पाकिस्तान: जगभरात मंकीपॉक्सच्य़ा रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच भारताचा शेजारी देश पाकिस्तानातही मंकीपॉक्सच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानातील पेशावर येथे एका विमानातील प्रवाशामध्ये मंकी पॉक्स (एमपॉक्स) विषाणूची पुष्टी झाल्यानंतर देशातील ‘एमपॉक्स’ रुग्णांची संख्या पाच झाली आहे. तर कराचीमध्येही या प्राणघातक विषाणूचा संशयित रुग्ण आढळून आल्याने पाकिस्तानातील आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.
खैबर पख्तूनख्वाच्या उत्तर-पश्चिम प्रांताचे सार्वजनिक आरोग्य संचालक डॉ.इरशाद अली म्हणाले की, विमानतळावरील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना जेद्दाहून परत आलेल्या दोन प्रवाशांमध्ये ‘एमपॉक्स’ची लक्षणे आढळून आली आणि त्यापैकी फक्त एकाला एमपॉक्स विषाणूची चाचणी सकारात्मक आली.
हेदेखील वाचा: या हॉटेलमध्ये रूमपासून वॉशरूमपर्यंत सर्वच सोन्याने मढवलेले; जाणून घ्या कुठे आहे?
पुष्टी झालेल्या प्रकरणात ओरकझाई येथील 51 वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे, ज्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. त्याला उपचारासाठी पेशावर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहोत. याशिवाय एका 32 वर्षीय व्यक्तीलाही MPox सारखी लक्षणे दिल्यानंतर कराचीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती डॉ. इरशाद यांनी दिली आहे.
MPOX लसींच्या खरेदीसाठी युनिसेफने आपत्कालीन निविदा जारी करण्याची घोषणा केली आहे. आफ्रिका CDC, Gavi, लस अलायन्स, WHO, पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशन आणि इतर भागीदारांच्या सहकार्याने सर्वाधिक प्रभावित देशांसाठी Mpox लस सुरक्षित करण्याचे UNICEF निविदाचे उद्दिष्ट आहे.
हेदेखील वाचा: मनोज जरांगे पाटील यांचा नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात दौरा; राजकोट किल्ल्याची केली पाहणी
पाकिस्तानी पंतप्रधानांचे आरोग्य समन्वयक डॉ. मुख्तार अहमद यांनी जनतेला आवाहन केले आहे की, त्यांच्या कुटुंबातील कोणाला प्रवास केल्यानंतर MPox ची लक्षणे दिसल्यास त्यांनी ताबडतोब कुटुंबातील सदस्यांपासून स्वतःला वेगळे करावे. तसेच ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. त्यांच्या सूचनांचे पालन करा. लक्षणे दिसण्यासाठी 10 ते 15 दिवस लागू शकतात. रुग्णासोबत जास्त वेळ घालवल्याने संसर्ग पसरतो. रुग्णाला क्वारंटाईन केले तर बरे होईल.