
NAZA Documentary Venice Film Festival Israel Gaza War AI
आजच्या आधुनिक युगात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI चा वापर शिक्षण, वैद्यकीय क्षेत्र, व्यवसाय, आयटी आणि संशोधनामध्ये अत्यंत वेगाने वाढला आहे. मानवी जीवन अधिक सुलभ करण्यासाठी निर्माण झालेले हे तंत्रज्ञान आता मात्र रणांगणावर थेट माणसाच्या ‘जीवन-मरणाचे’ निर्णय घेऊ लागले आहे. रणांगणावर केवळ बंदुका, क्षेपणास्त्रे, विमाने आणि सैनिकच युद्ध लढत नसून संगणकाचे अल्गोरिदम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सैन्याला कोणाला मारायचे आणि कोणाला सोडायचे याचे आदेश देत आहेत.(Israel)
नुकत्याच पार पडलेल्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘नाझा’ (NAZA Documentary) या इस्रायल-गाझा युद्धावर आधारित माहितीपटाचा प्रीमियर झाला. या माहितीपटाच्या प्रदर्शनानंतर जगभरात आणि विशेषतः जागतिक स्तरावर संतापाची मोठी लाट उसळली आहे. तंत्रज्ञान माणसाच्या जगण्या-मरण्याचा निर्णय इतक्या निष्ठुरपणे कसे घेऊ शकते, असा गंभीर नैतिक आणि मानवाधिकारविषयक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. इस्रायली सैन्याने युद्धादरम्यान लोकां शोधून काढण्यासाठी आणि त्यांना लक्ष्य करून ठार मारण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा कसा वापर केला, याचे विदारक चित्रण या माहितीपटात मांडण्यात आले आहे.
‘नाझा’ या माहितीपटाची निर्मिती करताना इस्रायली संरक्षण दलातील (IDF) आणि गुप्तचर विभागातील २४ वेगवेगळ्या सूत्रांचा हवाला देण्यात आला आहे. या सूत्रांची सुरक्षेच्या कारणास्तव नावे गुप्त ठेवण्यात आली असली तरी त्यांच्या सखोल मुलाखती आणि तपासातून इस्रायलच्या दोन अत्यंत शक्तिशाली व गुप्त एआय प्रणाली जगासमोर आल्या आहेत. गाझा युद्धाच्या काळात या दोन्ही प्रणालींचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आल्याचा दावा या माहितीपटात करण्यात आला आहे.
१. लॅव्हेंडर (Lavender): ही एआय प्रणाली गाझामधील फोन डेटा, संदेश आणि लोकांच्या संशयित हालचालींचे विश्लेषण करून ‘दहशतवादी’ आणि लष्करी लक्ष्यांची स्वयंचलित यादी तयार करण्याचे काम करत असे.
२. व्हेअर्स डॅडी? (Where’s Daddy?): ही दुसरी सिस्टीम लॅव्हेंडरने निवडलेल्या संशयित व्यक्तींवर २४ तास लक्ष ठेवत असे. ही व्यक्ती आपल्या घरी कुटुंबासोबत कधी पोहोचते, याचे रिअल-टाईम अलर्ट ती इस्रायली लष्करी ऑपरेटर्सना पाठवत असे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?
माहितीपटात मुलाखत दिलेल्या एका माजी इस्रायली लष्करी अधिकाऱ्याने अत्यंत धक्कादायक माहिती उघड केली. युद्धाच्या सुरुवातीच्या काही महिन्यांतच ‘लॅव्हेंडर’ सिस्टीमने तब्बल ३७,००० संभाव्य संशयितांची ‘टार्गेट लिस्ट’ (Target List) तयार केली होती. ७ ऑक्टोबरच्या घटनेपूर्वी हमासच्या कार्यकर्त्यांचे फोन, त्यांचे संभाषण आणि त्यांच्या दैनंदिन हालचालींच्या डेटावर या एआयला प्रशिक्षित (Train) करण्यात आले होते. त्यानंतर संपूर्ण गाझा परिसरातील फोन डेटा स्कॅन करून एआयने स्वतःच ही यादी तयार केली.
The Gaza documentary “NAZA” earned a massive 24.5-minute #VeniceFilmFestival ovation as the crowd cheered and waved Palestinian flags. This marks the longest-ever standing ovation at Venice, beating the 22-minute ovation for “The Voice of Hind Rajab” last year, and perhaps the… pic.twitter.com/WuE0Lr7ZFi — Variety (@Variety) September 10, 2026
credit – social media and Twitter
माहितीपटातील दाव्यानुसार, इस्रायली लष्करी ऑपरेटर या एआय सिस्टीमद्वारे निवडलेल्या लक्ष्यांची अंतिम मंजुरी देण्यापूर्वी मानवी स्तरावर तपासणी करत असल्याचे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्ष व्यवहारात, प्रत्येक लक्ष्याची तपासणी करण्यासाठी एका ऑपरेटरला अवघे २० सेकंद दिले जात होते! अवघ्या २० सेकंदांत एआयचा निर्णय बरोबर आहे की नाही हे ठरवणे अशक्य असल्याने, ऑपरेटर डोळे झाकून एआयच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करत होते. यामुळे अनेक निष्पाप नागरिक, महिला आणि लहान मुले एआयच्या चुकीच्या विश्लेषणामुळे मारली गेल्याचा आरोप या माहितीपटातून करण्यात आला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump-Xi Meet : रेड कार्पेट, 21 तोफांची सलामी अन् B-1 बॉम्बरची गर्जना; जिनपिंग यांचे USमध्ये जंगी स्वागत, चर्चेत 4 मोठे मुद्दे
दरम्यान, या धक्कादायक माहितीपटानंतर इस्रायली संरक्षण दलाने (IDF) हे सर्व दावे पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. ‘द टेलिग्राफ’शी बोलताना एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, माहितीपटात दाखवण्यात आलेली माहिती अतिरंजित असून लष्कराची चुकीची प्रतिमा निर्माण करणारी आहे.
तथापि, त्यांनी आधुनिक युद्धात एआय आणि प्रगत संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर पूर्णपणे नाकारलेला नाही. कोणत्याही हवाई हल्ल्याला किंवा कारवाईला अंतिम मंजुरी देण्यापूर्वी लष्करी अधिकारी प्रत्यक्ष परिस्थिती, आजूबाजूला असणारे सामान्य नागरिक, जीवितहानीची शक्यता आणि लष्करी उद्दिष्टे या सर्व बाबींची काटेकोरपणे शहानिशा करतात, असा दावा इस्रायली सैन्याकडून करण्यात आला आहे.