Liam Payne of pop band 'One Direction' fame An hour before his death, he made a 'such' post
ब्यूनस आयर्स : ब्रिटिश बॉयबँड वन डायरेक्शनचे माजी सदस्य लियाम पायने यांचे वयाच्या 31 व्या वर्षी निधन झाले आहे. अर्जेंटिनामधील ब्युनोस आयर्स येथील हॉटेलच्या बाल्कनीतून तो पडला. ही घटना 16 ऑक्टोबर 2024 रोजी स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजता घडली. त्या दिवशी हॉटेलच्या लॉबीमध्ये तो वेगळ्या पद्धतीने वागत होता असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. त्यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
लियाम पेने अर्जेंटिनामध्ये त्याच्या माजी ‘वन डायरेक्शन’ बँडमेट नियाल होरानच्या मैफिलीत सहभागी होण्यासाठी होता. दोघेही पुन्हा एकदा स्टेजवर एकत्र आले. या गायकाने पूर्वी अंमली पदार्थांचे व्यसन आणि मानसिक आरोग्याबाबत केलेल्या संघर्षांबद्दल उघडपणे बोलले आहे. तो बाल्कनीतून चुकून पडला की दारूच्या नशेत होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही!
हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू
पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘वन डायरेक्शन’ या बँडचे माजी सदस्य संगीतकार आणि गिटार वादक लियाम जेम्स पायने यांचा आज हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला.’
लियामची खोली उध्वस्त अवस्थेत सापडली!
मृत्यूच्या एक तास आधी लियाम स्नॅपचॅटवर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत होता. सोशल मीडियावर काही छायाचित्रे देखील समोर आली आहेत, जी लियाम राहत असलेल्या हॉटेल रूमची आहेत. तेथे बराचसा माल तुटलेल्या अवस्थेत सापडला. त्याच्या चाहत्यांनी गायकाच्या हत्येचा दावा केला आहे. लियाम त्याच्या ‘किस यू’, ‘मॅजिक’, ‘परफेक्ट’ आणि ‘फॉर यू’ या गाण्यांसाठी ओळखला जातो.
पॉप बँड ‘One Direction’ फेम लियाम पायने याचे निधन; मृत्यूच्या एका तासापूर्वी केली ‘अशी’ पोस्ट ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
आत्महत्येचा विचार आला होता
लियाम पायने 2021 मध्ये खुलासा केला होता की ‘वन डायरेक्शन’ टूर दरम्यान त्याला आत्महत्येचे विचार आले होते. संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. लियाम यांच्या निधनामुळे संगीतक्षेत्रात शोककळा पसरली आहे. चार्ली पुथ, पॅरिस हिल्टन आणि जेडवर्ड या सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर आपली व्यथा मांडली आहे. लियामच्या पश्चात त्याचा 6 वर्षांचा मुलगा ग्रे पेने माजी जोडीदार चेरिलसह आहे.
credit : social media
पायनेला पॉप बँड वन डायरेक्शनमधून जागतिक कीर्ती मिळाली
की पेनेला हॅरी स्टाइल्स, झेन मलिक, नियाल होरान आणि लुई टॉमलिन्सन यांच्यासह पॉप बँड वन डायरेक्शनचे सदस्य म्हणून जागतिक कीर्ती मिळाली. हा बँड 2010 मध्ये एक्स फॅक्टर दरम्यान तयार झाला होता. तथापि हा बँड 2016 मध्ये तुटला आणि त्याचे सर्व सदस्य वेगळे झाले.