Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hacker Army: उत्तर कोरियाने कशी तयार केली जगातील सर्वात धोकादायक ‘हॅकर आर्मी’? बायनान्स हॅकिंग प्रकरणाने जगात खळबळ

Hacker Army : अहवालानुसार, उत्तर कोरियाच्या हॅकर टीममध्ये सध्या सुमारे ८,००० लोक काम करतात आणि २०२४ पर्यंत ही संख्या सुमारे ६,००० पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. या टीमच्या सदस्यांविषयी फारच कमी माहिती सार्वजनिक केली जाते.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 07, 2026 | 02:45 PM
North Korea Hacker Army Kim Jong Un Cyber Weapon

North Korea Hacker Army Kim Jong Un Cyber Weapon

Follow Us
Follow Us:
  • जगातील सर्वात मोठी सायबर दरोडेखोरी
  • लहानपणापासून कठोर प्रशिक्षण
  • किम जोंग उनकडून मोठे पुरस्कार

सायबर सुरक्षेच्या जगात सध्या एकाच बातमीची जोरदार चर्चा सुरू आहे, ती म्हणजे उत्तर कोरियाची अत्यंत गुप्त आणि तितकीच धोकादायक ‘हॅकर आर्मी’ (Hacker Army). नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालानुसार, बायनान्स (Binance) या जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टो एक्सचेंजवर झालेल्या ६.३ अब्ज डॉलर्सच्या सायबर हल्ल्यामागे उत्तर कोरियाच्या हॅकर्सचा हात असल्याचा दावा एफबीआय (FBI) आणि आंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षा संस्थांनी केला आहे. उत्तर कोरियासारखा आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेला देश जगातील सर्वात प्रगत देशांमधील डिजिटल तिजोऱ्यांवर डाका कसा टाकतो, हा प्रश्न संपूर्ण जगाला पडला आहे.

 बालपणापासूनच सैनिकांसारखे कठोर सायबर प्रशिक्षण

उत्तर कोरियातील हॅकर्सच्या या सैन्यामागे कोणतीही अचानक झालेली किमया नसून, अनेक वर्षांचे नियोजनबद्ध धोरण आहे. २००४ मध्ये उत्तर कोरियातून पळून दक्षिण कोरियात शरण आलेले माजी हॅकर ट्रेनर किम ह्युंग-क्वांग यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन सायबर वॉरफेअरला त्यांच्या अण्वस्त्रांइतकेच महत्त्व देतात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Midterms : अमेरिकेत ट्रम्प यांना मोठा धक्का; पण पाकिस्तानचे राजकारण अडचणीत, असिम मुनीर यांना नेमकी भीती कशाची?

उत्तर कोरियात दरवर्षी शालेय स्तरावरून (सुमारे ११ ते १२ वर्षे वयाच्या) सर्वात हुशार १५० ते २०० विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या विद्यार्थ्यांना विशेष अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये आणि देशातील आघाडीच्या विद्यापीठांमध्ये संगणक शास्त्र, प्रगत गणित, परदेशी भाषा आणि अत्याधुनिक क्रिप्टो सिस्टीमचे शिक्षण दिले जाते. या विद्यार्थ्यांवर सैनिकांप्रमाणेच कडक नियम आणि शिस्त लादली जाते.

 ८,००० पेक्षा जास्त हॅकर्सची गुप्त ‘सायबर फोर्स’

दक्षिण कोरियाच्या इंटेलिजन्स सर्व्हिसच्या अहवालानुसार, उत्तर कोरियाकडे सध्या सुमारे ८,००० हून अधिक सायबर कमांडोज कार्यरत आहेत. हे हॅकर्स केवळ उत्तर कोरियातच नाही, तर चीन, रशिया आणि इतर मित्र देशांमध्ये राहून डिजिटल कारवाया करतात. लॅझारस ग्रुप (Lazarus Group) आणि ट्रेडरट्रेडर (TraderTraitor) यांसारख्या कुख्यात सायबर गटांचा संबंध थेट उत्तर कोरियाच्या लष्करी गुप्तचर संस्थेशी जोडला जातो.

 बायनान्स सायबर दरोडा आणि किम जोंग उन यांचे बक्षीस

क्रिप्टो जगतातील सर्वात मोठा दरोडा मानला जाणारा ६.३ अब्ज डॉलर्सचा बायनान्स हॅक हा उत्तर कोरियाच्या हॅकिंग क्षमतेचा एक मोठा पुरावा मानला जात आहे. रिपोर्टनुसार, उत्तर कोरियाई हॅकर्सनी एका इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये फेक जॉब इंटरव्यू आणि मालवेअरच्या (Malicious Software) साह्याने प्रवेश मिळवला आणि काही मिनिटांत अब्जावधी डॉलर्सची रक्कमेची अफरातफर केली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :  Paraguay Crisis : ‘आमचे पैसे परत द्या!’ बँकिंग संकटामुळे पॅराग्वे देशात आणीबाणीसारखी परिस्थिती; राष्ट्रपतींना सोडावे लागले पद

उत्तर कोरिया सरकार या अशा हॅकिंग मोहिमांना मोठा राष्ट्रीय विजय मानते. यशस्वी हॅकर्सना राजधानी प्योंगयांगमध्ये आलिशान फ्लॅट्स, रोख अमेरिकी डॉलर्स, परदेशात फिरण्याची सवलत आणि सत्ताधारी पक्षात महत्त्वाचे स्थान दिले जाते. त्यामुळे या हॅकर्ससाठी हॅकिंग हे केवळ काम नसून ते देशासाठी दिलेले योगदान ठरवले जाते.

जागतिक अर्थव्यवस्थेला आणि सुरक्षेला मोठा धोका

उत्तर कोरियावर आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक आर्थिक निर्बंध लादलेले आहेत. अशा परिस्थितीत, देशाची अर्थव्यवस्था चालवण्यासाठी आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमांसाठी निधी उभारण्यासाठी उत्तर कोरिया सायबर चोऱ्यांचा मार्ग अवलंबत असल्याचा आरोप अमेरिका, ब्रिटन आणि इतर पाश्चात्य देश सातत्याने करत आहेत. ही हॅकर आर्मी येत्या काळात जागतिक आर्थिक व्यवस्थेसाठी आणखी मोठा धोका निर्माण करू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: उत्तर कोरियाच्या हॅकर टीममध्ये किती लोक काम करतात?

    Ans: अहवालानुसार, उत्तर कोरियाच्या सायबर वॉरफेअर आणि हॅकर टीममध्ये सुमारे ८,००० हून अधिक प्रशिक्षित लोक काम करतात.

  • Que: उत्तर कोरियामध्ये हॅकर्सची निवड कशी केली जाते?

    Ans: उत्तर कोरियातील शाळांमधून ११ ते १२ वयाच्या सुमारे १५० ते २०० अतिशय हुशार विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना संगणक आणि सायबर सुरक्षेचे कठोर लष्करी प्रशिक्षण दिले जाते.

  • Que: बायनान्स (Binance) हॅकिंगमध्ये उत्तर कोरियाचे नाव का जोडले जात आहे?

    Ans: आंतरराष्ट्रीय तपास संस्था (FBI) आणि क्रिप्टो विश्लेषकांच्या मते, बायनान्सवरील ६.३ अब्ज डॉलर्सच्या सायबर हल्ल्यामध्ये उत्तर कोरियाच्या 'ट्रेडरट्रेडर' आणि 'लॅजारस' या हॅकर गटांचे संकेत सापडले आहेत.

Web Title: How north korea created world most dangerous hacker army binance hack hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • Kim Jong Un
  • North Korea
  • World news

संबंधित बातम्या

Israel : निवडणुकीपूर्वी इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत होते इस्रायली अध्यक्ष नेतन्याहू; अमेरिकेने मध्यस्थीने कसा रोखला हा कट?
1

Israel : निवडणुकीपूर्वी इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत होते इस्रायली अध्यक्ष नेतन्याहू; अमेरिकेने मध्यस्थीने कसा रोखला हा कट?

Donald Trump : ‘डोक्यात आवाज ऐकू येत होते ट्रम्पला मारण्याचे…’, व्हाइट हाऊसजवळ शस्त्रांसह व्हेनेझुएलाचा नागरिक अटक
2

Donald Trump : ‘डोक्यात आवाज ऐकू येत होते ट्रम्पला मारण्याचे…’, व्हाइट हाऊसजवळ शस्त्रांसह व्हेनेझुएलाचा नागरिक अटक

World End : 1960मध्ये वर्तवली होती जगाच्या अंताची भविष्यवाणी; नोव्हेंबरमधील ‘या’ तारखेला का म्हटलंय जातंय विनाशाची सुरुवात?
3

World End : 1960मध्ये वर्तवली होती जगाच्या अंताची भविष्यवाणी; नोव्हेंबरमधील ‘या’ तारखेला का म्हटलंय जातंय विनाशाची सुरुवात?

White House :  कोण आहेत स्टीफन मिलर? निवडणूक हरल्यानंतर ट्रम्प यांनी का बनवले व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ
4

White House : कोण आहेत स्टीफन मिलर? निवडणूक हरल्यानंतर ट्रम्प यांनी का बनवले व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.