Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vijay Mallya : कर्ज बुडवलं पण स्वॅग तसाच! मल्ल्याच्या वाढदिवसाला लंडनमध्ये जमला ‘या’ सर्वच फरार उद्योगपतींचा मेळावा

Vijay Mallya : ललित मोदी यांनी लंडनमध्ये फरार उद्योगपती विजय मल्ल्यासाठी एका भव्य वाढदिवसापूर्वी पार्टीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला किरण मजुमदार-शॉ यांच्यासह अनेक प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Dec 18, 2025 | 02:07 PM
Lalit Modi's grand party in London who attended fugitive Vijay Mallya's birthday party

Lalit Modi's grand party in London who attended fugitive Vijay Mallya's birthday party

Follow Us
Close
Follow Us:
  •  भारताला हवे असलेले ललित मोदी आणि विजय मल्ल्या लंडनच्या आलिशान बंगल्यात ७० व्या वाढदिवसाच्या पार्टीत एकत्र दिसले.
  •  या पार्टीत बायोकॉनच्या प्रमुख किरण मजुमदार-शॉ, हॉलिवूड स्टार इद्रिस एल्बा आणि नामवंत डिझाइनर हजर होते.
  •  भारतातून हजारो कोटींची फसवणूक करून पळालेले हे दोघेही लंडनमध्ये आजही शाही जीवन जगत असल्याचे फोटोतून समोर आले आहे.

Vijay Mallya 70th birthday party London : भारतात बँकांची हजारो कोटींची फसवणूक करून फरार झालेला ‘किंग ऑफ गुड टाइम्स’ अर्थात विजय मल्ल्या (Vijay Mallya) १८ डिसेंबर २०२५ रोजी ७० वर्षांचा झाला आहे. या खास निमित्ताने आयपीएलचे माजी सर्वेसर्वा ललित मोदी (Lalit Modi) यांनी लंडनच्या अत्यंत महागड्या ‘बेलग्रेव्ह स्क्वेअर’ येथील आपल्या निवासस्थानी एक भव्य ‘प्री-बर्थडे’ पार्टी आयोजित केली होती. या पार्टीचे फोटो समोर आल्यानंतर पुन्हा एकदा ‘फरार’ असूनही या दोघांच्या चैनीच्या जीवनशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

निमंत्रण पत्रिकेवर ‘किंग ऑफ गुड टाइम्स’चा स्वॅग

या पार्टीच्या निमंत्रण पत्रिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. निमंत्रण पत्रिकेवर विजय मल्ल्याचे एक कॅरिकेचर (कार्टून) होते आणि त्यावर ठळक अक्षरात ‘किंग ऑफ गुड टाइम्स’ असे लिहिले होते. ललित मोदी यांनी आपल्या मित्राच्या सन्मानार्थ ही संध्याकाळ खास बनवली होती. प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर जिम रिडेल यांनी या पार्टीचे फोटो शेअर केल्यानंतर ही गुप्त पार्टी जगासमोर आली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Climate Crisis : दिल्लीचा श्वास का कोंडला? भारतीय शेतकऱ्यांच्या ‘या’ कृतीने NASAचे शास्त्रज्ञही चक्रावले; वाचा कसे ते…

किरण मजुमदार-शॉ आणि हॉलिवूड स्टार्सची हजेरी

या हाय-प्रोफाइल पार्टीत केवळ व्यावसायिकच नाही तर कला आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार-शॉ यांनी या पार्टीत हजेरी लावून सर्वांना चकित केले. त्यांच्यासोबतच प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता इद्रिस एल्बा, भारतीय फॅशन डिझायनर मनोविराज खोसला आणि अनेक आंतरराष्ट्रीय मॉडेल या सोहळ्याचे आकर्षण ठरले. पार्टीत महागडी पेये, संगीताचा साज आणि आलिशान सजावट पाहून हे दोघे भारतातून ‘फरार’ आहेत असे कोणालाही वाटणार नाही.

Thank you to @LalitKModi for hosting a fabulous pre 70th Birthday party in honor of @TheVijayMallya last night at his beautiful London Home pic.twitter.com/Qb5G3Xa0YB — Jim Rydell (@jim_rydell) December 17, 2025

credit : social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : HIMARS : चीनच्या नाकावर टिच्चून! अमेरिकेने तैवानला बनवले ‘पॉवरहाऊस’; अखेर रणनीतिक महाकराराला अधिकृत मान्यता

मैत्रीचा जुना सिलसिला

ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांची मैत्री जुनी आहे. यापूर्वीही ललित मोदींच्या वाढदिवसाला मल्ल्याने हजेरी लावली होती. दोघेही सध्या युनायटेड किंगडममध्ये आश्रयाला आहेत आणि भारतीय तपास यंत्रणांच्या हाती लागलेले नाहीत. भारतात त्यांच्यावर गंभीर आर्थिक गुन्ह्यांचे खटले सुरू आहेत, परंतु लंडनमधील त्यांच्या पार्ट्या दरवेळी भारताच्या न्यायव्यवस्थेला चॅलेंज देत असल्याचे सोशल मीडिया युजर्सचे म्हणणे आहे. भारतात सामान्य माणूस कर्जाच्या हप्त्यासाठी त्रस्त असताना, हजारो कोटींचे कर्ज बुडवणारे हे ‘फरार’ उद्योगपती परदेशात मात्र राजेशाही थाटात आपला वाढदिवस साजरा करत आहेत. या पार्टीच्या फोटोंमुळे सामान्य भारतीयांमध्ये संतापाची लाट असून प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: विजय मल्ल्याचा ७० वा वाढदिवस कुठे साजरा झाला?

    Ans: विजय मल्ल्याचा ७० वा वाढदिवस लंडनच्या बेलग्रेव्ह स्क्वेअर येथील ललित मोदींच्या खासगी निवासस्थानी साजरा झाला.

  • Que: मल्ल्याच्या वाढदिवसाच्या पार्टीला कोणकोणत्या प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित होत्या?

    Ans: या पार्टीला बायोकॉनच्या किरण मजुमदार-शॉ, हॉलिवूड स्टार इद्रिस एल्बा आणि फॅशन डिझायनर मनोविराज खोसला उपस्थित होते.

  • Que: विजय मल्ल्या आणि ललित मोदी भारतातून फरार का आहेत?

    Ans: विजय मल्ल्या आणि ललित मोदी दोघेही आर्थिक गैरव्यवहार (Money Laundering) आणि बँकांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली भारतात हवे आहेत.

Web Title: Lalit modis grand party in london who attended fugitive vijay mallyas birthday party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 02:07 PM

Topics:  

  • international news
  • Lalit Modi
  • London
  • Vijay Mallya

संबंधित बातम्या

PNS Ghazi: गाझीचा पुनर्जन्म! 54 वर्षांपूर्वी जलसमाधी मिळालेल्या पाकिस्तानी पाणबुडीचे पुन्हा जलावतरण; ड्रॅगनकडून भेट
1

PNS Ghazi: गाझीचा पुनर्जन्म! 54 वर्षांपूर्वी जलसमाधी मिळालेल्या पाकिस्तानी पाणबुडीचे पुन्हा जलावतरण; ड्रॅगनकडून भेट

Climate Crisis : दिल्लीचा श्वास का कोंडला? भारतीय शेतकऱ्यांच्या ‘या’ कृतीने NASAचे शास्त्रज्ञही चक्रावले; वाचा कसे ते…
2

Climate Crisis : दिल्लीचा श्वास का कोंडला? भारतीय शेतकऱ्यांच्या ‘या’ कृतीने NASAचे शास्त्रज्ञही चक्रावले; वाचा कसे ते…

US Politics : महासत्तेच्या अभेद्यकिल्याखाली केली जातेय गुपितांची पायाभरणी; व्हाईट हाऊसकडून मिळाले ‘हे’ 3 गूढ संकेत
3

US Politics : महासत्तेच्या अभेद्यकिल्याखाली केली जातेय गुपितांची पायाभरणी; व्हाईट हाऊसकडून मिळाले ‘हे’ 3 गूढ संकेत

PM Modi Ethiopia Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळाला इथिओपियाचा सर्वोच्च सन्मान; म्हणाले, ‘माझ्यासाठी…’
4

PM Modi Ethiopia Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळाला इथिओपियाचा सर्वोच्च सन्मान; म्हणाले, ‘माझ्यासाठी…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.