समन्वयाची जबाबदारी
2

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या हालचाली वाढल्या; भाजप करणार घटक पक्षांशी चर्चा, सम्राट महाडिक यांच्यावर समन्वयाची जबाबदारी

North Korea Missile : जपानच्या समुद्रात उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी; काही तासांत दोन मिसाईल डागली!
3

North Korea Missile : जपानच्या समुद्रात उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी; काही तासांत दोन मिसाईल डागली!

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत;  VIDEO VIRAL
4

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत; VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.