
balochistan war bla operation herof 2 pakistan army soldiers killed quetta news
Balochistan BLA Operation Herof 2 latest : पाकिस्तानसाठी (Pakistan) आजचा शनिवार हा काळरात्र ठरला आहे. बलुचिस्तानमधील अत्याचार आणि पाकिस्तानी सैन्याच्या ४१ निष्पाप लोकांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (BLA) ‘ऑपरेशन हेरोफ २’ (Operation Herof-2) ची घोषणा केली आहे. राजधानी क्वेट्टासह बलुचिस्तानमधील १२ शहरांमध्ये सध्या युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते, महामार्ग आणि सरकारी इमारतींवर बीएलएचे सशस्त्र सैनिक फिरताना दिसत असून पाकिस्तानी सैन्याला मोठी माघार घ्यावी लागली आहे.
बीएलएच्या सैनिकांनी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या ताकदीनिशी राजधानी क्वेट्टा शहरात प्रवेश केला आहे. शहरात एकापाठोपाठ एक अनेक भीषण स्फोट झाले असून, बीएलएने अनेक पोलीस स्थानकांवर कब्जा केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, बीएलएने एका मध्यवर्ती तुरुंगावर ताबा मिळवून तेथील कैद्यांना मुक्त केले आहे. नोशकी परिसरात झालेल्या समोरासमोरच्या लढाईत किमान ८ पाकिस्तानी सैनिक जागीच ठार झाले आहेत, तर एकूण मृतांचा आकडा २० च्या पार गेल्याचे समजते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Epstein files: जावई कुशनर आणि रशियन पैसा! एपस्टाईन फाईल्स संबंधित FBI अहवालात ट्रम्प कुटुंबावर गंभीर आरोपांची सरबत्ती
बीएलएच्या गनिमी काव्यामुळे पाकिस्तानी पायदळ हतबल झाले आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पाकिस्तान सरकारने आता ‘अटॅक हेलिकॉप्टर’ मैदानात उतरवले आहेत. हवेतून बीएलएच्या ठिकाणांवर बॉम्बफेक केली जात आहे. मात्र, बीएलएचे प्रवक्ते जियांद बलोच यांनी स्पष्ट केले आहे की, हा त्यांच्या मातृभूमीच्या रक्षणासाठी सुरू झालेला ‘निर्णायक लढा’ आहे. बीएलए प्रमुख बशीर झेब यांनी स्थानिक जनतेला आवाहन केले आहे की, त्यांनी या सैनिकांना मदत करावी जेणेकरून बलुचिस्तानला पाकिस्तानच्या तावडीतून मुक्त करता येईल.
Massive strikes under Op Herof 2.0 in #Balochistan – Reports: More than 12 locations under attack – 2 main camps of #Pakistan military breached in Noshki – Reports of Pak Army vehicles and ISI offices under heavy attack – Emergency declared in #Quetta hospitals – In… pic.twitter.com/6mju25SIVN — Shreya Upadhyaya (@ShreyaOpines) January 31, 2026
credit – social media and Twitter
ऑगस्ट २०२४ मध्ये बीएलएने ‘ऑपरेशन हेरोफ’चा पहिला टप्पा राबवला होता, ज्यामध्ये १३० पाकिस्तानी सैनिक मारले गेले होते. आता सुरू झालेला दुसरा टप्पा हा त्याहून अधिक भीषण आणि व्यापक आहे. बीएलएने केवळ सैन्यालाच नाही, तर चीनलाही इशारा दिला आहे. ग्वादर पोर्ट आणि बलुचिस्तानमधील चिनी प्रकल्पांपासून लांब राहा, अन्यथा त्याचे परिणाम भयानक होतील, अशी धमकी त्यांनी दिली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : BRICS :भारताचा ‘मास्टरस्ट्रोक’! डॉलरची मक्तेदारी संपवण्यासाठी 11 देशांची मोठी तटबंदी; ट्रम्प यांच्या धमकीला मोदींचे ‘डिजिटल’ उत्तर
या युद्धामुळे बलुचिस्तानातील सर्व रेल्वे सेवा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्या आहेत. क्वेट्टामधील सर्व रुग्णालयांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, जखमी सैनिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली असून, संपूर्ण बलुचिस्तानचा जगाशी संपर्क तुटला आहे. ही परिस्थिती पाकिस्तानसाठी एका मोठ्या भूराजकीय संकटाचे संकेत देत आहे.
Ans: पाकिस्तानी सैन्याने ४१ बलुच लोकांची हत्या केल्याच्या रागातून बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (BLA) 'ऑपरेशन हेरोफ-२' अंतर्गत प्रतिहल्ला सुरू केला आहे.
Ans: बलुचिस्तानला पाकिस्तानच्या तावडीतून मुक्त करणे आणि चिनी हस्तक्षेपाला विरोध करणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
Ans: पाकिस्तानी लष्कराचे २० हून अधिक सैनिक ठार झाले असून, लष्कर आता अटॅक हेलिकॉप्टरद्वारे बीएलएवर हल्ले करत आहे.