Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Leadership : इराणच्या सत्तेचे गूढ कायम! नवा सर्वोच्च नेता ‘गायब’ मग ट्रम्प कोणाशी चर्चा करतायत?

US Iran War Update : मध्यपूर्वेतील युद्ध सध्या पाच दिवसांसाठी थांबले आहे. परंतु इस्रायलचे इराणवर हल्ले सुरुच आहेत. यामुळे इराण भडकला आहे. तर दुसरीकडे इराणचे सर्वोच्च नेत्याच्या गायब होण्यामागचं गूढ कायम आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 24, 2026 | 06:17 PM
US Iran War

US Iran War

Follow Us
Follow Us:
  • इराणच्या सत्तेचे गूढ कायम
  • नवा सर्वोच्च नेता ‘गायब’
  • मग ट्रम्प कोणाशी चर्चा करतायत?
Middle East War News in Marathi : तेहरान/वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मध्यपूर्वेतील इराण सुरु असलेले युद्ध पाच दिवसांसाठी थांबल्याची घोषण केली आहे. तसेच त्यांनी इराणशी युद्ध संपवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांशी सकारात्मक चर्चा सुरु असल्याचे म्हटले आहे. परंतु त्यांच्या या दाव्यामुळे जागतिक राजकारणात मोठा पेच निर्माण झाला आहे. इराणमध्ये सत्ता कोणाच्या हातात आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

US Iran Ceasefire Talks : ट्रम्प यांचे ‘डबल स्टँडर्ड’! एकीकडे शांततेच्या बाता दुसरीकडे तेहरानवर बॉम्बवर्षाव, इराण भडकला

ट्रम्प कोणत्या रहस्यमयी नेत्याशी करतायत चर्चा

जेव्हा ट्रम्प यांना माध्यमांनी इराणशी सुरु असलेल्या चर्चेबद्दल प्रश्न केला. त्यावेळी त्यांनी इराणी अधिकाऱ्यांशी अत्यंत सकारात्मक चर्चा सुरु असल्याचे म्हटले. परंतु त्यांनी नेमकी कोणत्या नेत्याशी चर्चा सुरु आहे यावर कोणतीही माहिती दिली नाही.

यावर एका पत्रकारेने ते सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याशी चर्चा करत आहेत का असा प्रश्न केला. यावेळी ट्रम्प यांनी नाही असे स्पष्ट उत्तर दिले. ट्रम्प यांच्या मते मोजतबा खामेनेईंचा मृत्यू झाला आहे. ट्रम्प यांच्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

मोजतबा खामेनेई गायब

सध्या इराणमध्ये नेमकी कोणाची सत्ता आहे? पडद्यामागे काय सुरु आहे? ट्रम्प कोणत्या नेत्याशी चर्चा करत आहेत? असे अनेक तेढ निर्माण झाले आहेत. शिवाय माजी सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा मोजतबा खामेनेई यांच्याकडे सत्तेची सुत्रे सोपवण्यात आली होती.

परंतु मोजतबा गेल्या अनेक दिवांपासून गायब असल्याने ते गंभीर जखमी असून रशियात उपचार घेत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र यावर कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने देखील मोजतबा सुरक्षित असून गुप्त ठिकाणी असल्याचा दावा केला आहे.

एकीकडे शांततेच्या बाता अन् दुसरीकडे हल्ले

याच वेळी दुसरीकडे इराणने अमेरिकेवर गंभीर आरोप केले आहे. इराणने अमेरिकेशी कोणत्याही प्रकारे थेट किंवा अप्रत्यक्ष चर्चा सुरु नसल्याचे म्हटले आहे. इराणने त्यांना धूर्त’ आणि ‘बाता मारणारा’ म्हणून संबोधले आहे. इराणच्या मते, जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत ते चर्चेच्या टेबलावर येणार नाहीत.

इस्रायलचे हल्ले

याच वेळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी इराण युद्धात अमेरिका-इस्रायलला यश मिळाल्याचा दावा केला आहे. तसेच शांतता करार झाल्यास इस्रायलच्या हिताचे रक्षण होईल असे ट्रम्प यांचे मत असल्याचे म्हटले. परंतु त्यांनी इराण-लेबनॉनवर हल्ले सुरुच राहतील जोपर्यंत त्यांचा  अण्वस्त्र कार्यक्रम मोडीत येत नाही, असे विधान केले आहे. यामुळे सध्या युद्धबंदीबाबत अनिश्चितता कायम आहे.

अमेरिकेत राजकीय वादळ! इराणवरील हल्ल्यासाठी ट्रम्प यांनी संरक्षण मंत्र्यांना धरले जबाबदार; “तेच म्हणाले, हे करूया’…”

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी मध्यपूर्वेतील युद्धबंदी बाबात काय दावा केला?

    Ans: ट्रम्प यांनी युद्ध थांबण्यावसाठी अमेरिका-इराणमध्ये सकारात्मक चर्चा सुरु असल्याचा दावा केला आहे. सध्या पाच दिवसांसाठी युद्धविराम करण्यात आला आहे.

  • Que: इराणमध्ये कोण घेत आहे निर्णय?

    Ans: सध्या इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई अनुपस्थित असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा किंवा ते हल्ल्यात गंभीर जखमी असल्याचा दावा केला जात आहे. परंतु याच वेळी इराणमधील निर्णय घेण्याबाबत मोहम्मद बाघेर गालिफ, अब्बास अराघची यांची नावे समोर येत आहेत. परंतु अद्याप याबाबत काहीही स्पष्ट नाही.

Web Title: Middle east war us iran mojtaba khamenei donald trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 06:16 PM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा
1

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा
2

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
3

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?
4

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.