Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Artemis 2 Mission : नासाचे आर्टेमिस 2 मिशन यशस्वी; पृथ्वीवर सुखरूप पोहोचले अंतराळवीर

अंतराळवीरांना घेऊन जाणारे ओरियन अंतराळयान ११ एप्रिल रोजी स्थानिक वेळेनुसार रात्री ८:०७ वाजता आणि भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे ५:३७ वाजता पॅसिफिक महासागरात सुखरूप उतरले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 11, 2026 | 07:16 AM
Artemis 2 Mission : नासाची आर्टेमिस 2 मिशन यशस्वी; पृथ्वीवर सुखरूप पोहोचले अंतराळवीर

Artemis 2 Mission : नासाची आर्टेमिस 2 मिशन यशस्वी; पृथ्वीवर सुखरूप पोहोचले अंतराळवीर

Follow Us
Follow Us:

वॉशिंग्टन : नासाकडून आर्टेमिस 2 ही चंद्र मोहीम सुरु करण्यात आली होती. या मोहिमेत अंतराळवीर चंद्रावर न उतरता प्रदक्षिणा घालणार होते. त्यानुसार, ही मोहिम पूर्ण करून चारही अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप परतले आहेत. या मोहिमेचे अंतराळयान, ओरियन, 10 दिवसांच्या यशस्वी मोहिमेनंतर आज पॅसिफिक महासागरात सुखरूप उतरले.

अंतराळवीरांना घेऊन जाणारे ओरियन अंतराळयान ११ एप्रिल रोजी स्थानिक वेळेनुसार रात्री ८:०७ वाजता आणि भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे ५:३७ वाजता पॅसिफिक महासागरात सुखरूप उतरले. कॅलिफोर्नियातील सॅन दिएगोच्या किनाऱ्याजवळ पॅसिफिक महासागरात आर्टेमिस २ च्या उतरण्याचे थेट प्रक्षेपण नेटफ्लिक्स आणि नासाच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर करण्यात आले. तब्बल 54 वर्षांनंतर पुन्हा एकदा चंद्राच्या दिशेने मानवाचा प्रवास झाला. नासाची पहिली मानवी मोहीम आर्टेमिस-II गुरुवारी (दि.२) भारतीय वेळेनुसार पहाटे ४:०५ वाजता फ्लोरिडामधून यशस्वीरित्या प्रक्षेपित झाली.

एसएलएस (SLS) रॉकेटमध्ये क्रिस्टीना कोच, व्हिक्टर ग्लोव्हर, रीड वाईजमन आणि जेरेमी हॅन्सन हे अंतराळवीर होते. हा 10 दिवसांचा प्रवास अंतराळवीरांना पृथ्वीपासून अंदाजे ४०६००० किलोमीटर दूर घेऊन गेला. ही मोहीम आतापर्यंतची सर्वात लांब मानवी अंतराळ प्रवास करणारी ठरली.

कशी होती मोहीम?

आर्टेमिस-II मोहीम अंतराळवीरांना चंद्राच्या जवळ घेऊन गेली. मात्र, ते चंद्रावर उतरले नाहीत. ही एक चाचणी मोहीम होती. ज्याचा उद्देश भविष्यातील चंद्र मोहिमांसाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान आणि क्षमता तपासणे असे होते. संपूर्ण मोहीम अंदाजे १० दिवसांत पूर्ण झाले आणि अंतराळवीर चंद्राभोवती प्रदक्षिणा घालून पृथ्वीवर सुरक्षितपणे परत आले आहेत. नासाने सोशल मीडियावर पोस्ट करून लोकांना या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आमंत्रित केले होते. संस्थेने म्हटले आहे की, ही मोहीम चंद्रावर आणि त्यानंतर मंगळावर मानवी वस्तीच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.

सर्वाधिक अंतर आता पार करणार

नासाच्या मते, आर्टेमिस-II मोहीम चार अंतराळवीरांना सुमारे १० दिवसांच्या प्रवासात चंद्राभोवती घेऊन गेली. १९७२ नंतर प्रथमच मानव पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या पलीकडे गेला आणि हे अंतर आजपर्यंतच्या कोणत्याही मानवी अंतराळ प्रवासापेक्षा जास्त असू शकते. ही मोहीम आर्टेमिस कार्यक्रमाचा एक भाग आहे, ज्याचा उद्देश चंद्रावर मानवाची कायमस्वरूपी वस्ती स्थापन करणे आहे. हे अत्यंत महत्त्वाचे ठरेल.

हेदेखील वाचा : Artemis II : 54 वर्षांनंतर नासा रचणार इतिहास! पृथ्वीपासून 4.5 लाख किमी दूर; नासाचे ‘ते’ 4 वीर जाणार चंद्राच्या काळोख्या बाजूला

Web Title: Nasas artemis 2 mission successful astronauts safely return to earth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 07:06 AM

Topics:  

  • international news
  • NASA

संबंधित बातम्या

BLS International चा मोठा निर्णय! Toomas Hendrik Ilves यांची ग्लोबल स्ट्रॅटेजिक ॲडव्हायझरपदी नियुक्ती
1

BLS International चा मोठा निर्णय! Toomas Hendrik Ilves यांची ग्लोबल स्ट्रॅटेजिक ॲडव्हायझरपदी नियुक्ती

India Pakistan 1991 Agreement: पाकिस्तानचं शेपूट वाकडचं; घुसखोरीतून भारत-पाक १९९१ कराराचे ‘कलम १०’ चे उल्लंघन?
2

India Pakistan 1991 Agreement: पाकिस्तानचं शेपूट वाकडचं; घुसखोरीतून भारत-पाक १९९१ कराराचे ‘कलम १०’ चे उल्लंघन?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.