Mossad refused Qatar Hamas strike Netanyahu order revealed
कतारमध्ये हमास नेत्यांना लक्ष्य करण्यास मोसादचा नकार.
पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी थेट हवाई हल्ल्याचे आदेश देत जबाबदारी स्वीकारली, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र टीका झाली.
कतारने या हल्ल्याला “मध्यस्थी प्रक्रियेचा विश्वासघात” म्हणत निषेध नोंदवला.
Israel Attack Qatar : मध्यपूर्वेतील संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कतारच्या राजधानी दोहा येथे इस्रायलने नुकतेच केलेल्या हवाई हल्ल्यानंतर जगभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या हल्ल्याबाबत आता एक मोठा खुलासा समोर आला आहे इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद कतारमध्ये हमास कमांडर्सवर थेट कारवाई करण्यास तयार नव्हती. मात्र, पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी मोसादच्या या भूमिकेला न जुमानता थेट हवाई हल्ल्याचा मार्ग स्वीकारला.
वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, इस्रायलने आपल्या एजंट्समार्फत कतारमधील हमास नेत्यांना लक्ष्य करण्याची योजना आखली होती. परंतु, मोसादचे प्रमुख डेव्हिड बार्निया यांनी या मोहिमेला विरोध दर्शवला. कारण सोपे होते कतारसोबत इस्रायलचे नव्याने प्रस्थापित होत असलेले संबंध धोक्यात येऊ नयेत. कतार सध्या गाझा संघर्षात मध्यस्थाची महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अशा परिस्थितीत कतारच्या भूमीवर थेट हत्या मोहिम राबविणे हे त्या नाजूक प्रक्रियेवर आघात ठरले असते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : London far-right protest : ‘लढा नाहीतर मरा… ‘, अमेरिकेत बसून लंडनमध्ये निदर्शने का भडकावत आहेत एलोन मस्क?
मात्र, इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी मोसादचा नकार लक्षात न घेता ९ सप्टेंबर रोजी हवाई हल्ल्याचे आदेश दिले. दोहा येथे झालेल्या या हल्ल्याचे लक्ष्य हमासचा कार्यवाहक नेता खलील अल-हय्या आणि इतर वरिष्ठ कमांडर्स होते. नेतान्याहू यांनी या कारवाईची उघडपणे जबाबदारी स्वीकारली आणि इस्रायलच्या भूमिकेचे समर्थन केले.
हमासने दावा केला आहे की या हल्ल्यात त्यांचे वरिष्ठ नेते मृत्यूमुखी पडले नाहीत. मात्र, हमासच्या अनेक नातेवाईकांसह काही सहकारी आणि एका कतारी अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. यामुळे कतारमध्ये संतापाची लाट उसळली असून, त्यांनी या हल्ल्याला “मध्यस्थी प्रक्रियेचा विश्वासघात” म्हणत निषेध नोंदवला. कतारच्या भूमिकेला धक्का बसल्याने इस्रायलवर आंतरराष्ट्रीय स्तरावरही टीका झाली.
BIG: Mossad reportedly refused to carry out a planned ground operation to assassinate Hamas leaders in Qatar, so the government launched an airstrike instead, which ultimately failed.
Source: WaPo pic.twitter.com/NN2QFDBGUR
— Clash Report (@clashreport) September 12, 2025
credit : social media
हवाई हल्ल्याच्या वेळेबाबत इस्रायलच्या सैन्य प्रमुख लेफ्टनंट जनरल इयाल झमीर यांनी विरोध दर्शवला होता. परंतु संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ आणि धोरणात्मक व्यवहार मंत्री रॉन डर्मर यांनी नेतान्याहूंचा पाठींबा घेतला. यावरून इस्रायली नेतृत्वामध्येही मतभेद स्पष्ट झाले.
कतारव्यतिरिक्त अनेक देशांनी या हल्ल्याची निंदा केली आहे. कतारने स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, अशा कारवायांनी इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेली युद्धबंदी चर्चाच धोक्यात येईल. विश्लेषकांच्या मते, नेतान्याहू आता कोणत्याही प्रकारच्या चर्चेला कमी महत्त्व देत आहेत आणि संघर्ष अधिक तीव्र करण्याच्या दिशेने पावले उचलत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Tariff War : ‘आम्ही युद्धाचा कट रचत…’ अमेरिकेच्या टॅरिफ दादागिरीवर आता ड्रॅगन चवताळला
अहवालात असेही म्हटले गेले आहे की, मोसादला आवश्यकता भासल्यास हमासच्या अधिकाऱ्यांना वर्षभरात किंवा चार वर्षांत पकडणे शक्य आहे आणि त्यासाठी त्यांच्याकडे क्षमता आहे. परंतु नेतान्याहूंचा “तत्काळ हल्ला” हा निर्णय दीर्घकालीन राजनैतिक संबंधांवर गडद सावली टाकू शकतो. कतारमधील हल्ल्याने इस्रायलच्या राजकीय आणि लष्करी धोरणातील गंभीर मतभेद उघड केले आहेत. मोसादने संयमाची भूमिका घेतली असताना नेतान्याहूंच्या तडकाफडकी कारवाईमुळे केवळ कतारच नव्हे तर संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाशी इस्रायलचे संबंध अधिक गुंतागुंतीचे होऊ शकतात. संघर्ष संपविण्याऐवजी हा पाऊल पुढील संघर्षाला आमंत्रण देणारा ठरू शकतो.