Klyuchevskoy Volcano in Russia erupted so violently it shocked even NASA
Klyuchevskoy Volcano : रशियातील कामचटका (Kamchatka) येथील क्ल्युचेव्स्कॉय (Klyuchevskoy Volcano) ज्वालामुखीने अलीकडेच इतका जोरदार उद्रेक केला की, त्याचे दृश्य पाहून नासाचे (NASA) शास्त्रज्ञही आश्चर्यचकित झाले. अंतराळातून काढलेल्या छायाचित्रांमध्ये १६०० किलोमीटर लांब धुराची नदी स्पष्टपणे दिसत आहे. या दृश्यात वाहणारा लावा आणि धुराचे वळवळणारे लाटांप्रमाणे पट्टे “शिंगांसारखे” दिसत असल्याने याला ‘डेव्हिल्स ज्वालामुखी’ अशी टोपणनाव मिळाले आहे.
क्ल्युचेव्स्कॉय हा आशिया आणि युरोप खंडातील सर्वात उंच सक्रिय ज्वालामुखी मानला जातो. सुमारे १५,५९७ फूट उंच असलेला हा ज्वालामुखी २१व्या शतकात आतापर्यंत १८ वेळा उद्रेकला आहे. गेल्या शंभर वर्षांत तर तब्बल ६० वेळा त्याने लाव्हा आणि राखेचा प्रचंड विस्फोट केला आहे. एप्रिल २०२५ मध्ये सुरु झालेला त्याचा सध्याचा उद्रेक अजूनही चालूच आहे. यादरम्यान या पर्वतातून इतकी ज्वालामुखी राख आणि वायू निघाले आहेत की त्याचा परिणाम जागतिक हवामानावर होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
क्ल्युचेव्स्कॉयच्या अगदी जवळच बेझिमियानी (Bezymianny) नावाचा एक छोटा ज्वालामुखी आहे. १९५५ पर्यंत तो सुप्त मानला जात होता. मात्र त्या वर्षी तो प्रथमच उद्रेकला आणि त्यानंतर तोही सतत सक्रिय राहू लागला आहे. सध्या तो देखील लाव्हा सोडत आहे. या दोन सक्रिय ज्वालामुख्यांच्या जोडीने कामचटका परिसर पूर्णपणे धोक्याच्या सावटाखाली आला आहे.
हे देखील वाचा : World Snake Day: साप म्हणजे धोका नाही तर पर्यावरण रक्षक; जाणून घ्या का पृथ्वीवर महत्त्वाचे आहे त्याचे अस्तित्व
कामचटका द्वीपकल्प हा जगातील सर्वात धोकादायक भूकंपीय झोनपैकी एक असलेल्या पॅसिफिक ‘रिंग ऑफ फायर’चा भाग आहे. ही रिंग सुमारे ४०,००० किलोमीटर लांब आहे. यामध्ये जगातील सुमारे ७५% सक्रिय ज्वालामुखी आणि ९०% भूकंपांचे केंद्रबिंदू येतात. या झोनमध्ये वारंवार होणारे भूकंप, ज्वालामुखीचे उद्रेक, लाव्हाचे प्रवाह आणि राखेचे ढग हे पर्यावरणासाठीच नव्हे तर मानवी जीवनासाठीही अत्यंत घातक ठरतात.
Episode 28 of the ongoing Kīlauea summit eruption is over after 9 hours of continuous lava fountaining. The south vent did not appear to activate at all during this episode and has been completely covered by new deposits. Lava fountains reached approximately 1200 ft (365 m). pic.twitter.com/jQvElDiIU4
— USGS Volcanoes🌋 (@USGSVolcanoes) July 10, 2025
credit : social media
नासाने आपल्या उपग्रहाच्या माध्यमातून घेतलेल्या फोटोमध्ये, ज्वालामुखीतून बाहेर पडणारा लाव्हा वळवळत वाहताना दिसतो. त्याचे आकार इतके विचित्र आणि टोकदार आहेत की, ते पाहून अनेकांनी त्याची तुलना “सैतानाच्या शिंगांशी” केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावरही या दृश्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.
शास्त्रज्ञांच्या मते, अशा मोठ्या प्रमाणावर राख आणि विषारी वायू हवेत मिसळल्यामुळे केवळ परिसरातील हवामान नाही तर जागतिक तापमानातही बदल होऊ शकतो. सूर्यप्रकाशाचे प्रमाण कमी होणे, आंबट पावसाचे प्रमाण वाढणे आणि हवामान चक्रात अराजकता निर्माण होणे हे याचे गंभीर परिणाम मानले जातात.
हे देखील वाचा : 8 वर्षांची तपश्चर्या! रशियाची ‘ती’ रहस्यमय साध्वी, गोकर्ण जंगलात गुहा, गुहेत रुद्र मूर्ती; वाचा ‘ही’ गूढ रंजक कहाणी
क्ल्युचेव्स्कॉयचा उद्रेक हा ‘रिंग ऑफ फायर’च्या सतत हालचाली करणाऱ्या भूगर्भीय शक्तींचे उदाहरण आहे. तो मानवजातीसाठी एक इशारा आहे की निसर्गाशी खेळल्यास त्याचे परिणाम किती भयावह असू शकतात. आज, पृथ्वीच्या अंतर्भूत शक्तींनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे आणि त्याचे शिंग आता आकाशातही दिसू लागले आहेत.