चीनच्या हल्ल्याच्या भीतीने अमेरिकेने तैवानसाठी सर्वात मोठे शस्त्र पॅकेज जाहीर केले, ज्यामध्ये क्षेपणास्त्रे आणि तोफांचा समावेश ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
US Taiwan arms sale $11.1 billion 2025 : चीन आणि तैवानमधील वाद (china taiwan conflict) आता केवळ शब्दांपुरता उरलेला नाही. चीन कधीही तैवानवर हल्ला करू शकतो, अशा गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱ्यानंतर अमेरिकेने बुधवारी रात्री उशिरा एक ऐतिहासिक घोषणा केली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणादरम्यान, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने तैवानला १० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीची अत्याधुनिक शस्त्रे विकण्यास हिरवा कंदील दिला आहे.
या करारानुसार, अमेरिकेने एकूण आठ वेगवेगळ्या शस्त्रास्त्र विक्री करारांना मंजुरी दिली आहे. यामध्ये रशिया-युक्रेन युद्धात गेम चेंजर ठरलेली HIMARS (High Mobility Artillery Rocket Systems) आणि ४२० ATACMS (Army Tactical Missile Systems) क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. याशिवाय, ६० हून अधिक अत्याधुनिक हॉवित्झर तोफा, १ अब्ज डॉलर्सचे घातक ड्रोन्स, जॅव्हेलिन आणि टीओडब्ल्यू (TOW) क्षेपणास्त्रांचा मोठा साठा तैवानला दिला जाणार आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : WaterWar: पाकिस्तानच्या घशाला कोरड; जलयुद्ध तीव्र, भारताने अडवले सिंधूचे पाणी तर आता अफगाणिस्तानानेही केली मोठी गळचेपी
या शस्त्रास्त्र कराराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, अमेरिकेने तीच शस्त्रास्त्रे तैवानला देण्याचा निर्णय घेतला आहे, जी त्यांनी रशियाविरुद्ध युक्रेनला दिली होती. सुमारे ४ अब्ज डॉलर्सची रॉकेट सिस्टीम तैवानच्या ताफ्यात सामील झाल्यामुळे, चीनच्या नौदलाला आणि लष्कराला समुद्रकिनाऱ्यावरच रोखणे तैवानला शक्य होणार आहे. ट्रम्प यांनी आपल्या भाषणात चीनचा थेट उल्लेख टाळला असला तरी, या निर्णयाने त्यांनी बीजिंगला स्पष्ट संकेत दिले आहेत.
The U.S. State Department tonight announced a massive new arms package, the largest in history, for Taiwan. The package, worth over $11 billion, is likely to infuriate China and is set to include: – The U.S. Armed Force’s Tactical Mission Network (TMN)
– 82 M142 High Mobility… pic.twitter.com/aJMphaX9Ea — OSINTdefender (@sentdefender) December 18, 2025
credit : social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : WaterWar: पाकिस्तानच्या घशाला कोरड; जलयुद्ध तीव्र, भारताने अडवले सिंधूचे पाणी तर आता अफगाणिस्तानानेही केली मोठी गळचेपी
या घोषणेनंतर तैवानचे परराष्ट्र मंत्री लिन चिया-लूंग यांनी अमेरिकेचे आभार मानले आहेत. त्यांनी म्हटले की, “अमेरिकेचा हा निर्णय तैवानच्या स्वसंरक्षणासाठी आणि प्रादेशिक शांततेसाठी पाया ठरेल.” दुसरीकडे, चीनने या कराराचा तीव्र निषेध केला असून, ही अमेरिकेची घुसखोरी असल्याचे म्हटले आहे. चीनने आधीच ‘नॅशनल डिफेन्स ऑथोरायझेशन ॲक्ट’वर टीका केली असून, यामुळे चीनच्या सार्वभौमत्वाला धोका असल्याचे सांगितले आहे. अमेरिकेच्या या मोठ्या निर्णयामुळे तैवानला लष्करी बळ मिळाले असले तरी, यामुळे दक्षिण चीन समुद्रात तणाव टोकाला पोहोचला आहे. चीन आता लष्करी सराव करून किंवा व्यापार निर्बंध लावून याला कसे प्रत्युत्तर देतो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
Ans: अमेरिकेने तैवानसाठी १० अब्ज डॉलर्सपेक्षा (सुमारे ८३,००० कोटी रुपये) जास्त किमतीचे सर्वात मोठे शस्त्र पॅकेज जाहीर केले आहे.
Ans: यात ८२ HIMARS रॉकेट सिस्टीम, ४२० ATACMS क्षेपणास्त्रे, हॉवित्झर तोफा आणि १ अब्ज डॉलर्सचे ड्रोन्स समाविष्ट आहेत.
Ans: चीनने या कराराचा तीव्र निषेध केला असून, अमेरिकेने आपल्या अंतर्गत बाबीत आणि सार्वभौमत्वात हस्तक्षेप केल्याचा आरोप केला आहे.






