• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • World Snake Day Snakes Protect The Environment Know Why They Matter

World Snake Day: साप म्हणजे धोका नाही तर पर्यावरण रक्षक; जाणून घ्या का पृथ्वीवर महत्त्वाचे आहे त्याचे अस्तित्व

World Snake Day 2025 : हा केवळ एक पर्यावरण विषयक दिवस नाही, तर तो आपल्या मानसिकतेतील खोल रुतलेल्या गैरसमजांवर प्रकाश टाकणारा आणि सापांविषयीचा दृष्टिकोन बदलणारा एक संधीसाधू क्षण आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 16, 2025 | 09:38 AM
World Snake Day Snakes protect the environment know why they matter

World Snake Day: पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला साप दिसेल तेव्हा घाबरू नका... या पृथ्वीवर तो का महत्त्वाचा आहे ते समजून घ्या ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

World Snake Day 2025 : १६ जुलै रोजी दरवर्षी साजरा केला जाणारा ‘जागतिक सर्प दिन (World Snake Day)’ हा केवळ एक पर्यावरण विषयक दिवस नाही, तर तो आपल्या मानसिकतेतील खोल रुतलेल्या गैरसमजांवर प्रकाश टाकणारा आणि सापांविषयीचा दृष्टिकोन बदलणारा एक संधीसाधू क्षण आहे. साप म्हटलं की बहुतेक लोक घाबरतात, काहीजण लगेच ठार मारण्याचा विचार करतात. पण खरे पाहता, साप ही पृथ्वीवरील एक अत्यंत महत्त्वाची प्रजाती आहे, जी पर्यावरणीय समतोल राखण्यात आणि मानवी आरोग्यातही मोठे योगदान देते.

गैरसमज विरुद्ध सत्य: साप खरंच घातक असतो का?

जगभरात सापांच्या ३,५०० हून अधिक प्रजाती आढळतात. त्यापैकी फक्त ६०० प्रजाती विषारी आहेत आणि त्यातही फक्त २०० प्रजातीच मानवासाठी घातक मानल्या जातात. म्हणजेच, ९० टक्क्यांपेक्षा जास्त साप निरुपद्रवी आहेत.
भारतात सुमारे ३०० पेक्षा अधिक सर्पप्रजाती असून त्यापैकी फारच थोड्या प्रजाती माणसांना धोका पोहोचवतात. तरीही भीतीपोटी अनेकदा निरुपद्रवी साप मारले जातात, जी एक पर्यावरणीय हानी ठरते.

 येथे क्लिक करा : शिवभक्तांच्या श्रद्धेचं केंद्र; ऋषिकेशपासून थोड्याच अंतरावर आहे भगवान शिवाचे ‘हे’ चमत्कारिक मंदिर

सापांचे निसर्गात योगदान: अन्नसाखळीतील प्रमुख घटक

साप नुसतेच ‘डरावणारे’ नाहीत, तर ते निसर्गातील अन्नसाखळीचे रक्षक आहेत. उंदीर, कीटक, छोटे प्राणी यांना नियंत्रित करत ते रोगराई आणि शेतीची हानी कमी करतात. उंदीर नियंत्रित झाल्यास पीकसंवर्धन होऊ शकते, ज्याचा शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होतो. याशिवाय, साप हे स्वतःही शिकारी पक्ष्यांसाठी व मोठ्या प्राण्यांसाठी अन्न म्हणून काम करतात. त्यामुळे संतुलित परिसंस्था निर्माण करण्यात त्यांचे योगदान अनमोल आहे.

वैद्यकीय क्षेत्रात सापांचा वापर: जीव वाचवणारे विष!

आपल्याला आश्चर्य वाटेल, पण अनेक विषारी सापांच्या विषापासून बनवलेले औषधांचे घटक हृदयविकार, स्नायू विकार, आणि मुलांच्या न्यूरोलॉजिकल त्रासांमध्ये वापरले जातात. त्याचप्रमाणे सर्पविषावरून तयार केलेले एंटीव्हेनम सीरम हजारो लोकांचे प्राण वाचवते. म्हणजेच, ज्याच्यामुळे आपल्याला भीती वाटते, त्याच्याच विषातून औषध तयार होऊन आपला जीव वाचू शकतो ही निसर्गातील विस्मयकारक गोष्ट आहे.

‘जागतिक सर्प दिन’ची सुरुवात कशी झाली?

१९७० च्या सुमारास टेक्सास (अमेरिका) येथील एका संस्थेने सापांविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी पुढाकार घेतला. यानंतर पर्यावरणप्रेमी संस्था, कार्यकर्ते आणि संशोधक यांचाही यात सहभाग वाढला. शेवटी १६ जुलै हा दिवस जागतिक स्तरावर ‘World Snake Day’ म्हणून मान्यता पावला. आज अनेक देशांमध्ये या दिवशी प्रदर्शन, शिबिरे, सर्पप्रदर्शन, शालेय स्पर्धा व वेबिनार्सच्या माध्यमातून सापांविषयी सकारात्मक जागरूकता पसरवली जाते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पृथ्वीशिवाय जीवन? खगोलशास्त्रात मोठा शोध; ‘TOI-1846b’ या प्राचीन ग्रहावर पाणी असल्याचे संकेत

सर्प दिनानिमित्त संदेश

पुढच्या वेळी तुम्हाला साप दिसला, तर घाबरू नका. तो तुमच्यावर हल्ला करणार नाही, जर तुम्ही त्याला त्रास दिला नाही. त्याचं अस्तित्व आपल्याला स्वच्छ परिसंस्था, रोगमुक्त शेती आणि वैद्यकीय प्रगती देतं. आजच्या या ‘जागतिक सर्प दिना’ला आपण ठरवूया की सापांविषयीची भीती झटकून टाकायची आणि निसर्गातील त्यांच्या स्थानाची जाणीव ठेवायची.

Web Title: World snake day snakes protect the environment know why they matter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2025 | 09:38 AM

Topics:  

  • History
  • navarashtra special story
  • special story

संबंधित बातम्या

World AIDS Day 2025 : दरवर्षी 1 डिसेंबरलाच जागतिक एड्स दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या महत्व आणि उद्देश
1

World AIDS Day 2025 : दरवर्षी 1 डिसेंबरलाच जागतिक एड्स दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या महत्व आणि उद्देश

Chemical Warfare Remembrance Day : विज्ञानाचा वापर विध्वंसासाठी नव्हे, तर कल्याणासाठी व्हावा याची आठवण करून देणारा ‘हा’ दिवस
2

Chemical Warfare Remembrance Day : विज्ञानाचा वापर विध्वंसासाठी नव्हे, तर कल्याणासाठी व्हावा याची आठवण करून देणारा ‘हा’ दिवस

Saint Lucia : कॅरिबियनचा स्वर्ग! जगातील एकमेव ‘देश’ ज्याचे नाव एका महिलेच्या नावावर आहे; सौंदर्य आणि इतिहासाचा संगम
3

Saint Lucia : कॅरिबियनचा स्वर्ग! जगातील एकमेव ‘देश’ ज्याचे नाव एका महिलेच्या नावावर आहे; सौंदर्य आणि इतिहासाचा संगम

Mundeshwari Temple : ‘हे’ आहे जगातील सर्वात जुने हिंदू मंदिर; 2,000 वर्षांची परंपरा अन् देवीची रहस्यमय आख्यायिका
4

Mundeshwari Temple : ‘हे’ आहे जगातील सर्वात जुने हिंदू मंदिर; 2,000 वर्षांची परंपरा अन् देवीची रहस्यमय आख्यायिका

ताज्या बातम्या

पुढे वाचा
खेळाडू का झाले नाहीत गंभीर; प्रेक्षकांनी धारेवर धरले गौतम गंभीर

खेळाडू का झाले नाहीत गंभीर; प्रेक्षकांनी धारेवर धरले गौतम गंभीर

Dec 02, 2025 | 01:15 AM
निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज; जेजुरी नगरपरिषदेसाठी आज होणार मतदान

निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज; जेजुरी नगरपरिषदेसाठी आज होणार मतदान

Dec 02, 2025 | 12:30 AM
पाकिस्तानमध्ये लष्कर आणि सरकारमध्ये सत्तेसाठी संघर्ष? शाहबाज शरीफने काढला पळ अन् मुनीरची झाली पंचायत

पाकिस्तानमध्ये लष्कर आणि सरकारमध्ये सत्तेसाठी संघर्ष? शाहबाज शरीफने काढला पळ अन् मुनीरची झाली पंचायत

Dec 01, 2025 | 11:20 PM
Satara News: ‘कराड’साठी माजी मुख्यमंत्र्यांच्या होमग्राऊंडवर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

Satara News: ‘कराड’साठी माजी मुख्यमंत्र्यांच्या होमग्राऊंडवर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

Dec 01, 2025 | 10:00 PM
IND vs SA: ‘रोहित शर्माला मी कधीच बाद करू शकलो नाही’, दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज गोलंदाजाने केले मोठे विधान; ‘त्याचा एक शॉट…’

IND vs SA: ‘रोहित शर्माला मी कधीच बाद करू शकलो नाही’, दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज गोलंदाजाने केले मोठे विधान; ‘त्याचा एक शॉट…’

Dec 01, 2025 | 09:45 PM
‘छत्रपती’ साखर कारखान्याकडून ऊसाला प्रति टन 3101 रुपयांची पहिली उचल जाहीर

‘छत्रपती’ साखर कारखान्याकडून ऊसाला प्रति टन 3101 रुपयांची पहिली उचल जाहीर

Dec 01, 2025 | 09:41 PM
IND vs SA 2nd ODI: दुसऱ्या वनडेत ऋतुराज गायकवाडला डच्चू मिळणार? ऋषभ पंतच्या कमबॅकची शक्यता! कशी असेल संभाव्य प्लेइंग 11?

IND vs SA 2nd ODI: दुसऱ्या वनडेत ऋतुराज गायकवाडला डच्चू मिळणार? ऋषभ पंतच्या कमबॅकची शक्यता! कशी असेल संभाव्य प्लेइंग 11?

Dec 01, 2025 | 09:02 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Local Body Elections : परभणी जिल्ह्यातल्या सात नगरपालिकांसाठी उद्या मतदान, कसा राहिला प्रचार ?

Local Body Elections : परभणी जिल्ह्यातल्या सात नगरपालिकांसाठी उद्या मतदान, कसा राहिला प्रचार ?

Dec 01, 2025 | 08:14 PM
Ambernath : रविंद्र चव्हाणांना पराभवाची भीती म्हणून निवडणूक ढकलल्या, शिंदे गटाचा आरोप!

Ambernath : रविंद्र चव्हाणांना पराभवाची भीती म्हणून निवडणूक ढकलल्या, शिंदे गटाचा आरोप!

Dec 01, 2025 | 08:01 PM
Palghar Politics : शिंदे गट नागरिकांसाठी काय काय करणार ? उमेदवार उत्तम घरत यांचा सवाल

Palghar Politics : शिंदे गट नागरिकांसाठी काय काय करणार ? उमेदवार उत्तम घरत यांचा सवाल

Dec 01, 2025 | 06:46 PM
Solapur News : फडणवीसांच्या हातात काठी येईपर्यंत सत्ता भाजपचीच-राजेंद्र राऊत

Solapur News : फडणवीसांच्या हातात काठी येईपर्यंत सत्ता भाजपचीच-राजेंद्र राऊत

Dec 01, 2025 | 06:31 PM
Chh.Sambhajinagar :  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पैठणमधील सभेवर सर्वसामान्यांचे मत काय ?

Chh.Sambhajinagar : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पैठणमधील सभेवर सर्वसामान्यांचे मत काय ?

Dec 01, 2025 | 06:21 PM
Raigad : खोपोलीत हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा; तटकरे–थोरवे ‘डीएनए’ वादाने तापलं मैदान

Raigad : खोपोलीत हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा; तटकरे–थोरवे ‘डीएनए’ वादाने तापलं मैदान

Dec 01, 2025 | 05:27 PM
कर्जत नगरपरिषद निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज, ३३ केंद्रांवर उद्या होणार मतदान

कर्जत नगरपरिषद निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज, ३३ केंद्रांवर उद्या होणार मतदान

Dec 01, 2025 | 05:20 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.