शपथविधीआधी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासंदर्भातील खटल्यात कोर्टाचा मोठा निर्णय; हश मनी प्रकरणात ट्रम्प...
वॉश्गिंटन: अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारीला राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत. यावेळी अमेरिकेचा राष्ट्रीय धव्ज अर्ध्यावर फडकवला जाणार आहे. याचे कारण म्हणजे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या निधनानंतर सध्याचे अध्यक्ष जो बायडेन यांनी देशभर 30 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. या नियमांनुसार, माजी किंवा विद्यमान अध्यक्षांच्या निधनानंतर 30 दिवसांसाठी राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवला जातो.
डोनाल्ड ट्रम्प यांचा विरोध
जिमी कार्टर यांचे 100 व्या वर्षी निधन झाल्यानंतर बायडेन यांनी राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकविण्याचा आदेश दिला आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडेन यांच्या या निर्णयावर आपत्ती व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले आहे की, ते अध्यक्षपदाची शपथ घेत असताना झुकेलेला ध्वज देशवासीयांसाठी योग्य संदेश देणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी याचा तीव्र विरोध केला आहे.
ध्वज अर्ध्यावर का फडकवला जाणार?
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या फ्लॅग कोडनुसार, माजी अध्यक्षांच्या निधनानंतर 30 दिवसांसाठी ध्वज अर्ध्या फडकवण्यात येतो. याशिवाय उपाध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, काँग्रेसचे सदस्य किंवा राष्ट्रीय शोकप्रसंगीदेखील ध्वज अर्धावर फडकवला जाऊ शकतो, मात्र हा कालावधी कमी असतो. राष्ट्रीय ध्वज हा देशाच्या शोकभावनेचे प्रतीक म्हणून अर्ध्यावर फडकवण्यात येतो.
किती काळापर्यंत ध्वज अर्ध्यावर फडकवला जाणार
जिमी कार्टर यांच्या निधनानंतर 28 जानेवारीपर्यंत म्हणजेच 30 दिवसांपर्यंत ध्वज अर्ध्यावर फडकवलेला राहील. त्यामुळे 20 जानेवारीला डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदाची शपथ घेत असताना आणि त्यानंतर पहिल्या आठवड्यात संपूर्ण देशभर ध्वज अर्धा फडकवलेला असेल. अमेरिकेच्या फ्लॅग कोडनुसार, अध्यक्ष, राज्यपाल किंवा वॉशिंग्टन डी.सी.चे महापौर राष्ट्रीयध्वज संबंधित आदेश देऊ शकतात. हा आदेश सामान्यत: राष्ट्रीय शोक, स्मृतिदिन किंवा आपत्तीच्या काळात देण्यात येतो.
ट्रम्प यांची भूमिका
डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र याचा विरोध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, कोणत्याही अमेरिकन नागरिकाला अर्धा फडकवलेला ध्वज पाहणे आवडणार नाही. त्यांचा असा विश्वास आहे की, त्यांच्या अध्यक्षपदाच्या सुरुवातीस ध्वज अर्ध्यावर फडकवलेला असणे योग्य ठरणार नाही. राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ट्रम्प 30 दिवसांचा आदेश कमी करण्याचा निर्णय घेऊ शकतात, कारण फ्लॅग कोड बंधनकारक नसतो. मात्र, अशा निर्णयावर राष्ट्रीय भावना आणि परंपरेचा विचार केला जाईल.