नेपाळमध्ये नवा राजकीय अध्याय सुरु! PM मोदींनी पहिल्या महिला पंतप्रधान सुशीला कार्कींना दिल्या शुभेच्छा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
PM Modi Congratualte Susila Karki : काठमांडू : नेपाळच्या राजकराणात एक नवा अध्याय सुरु झाला आहे. देशाच्या माजी महिला सर न्यायाधीश सुशीला कार्की यांनी देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. शुक्रवारी (१२ सप्टेंबर) त्यांनी नेपाळच्या अंतरिम सरकारची सूत्रे हाती घेतली. जनरेशन-झेडच्या हिंसक आंदोलनानंतर एक आठवड्यानंतर नेपाळमध्ये स्थिरता आली आहे. दरम्यान या नव्या राजकीय बदलावर भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अंतरिम सरकारच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांना नव्या पर्वासाठी शुभेच्छा दिल्या आहे.
पंतप्रधान मोदींनी केले सुशीला कार्की यांचे अभिनंदन
तसेच पंतप्रधान मोदींनी नेपाळच्या शांततेसाठी भारताचा पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी सोशल मीडियावर यांसर्भात पोस्ट केली आहे. पंतप्रधान मोदींनी एक्सवर लिहिले की, “नेपाळच्या अंतरिम सरकारच्या पंतप्रधान पदाची शपथ ग्रहण केल्याबद्दल माननीय सुशीला कार्की यांचे हार्दिक अभिनंदन. भारत नेपाळच्या बंधूभगिनींच्या शांतता, प्रगती आणि समृद्धीसाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे.”
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
या संदर्भात भारतीय परराष्ट्र मंत्रालयानेही एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, शेजारी देश नेपाळच्या नागरिकांच्या भल्यासाठी भारत सहकार्य सुरु ठेवण्याची हमी देतो. तसेच आम्ही माननीय श्रीमती सुशीला कार्की यांच्या नेतृत्वाखाली नेपाळमध्ये नव्या अंतिरम सरकारच्या स्थापनेचेही स्वागत करतो. भारताला आशा आहे की, या नव्या बदलामुळे नेपाळमध्ये शांतता आणि स्थिरता वाढेल. हे भारताच्या संतुलित आणि सकारात्मक धोरणाचे प्रतिबिंब आहे.
नेपाळच्या पंतप्रधानपदी Sushila Karki; राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर तातडीने घेतली शपथ
नेपाल की अंतरिम सरकार की प्रधानमंत्री के रूप में पद ग्रहण करने पर माननीय सुशीला कार्की जी को हार्दिक शुभकामनाएं। नेपाल के भाई-बहनों की शांति, प्रगति और समृद्धि के लिए भारत पूरी तरह से प्रतिबद्ध है।
— Narendra Modi (@narendramodi) September 13, 2025
नेपाळमध्ये राजकीय बदल कसा घडला?
FAQs(संबंधित प्रश्न)
नेपाळमध्ये का सुरु होते आंदोलन?
नेपाळमध्ये ओली सरकारच्या सोशल मीडियावरील बंदी, भ्रष्टाचार, नेपोटिझम आणि देशातील बेरोजगारी या सर्व कारणांमुळे तरुणांनी आंदोलन छेडले होते.
नेपाळच्या अंतरिम सरकारची सूत्रे कोणी हाती घेतली?
नेपाळच्या अंतरिम सरकारची सूत्रे माजी पहिल्या महिला सर न्यायाधीश सुशीला कार्की यांनी घेतली आहेत. १२ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ ग्रहण केली.
पंतप्रधान मोदींनी कोणाचे केले अभिनंदन?
भारतीय पंतप्रधान मोदींनी नेपाळच्या पहिला महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेणाऱ्या सुशाली कार्की यांचे अभिनंदन केले.