Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Canada News: मोदींचे राजकारण G-7 मध्ये संपेल…; खलिस्तान समर्थकांकडून धमकी, पत्रकाराचा खळबळजनक दावा

ते अक्षरशः गुंडासारखे वागले. त्यांनी मला रेकॉर्डिंग करू देऊ नये म्हणून माझ्यावर दबाव टाकला आणि माझा पाठलाग सुरू केला. हा अनुभव भयावह होता,” असे बेझिरगन यांनी नमूद केले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 08, 2025 | 05:24 PM
Canada News: मोदींचे राजकारण G-7 मध्ये संपेल…; खलिस्तान समर्थकांकडून धमकी, पत्रकाराचा खळबळजनक दावा
Follow Us
Close
Follow Us:

Canada News:  खलिस्तान समर्थकांकडून एका तपास पत्रकाराला धमकी दिल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. प्रसिद्ध तपास पत्रकार मोचा बेझिरगन यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, व्हँकूवरमधील डाउनटाउन परिसरात सुरू असलेल्या एका साप्ताहिक रॅलीचे चित्रीकरण करत असताना आंदोलकांनी त्यांना घेरले आणि धमकावले.

बेझिरगन म्हणाले, “मी माझे पत्रकार म्हणून कर्तव्य पार पाडत होतो. मात्र चित्रीकरणादरम्यान काही आंदोलकांनी माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. ही बाब केवळ माझ्या कामात अडथळा निर्माण करणारी नव्हे, तर माध्यम स्वातंत्र्यावरही गंभीर आघात करणारी आहे.” या प्रकारामुळे कॅनडामध्ये पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, माध्यम प्रतिनिधींनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. या घटनेची चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणीही केली जात आहे.

एका Parle -G बिस्किटाची किंमत वाचून व्हाल थक्क; गाझातील बापाची मुलीसाठी जीवापाड धडपड

खलिस्तान समर्थकांकडून धमकी मिळाल्यानंतर तपास पत्रकार मोचा बेझिरगन यांनी आपबीती सांगितली. “ही घटना माझ्यासोबत फक्त दोन तासांपूर्वी घडली आणि मी अजूनही थरथरतोय. व्हँकूवरच्या डाउनटाउनमध्ये सुरू असलेल्या एका रॅलीच्या चित्रीकरणादरम्यान आंदोलकांनी त्यांना घेरले, पाठलाग केला आणि त्यांच्या हातातील फोन हिसकावून घेतला, असा आरोप त्यांनी केला.

“मोदींचे राजकारण G-7 मध्ये संपेल” – आंदोलकांचा दावा

“ते अक्षरशः गुंडासारखे वागले. त्यांनी मला रेकॉर्डिंग करू देऊ नये म्हणून माझ्यावर दबाव टाकला आणि माझा पाठलाग सुरू केला. हा अनुभव भयावह होता,” असे बेझिरगन यांनी नमूद केले. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत बेझिरगन म्हणाले, “कॅनडा आणि भारत यांच्यातील तणावाचा मूळ आधार राजकीय आहे. पण आपण येथे भूमिगत काय सुरू आहे ते दुर्लक्षित करत आहोत. हे लोक इंदिरा गांधींच्या मारेकऱ्यांचा जयजयकार करत आहेत. ते भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजकारण G-7 परिषदेत संपेल, असेही म्हणत आहेत.” या प्रकारामुळे केवळ पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत नव्हे, तर कॅनडामधील खलिस्तान समर्थकांच्या वाढत्या धोकादायक प्रवृत्तीबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.

खलिस्तान समर्थकांवर गंभीर आरोप करत  मोचा बेझिरगन यांनी सांगितले की, “हे लोक इंदिरा गांधींच्या मारेकऱ्यांना आपले पूर्वज मानतात आणि त्यांच्या कृत्यांचे खुलेआम glorification करत आहेत.” व्हँकूवरमध्ये झालेल्या एका रॅली दरम्यान बेझिरगन यांना जमावाने घेरले, धमकावले आणि त्यांच्या हातातील फोन हिसकावून घेतला.

Devendra Fadnavis News: धूल चेहरे पर थी और आईना पोछते रहे !देवेंद्र फडणीसांची राहुल गांधींवर जहरी टीका

“तुम्ही मोदींचे राजकारण संपवणार का?”

“जेव्हा मी त्यांना विचारले की, ‘तुम्ही इंदिरा गांधींसारखे नरेंद्र मोदी यांचेही राजकारण संपवणार आहात का?’ – तेव्हा त्यांनी उघडपणे सांगितले की, आम्ही इंदिरा गांधींच्या मारेकऱ्यांचे वंशज आहोत. ते हिंसेचे उदात्तीकरण करत होते. त्यांच्या मागे लागलेल्या जमावाचे नेतृत्व करणारा व्यक्ती पूर्वी त्यांना ऑनलाईन त्रास देत होता. “मी कॅनडा, अमेरिका, ब्रिटन आणि न्यूझीलंडमधील खलिस्तानी निदर्शनांचे दस्तऐवजीकरण करत आहे. त्यामुळे याआधीही मला लक्ष्य केले गेले आहे.” असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

पोलिसांचा हस्तक्षेप, जबाब नोंदवला

“रविवारी रॅलीचे चित्रीकरण करत असताना अचानक दोन-तीन लोक माझ्यासमोर आले. मी बॅकअप रेकॉर्डिंग सुरू केले, तेव्हा त्यांच्यापैकी एकाने माझ्या हातातील फोन हिसकावून घेतला,” असे बेझिरगन म्हणाल्या. यावेळी जवळच उपस्थित असलेल्या व्हँकूवर पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना माघार घेण्यास भाग पाडले. यानंतर बेझिरगन यांनी पोलीस ठाण्यात आपला अधिकृत जबाबही नोंदवला.

 

Web Title: Modis politics will end in g 7 threat from khalistani supporter journalists sensational claim 123

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2025 | 05:19 PM

Topics:  

  • Canada News
  • G-7
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी
1

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी

Canada Theatre Violence: कॅनडामध्ये भारतीय चित्रपटांच्या स्क्रिनिंगवर बंदी…काय आहे कारण?
2

Canada Theatre Violence: कॅनडामध्ये भारतीय चित्रपटांच्या स्क्रिनिंगवर बंदी…काय आहे कारण?

RSS ला 100 वर्ष झाली तरी ‘मूंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम; हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
3

RSS ला 100 वर्ष झाली तरी ‘मूंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम; हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

ऐन Dasara मेळाव्यात संजय राऊत काय बोलून गेले? मोदींना थेट रावणाची… ; राजकारण तापणार
4

ऐन Dasara मेळाव्यात संजय राऊत काय बोलून गेले? मोदींना थेट रावणाची… ; राजकारण तापणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.