Nearly 200 killed and thousands injured in Israel attack on Islamic countries
Israel News in Marathi : जेरुसेलम : एक मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे. इस्रायलने गेल्या ७२ तासांत ६ मुस्लिम देशांवर हल्ला केला आहे. यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. यामध्ये गाझा, सीरिया, लेबनॉन, कतार, येमेन आणि ट्युनिशिया या सहा देशांचा समावेश आहे. सोमवार (०८ सप्टेंबर) पासून बुधवारपर्यंत (१० सप्टेंबर) हे हल्ले करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात २०० हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले असून १००० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. इस्रायलने या देशातील हमासच्या ठिकाणांना लक्ष्य केले आहे. यापूर्वी इस्रायलने कतारची राजधानी दोहावरही हल्ले केले होते. यामध्ये हमासच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले होते. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलच्या या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे.ट्रम्प यांनी या हल्ल्यांची तुलना ९/११च्या अमेरिकेवरील हल्ल्याशी केली आहे.
Middle East : आखाती देश आक्रमण करणार… कतारने दिला इशारा, इस्रायलला मिळणार चोख प्रत्युत्तर
मंगळवारी (०९ सप्टेंबर) इस्रायलच्या सैन्याने कतारची राजधनी दोहावर हल्ला केला होता. या हल्ल्याच हमासच्या प्रमुखांना लक्ष्य करण्यात आले होते. कतारने इस्रायलच्या या हल्ल्याला तीव्र निषेध केला आणि याला आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलच्या या हल्ल्यात हमास प्रमुख खलील अल-हय्या यांना लक्ष्य करण्यात आले परंतु त्यांचा जीव थोक्यात बचावला. मात्र या हल्ल्यात त्यांचा मुलगा, हमासच्या कार्यालयाचे प्रमुख, तीन रक्षक आणि एका कतारच्या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला.
याच वेळी इस्रायलने सोमवारी (०८ सप्टेंबर) ही पूर्व लेबॉनमध्ये बेका आणि हर्मेल जिल्ह्यात हवाऊ हल्ले केले आहेत. यात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलने या हल्ल्यात हिजबुल्लाहला लक्ष्य करण्यात आले असल्याचा दावा केला आहे. परंतु हिजबुल्लाहने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. इस्रायलने हल्ल्यासाठी ड्रोन्सचा वापर केला.
तसेच सोमवारीच (०८ सप्टेंबर) इस्रायलने लढााई विमानांनी सीरियातही हल्ला केला. यामध्ये सीरियाच्या हवाई दलाच्या तळाला आणि लष्करी छावणीला लक्ष्य करण्यात आले. पण या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सीरियाच्या सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्स (SOHR)ने म्हटले आहे. सीरियाने या हल्ल्यांना विरोध करत त्यांच्या सार्वभौमत्त्वाचे उल्लंघन झाले असल्याचे म्हटले आहे.
ट्युनिशिया
०८ सप्टेंबरच्या रात्रीच इस्रायलने ट्युनिशियाच्या बंदरावर एका कुटुंबाच्या बोटीवर ड्रोनने हल्ला केला होता. यावर ६ लोक होते, इस्रायलच्या मते हे लोक पोर्तुगीज ध्वज घेऊन प्रवास करत होते. परंतु यात कोणी मारले गेल्याचे वृत्त मिळालेले नाही. या हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी ०९ सप्टेंबरला ब्रिटिश ध्वज असलेल्या जहाजावर इस्रायाले ड्रोन डागले होते. हमाससोबत युद्ध सुरु झाल्यापासून इस्रायल गाझात जाणाऱ्या जहाजांना उडवून टाकत आहे.
येमेन
दरम्यान बुधवारी (१० सप्टेंबर) रोजी इस्रायलने येमेनची राजधानी साना येथे हल्ला केला. तसेच यापूर्वी २८ ऑगस्ट रोजीही हल्ला करण्यात आला होता. यामध्ये हुथींच्या पंतप्रधान अहमद अल-राहवीसह १० जण मृत्यूमुखी पडले. तर ९० जखमी झाले होते.
गाझा
याच वेळी इस्रायलचे गाझामध्ये हल्ले सुरुच आहेत. यामध्ये १५० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ५४० लोक जखमी झाले आहत. २०२३ मध्ये युद्ध सुरु झाल्यापासून ६४ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक उपासमारीनेही मारले गेले आहेत.
FAQs(संबंधित प्रश्न)
इस्रायल आणि हमासमध्ये का सुरु आहे युद्ध?
०७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला होता. तसेच अनेक इस्रायली लोकांना कैद केले होते. यामुळे इस्रायलने हमासविरोधी युद्ध पुकारले.
इस्रायलने किती आणि कोणत्या देशांवर केला हल्ला?
इस्रायलने गेल्या ७२ तासांत ६ मुस्लिम देशांवर हल्ला केला आहे. यामध्ये गाझा, सीरिया, लेबनॉन, कतार, येमेन आणि ट्युनिशिया या देशांचा समावेश आहे.