Meloni Trump hot mic video on goes viral - news today
White House Gossip : रशिया-युक्रेन युद्धाला तीन वर्षांहून अधिक काळ उलटून गेला असला, तरीही अद्याप युद्धबंदीबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. जगभरातील नेते या विषयावर विविध पातळ्यांवर प्रयत्न करत आहेत. अशा पार्श्वभूमीवर व्हाईट हाऊसमध्ये नुकतीच बहुपक्षीय बैठक पार पडली. यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जर्मन चान्सलर मर्झ तसेच इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासह अनेक महत्त्वाचे युरोपीय नेते सहभागी झाले होते. या बैठकीतील चर्चेपेक्षा सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेला “हॉट माइक व्हिडिओ” अधिक चर्चेत आला आहे. बैठकीदरम्यान नेत्यांमध्ये झालेल्या अनौपचारिक संवादाचे काही तुकडे नकळत रेकॉर्ड झाले आणि त्याचेच हे व्हिडिओ क्लिपिंग्स सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत.
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या चर्चेदरम्यान ट्रम्पसोबत हलक्या-फुलक्या गप्पा मारताना दिसल्या. सुरुवातीला दोघेही जर्मन चान्सलर मर्झ यांच्या तब्येतीबद्दल बोलताना दिसतात. मेलोनी हसत म्हणतात की, “माझ्या मते मर्झ खूप उंच आहेत.” यावर ट्रम्प सहमती दर्शवत म्हणतात, “हो, ते खरंच उंच आहेत.”
यानंतर मेलोनी, ट्रम्पकडे वळून हसतच म्हणतात की, “मला त्यांच्या (मर्झ) शेजारी उभं राहायचं नाही. माझ्यासाठी व्होलोडिमिर झेलेन्स्की अगदी योग्य आहेत.” मेलोनींच्या या टिप्पणीमुळे संपूर्ण वातावरणात हलकाफुलकी खसखस पिकली. पण हा संवाद माईकवर रेकॉर्ड झाल्याने आता तो जगभर व्हायरल झाला आहे.
हे पहिल्यांदाच घडलेले नाही. याआधीही ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यातील हळू आवाजातले संभाषण हॉट माइकवर रेकॉर्ड झाले होते. त्यावेळी ट्रम्प यांनी मॅक्रॉन यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यानंतर पुतिनविषयी बोलताना त्यांनी मोठा दावा केला होता. ट्रम्प म्हणाले होते, “मी पुतिन यांना थेट फोन करून त्रिपक्षीय बैठक बोलावू शकतो. पुतिन हे फक्त माझ्यासाठीच तयार होतील.”
A hot mic at the White House meeting about the war in Ukraine captured US President Donald Trump saying Russian President Vladimir Putin ‘wants to make a deal for me … as crazy as it sounds.’
Trump was speaking to French President Emmanuel Macron, adding that he thinks they… pic.twitter.com/aM0hPvYhUi
— Channel 4 News (@Channel4News) August 19, 2025
credit : social media
जागतिक पातळीवर महत्त्वाच्या ठरणाऱ्या या चर्चेतून प्रत्यक्षात कोणतेही ठोस युद्धबंदीचे सूत्र बाहेर आले नाही. मात्र, मेलोनींच्या झेलेन्स्कीवरील टिप्पणी आणि ट्रम्पसोबतचा संवाद यामुळे सोशल मीडियावर गॉसिप रंगले आहे. अनेक वापरकर्त्यांनी हा व्हिडिओ पाहून विनोदी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तर याला “राजकीय बैठकीतील कॅज्युअल क्षण” असे संबोधले आहे. सध्या हे क्लिपिंग्स ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत. राजकारणातील गंभीर चर्चेपेक्षा एका हलक्या-फुलक्या संवादाने आंतरराष्ट्रीय नेत्यांना चर्चेत आणले आहे, हे विशेष.