Nepal Congress MP files FIR against former PM Oli
Oli Sharma News : काठमांडू : नेपाळचे माजी पंतप्रधान केपी ओली शर्मा मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या चार दिवसांपासून नेपाळमध्ये ओली सरकारविरोधात तीव्र आंदोलन सुरु होते. या आंदोलनाने हिंसक रुप घेतले होते. यामध्ये अनेक लोकांचा बळी गेला, अनेक ठिकाणी जाळपोळ झाली. यामुळे या हिंसाचारात बळी गेलेल्या लोकांच्या खूनाचा आरोप ओली शर्मा यांच्यावर करण्यात आला आहे.
देशात नव्या राजकीय पर्वाची सुरुवात
सध्या देशात नव्या राजकीय पर्वाची सुरुवात होत आहे. अंतिरम सरकराच्या पंतप्रधान पदाची शपथ सुशीला कार्की यांनी घेतली आहे. सुशीला कार्की यांना नेपाळच्या पहिला महिला पंतप्रधान असून त्यांनी यापूर्वी पहिल्या महिला सर न्यायाधीश म्हणून कामकाज पाहिवे आहे. रविवारपर्यंत यामध्ये इतर मंत्र्यांची देखील नियुक्त करण्यात येणार आहे. तसेच देशातील कर्फ्यू देखील हटवण्यात आला आहे. ०५ मार्च २०२६ पूर्वी सार्वत्रिक निवडणूका घेतल्याजाणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे.
का सुरु होते नेपाळमध्ये आंदोलन?
गेल्या आठवड्यात सोशल मीडियावरील बंदीमुळे देशात जनरेशन-झेडच्या तरुणांनी तीव्र आंदोलन छेडले होते. तसेच भ्रष्टाचार, नेपोटिझ, आणि बेरोजगारीवरुन देखील तरुणांनी संपूर्ण भडास काढली होती. या निदर्शनांमध्ये २० हून अधिक लोकांचा बळी गेला, तर ३०० हून अधिक लोक जखमी झाले. यावेळी ओली शर्मा यांच्या पंतप्रधान पदाच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली, अनेक मंत्र्यांना मारहाण करण्यात आली.
देशातील बिघडती परिस्थिती पाहता ओली शर्मा यांनी राजीनामा दिला, यामुळे परिस्थितीसुधारले अशी आशा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान त्यांनी नेपाळ सोडले आणि जवळच असलेल्या शिवपुरीमध्ये आश्रय घेतला. बंदी उठवल्यानंतर आणि ओली यांच्या राजीनाम्यानंतरही देशातील परिस्थिती सुधारलेली नव्हती. आंदोलनकर्त्यांनी संसद भवन, राष्ट्रपती भवन, नेत्यांची घरे पेटवून दिली होती. त्यांच्या कुटुंबीयांना देखील मारहाण करण्यात आली.
ओली यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल
सध्या अंतरिम सरकार स्थापन झाले असून जनरेशन झेडच्या शांततापूर्ण निदर्शनांवर गोळीबार करण्याच्या आरोपाखाली आणि
यामध्ये मृत पावलेल्या लोकांच्या हत्येच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेपाळच्या प्रतिनीधी सभागृहाचे माजी सदस्य आणि कॉंग्रेस खासदार अभिषेर प्रताप शाह यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
नेपाळच्या अंतरिम मंत्रीमंडळाचा विस्तार
दरम्यान नेपाळच्या अंतिरम मंत्रीमंडाळाचा विस्तार करण्यासाठी रविवारी (१४ सप्टेंबर) सविस्तर चर्चा केली जात आहे. सुशीला कार्की यांनी आज जनरल झेडच्या प्रतिनिधी आणि इतरांशी चर्चा केली आहे. यानंतर मंत्रीमंडळ स्थापन होईल आणि सुशीला कार्की यांचा शपथविधी सोहळा केला जात. तसेच उद्यापासून शाळा आणि सराकरी कार्यालये सुरु करण्यात येणार आहे.
FAQs(संबंधित प्रश्न)
नेपाळमध्ये का सुरु होते आंदोलन?
नेपाळमध्ये ओली सरकारच्या सोशल मीडियावरील बंदी, भ्रष्टाचार, नेपोटिझम आणि देशातील बेरोजगारी या सर्व कारणांमुळे तरुणांनी आंदोलन छेडले होते.
नेपाळच्या अंतरिम सरकारची सूत्रे कोणी हाती घेतली?
नेपाळच्या अंतरिम सरकारची सूत्रे माजी पहिल्या महिला सर न्यायाधीश सुशीला कार्की यांनी घेतली आहेत. १२ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ ग्रहण केली.