Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चीनच्या बाजारपेठेत भीषण आग; 8 जणांचा जळून मृत्यू, 15 जखमी

चीनमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. चीनच्या उत्तरेकडील हेबेई प्रांतातील झांगजियाकौ शहरातील एका बाजारपेठेत लागलेल्या भीषण आग लागली. या आगीत आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 15 लोक जखमी झाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 04, 2025 | 04:55 PM
चीनमधील बाजारपेठेत भीषण आग; 8 जणांचा जळून मृत्यू, 15 जखमी

चीनमधील बाजारपेठेत भीषण आग; 8 जणांचा जळून मृत्यू, 15 जखमी

Follow Us
Close
Follow Us:

शांघाय: चीनमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या उत्तरेकडील हेबेई प्रांतातील झांगजियाकौ शहरातील एका बाजारपेठेत लागलेल्या भीषण आग लागली. या आगीत आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 15 लोक जखमी झाले आहेत. ही दुर्घटना लिगुआंग मार्केट या खाद्य बाजारपेठेत घडली. आग एवढी भीषण होती की, संपूर्ण शहर काळ्या धुराने वेढले गेले. स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांनी तातडीने काम सुरू केले. दुपारी 2 वाजेपर्यंत आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली.

इंग्रजी वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, ही आग गॅस सिलिंडरचा स्फोट, मांस शिजवण्यासाठी वापरलेले कोळशाचे जळण किंवा फेकलेल्या सिगारेटमुळे लागली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. भूमिगत गॅस पाईपलाइनमधून होणाऱ्या गळतीलाही या दुर्घटनेचे कारण मानले जात आहे. घटनेची चौकशी सुरू असून प्रशासनाने बाजारपेठेतील सुरक्षितता आणि तांत्रिक चाचण्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या – युरोपची शक्तिशाली अणवस्त्र युद्धनौका भारतात दाखल; हिंद-प्रशांत क्षेत्रातील चीनच्या दादागिरीवर घालणार आळा

आगीत मोठे नुकसान

झांगजियाकौ शहर हे बीजिंगच्या जवळ असून 2022 च्या हिवाळी ऑलिम्पिकसाठी येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या दुर्घटनेने स्थानिक बाजारपेठेतील व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. जळून नष्ट झालेली दुकाने आणि बाजारपेठेत झालेले आर्थिक नुकसान भरून येणे कठीण आहे.

Eight people are dead and 15 injured after a fire broke out at a vegetable market in Zhangjiakou, northern China, on Saturday morning. The blaze, which started at 8:40 AM, was largely extinguished by noon. The cause of the fire is under investigation. pic.twitter.com/iG6IgIRJIe — Volcaholic 🌋 (@volcaholic1) January 4, 2025


काही दिवसांपूर्वी झुहाईत अपघात

या घटनेपूर्वी झुहाई शहरात मोठ्या अपघाताची घटना घडली होती. 62 वर्षीय चालकाने वाहनावरील नियंत्रण गमावून गर्दीत गाडी घुसवली. या दुर्घटनेत 35 लोकांचा मृत्यू झाला, तर 43 पेक्षा अधिक लोक जखमी झाले. या घटनेच्या वेळी झुहाई येथे प्रतिष्ठित एअर शो सुरू होता, ज्यामुळे शहरात मोठी गर्दी होती. या अपघातातील आरोपी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, हा अपघात होता की जाणीवपूर्वक केलेली कृती, याची चौकशी सुरू आहे.

सुरक्षेचा आढावा घेण्याची गरज

सतत होणाऱ्या या घटनांमुळे चीनमधील सुरक्षेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. आगीची घटना असो वा अपघात, सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेची योग्य काळजी घेतली जावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- डोनाल्ड ट्रम्पच्या शपथविधीकडे जगाचे लक्ष पण अमेरिकेचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर; नेमकं कारण काय?

Web Title: Massive fire breaks out at market in china 8 people burnt to death 15 injured nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2025 | 04:55 PM

Topics:  

  • China
  • World news

संबंधित बातम्या

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 
1

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा
2

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
3

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी
4

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.