Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nepal Protest : राजेशाही दार ठोठावते! कम्युनिस्ट राजवट संपते…नेपाळमध्ये ‘हिंदू राष्ट्रा’चा आवाज होतोय तीव्र

Nepal Protest: नेपाळमधील अलिकडच्या राजकीय बदलांनंतर, राजेशाही समर्थकांची पकड अधिक मजबूत होताना दिसत आहे. बालेंद्र शाह आणि सुदान गुरुंग सारख्या नेत्यांच्या नेतृत्वाखालील या चळवळीला जनतेचा व्यापक पाठिंबा मिळाला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 10, 2025 | 11:38 AM
nepal monarchy rises hindu rashtra voice grows

nepal monarchy rises hindu rashtra voice grows

Follow Us
Close
Follow Us:
  • नेपाळमध्ये राजेशाही समर्थकांची चळवळ जोर धरते; कम्युनिस्ट सरकारविरुद्ध तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

  • महापौर बालेंद्र शाह आणि सुदान गुरुंग यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला जनतेचा वाढता पाठिंबा.

  • हिंदू राष्ट्राचा आवाज तीव्र होताना; राजेशाही पुनर्स्थापनेसाठी रस्त्यावर उतरले हजारो आंदोलक.

GenZ Protest Nepal : काठमांडूच्या रस्त्यांवर अलीकडेच एक वेगळं दृश्य पाहायला मिळालं. हातात झेंडे, छातीठोक घोषणाबाजी आणि तरुणाईची प्रचंड उसळणारी ऊर्जा  हे सर्व एखाद्या नव्या पर्वाची चाहूल देत आहे. नेपाळच्या राजकारणात घडणाऱ्या या बदलांनी केवळ सत्ता समीकरणेच ढवळून काढली नाहीत, तर नेपाळच्या भविष्यातील ओळख कशी असेल, याविषयीही नवी चर्चा सुरू केली आहे.

 राजेशाही समर्थकांचा वाढता प्रभाव

नेपाळमध्ये सरकार कोसळल्यानंतर तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ८-९ सप्टेंबरच्या घटना या प्रत्यक्षात मार्च २०२५ मधील राजेशाही समर्थक निदर्शनांचीच परंपरा आहेत. ९ मार्च रोजी हजारो लोकांनी राजधानीत मोठे आंदोलन केले होते. त्या आंदोलनाला “हॅक्टिविझम ऑफ नेपाळ” असे नाव देण्यात आले. या चळवळीचे स्वरूप अमेरिकेतील “ऑक्युपाय वॉल स्ट्रीट” प्रमाणे होते. तेथे अमेरिकेत लोक भांडवलशाहीविरुद्ध उभे राहिले होते; तर नेपाळमध्ये जनता भ्रष्टाचार, सत्तेतील असमानता आणि कम्युनिस्ट धोरणांविरुद्ध उठली. नेपाळी जनतेच्या नजरेत राजेशाही आता फक्त इतिहास नसून भविष्याची शक्यता म्हणून आकार घेत आहे.

हे देखील वाचा : World Suicide Prevention Day : नैराश्य हे आत्महत्येचे एक प्रमुख कारण, किशोरवयीन मुलांमध्ये ‘या’ लक्षणांसह ते ओळखा

 बालेंद्र शाह आणि सुदान गुरुंग यांचे नेतृत्व

काठमांडूचे महापौर बालेंद्र शाह आणि नेते सुदान गुरुंग यांनी या आंदोलनाला उर्जा दिली. मैथिली वंशाच्या मधेशी समुदायातून येणारे शाह, राजेशाही आणि हिंदू राष्ट्राच्या विचारसरणीचे प्रखर समर्थक मानले जातात. त्यांच्या नेतृत्वाने आंदोलनाला केवळ स्थानिकच नाही तर राष्ट्रीय पातळीवरही मोठे रूप दिले. ८ सप्टेंबर रोजी दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. एकीकडे ओली सरकारने संविधानात सुधारणा करून सलग दोन वेळा पंतप्रधानपदाचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला; तर दुसरीकडे सुदान गुरुंग यांनी आंदोलनाची औपचारिक सुरुवात जाहीर केली. त्यांनी शालेय गणवेशातील विद्यार्थ्यांपासून तरुण कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांना रस्त्यावर उतरवले.

 तरुणाईची नवी शक्ती

गुरुंग यांच्या आवाहनानंतर तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत आहे. आंदोलक हातात पुस्तके, झेंडे आणि घोषवाक्यांसह सरकारविरुद्ध एकत्र आले. त्यांच्या डोळ्यातील आशा स्पष्ट दिसते  “नवे नेपाळ, राजेशाही नेपाळ, हिंदू राष्ट्र नेपाळ!”

 संविधान आणि राजा ज्ञानेंद्र यांचा संभाव्य रोल

९ सप्टेंबर रोजी ओली यांच्या तीन दिवसांच्या बैठकीतील दुसरा दिवस निर्णायक ठरला. निदर्शकांनी सत्ता संतुलन ढवळून काढले आणि आता समीकरण राजेशाहीकडे झुकत असल्याचे चित्र स्पष्ट झाले. तज्ज्ञांच्या मते, पुढील काळात संविधान आणि राजा ज्ञानेंद्र यांच्या एकत्रित भूमिकेमुळे देशाच्या राजकीय दिशेला नवा कलाटणी मिळू शकतो.

 कम्युनिस्ट राजवटीची पडझड?

कम्युनिस्ट राजवटीला गेल्या काही वर्षांत जनतेचा पाठिंबा होता, मात्र भ्रष्टाचार आणि असंतोषामुळे आता ती पकड सैल होत आहे. लोकशाहीची आशा घेऊन सुरु झालेल्या प्रवासाने जनता नाराज झाली आहे. म्हणूनच जनतेला राजेशाहीत एक नवा आधार, नवी ओळख आणि नवा आत्मसन्मान दिसतो आहे.

हे देखील वाचा : Balen Shah : नेपाळमधील Gen-Z विद्रोहामागे संशयाची सुई ‘या’ व्यक्तीवर; जाणून घ्या काय आहे यामागचं खरं राजकारण?

ओळखीचा शोध

नेपाळमधील राजकीय उलथापालथ केवळ एक ‘आंदोलन’ राहिलेली नाही. ती आता ओळखीचा शोध बनली आहे. लोकशाहीच्या अपयशातून बाहेर पडत नेपाळ पुन्हा राजेशाही आणि हिंदू राष्ट्रवादाकडे वळतोय का? हा प्रश्न पुढील काळात दक्षिण आशियाच्या राजकारणासाठीही महत्त्वाचा ठरणार आहे.

Web Title: Nepal monarchy rises hindu rashtra voice grows

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2025 | 11:38 AM

Topics:  

  • International Political news
  • nepal
  • Protester
  • Student Protest

संबंधित बातम्या

नेपाळ एअरपोर्ट झाला बंद! विरोधानंतर सर्व फ्लाईट्स केल्या रद्द, प्रवासी कसे परतनार घरी? सर्व डिटेल्स जाणून घ्या
1

नेपाळ एअरपोर्ट झाला बंद! विरोधानंतर सर्व फ्लाईट्स केल्या रद्द, प्रवासी कसे परतनार घरी? सर्व डिटेल्स जाणून घ्या

Nepal Violence: नेपाळमधील ४८ तासांच्या हिंसाचारानंतर नेपाळ लष्कराच्या हाती देशाची कमान; गेल्या दोन दिवसांत काय काय घडलं?
2

Nepal Violence: नेपाळमधील ४८ तासांच्या हिंसाचारानंतर नेपाळ लष्कराच्या हाती देशाची कमान; गेल्या दोन दिवसांत काय काय घडलं?

Indigo Flight: नेपाळमध्ये झालेल्या मोठ्या हिंसाचारामुळे काठमांडूला जाणारी आणि येणारी इंडिगोची सर्व उड्डाणे रद्द, जाणून घ्या
3

Indigo Flight: नेपाळमध्ये झालेल्या मोठ्या हिंसाचारामुळे काठमांडूला जाणारी आणि येणारी इंडिगोची सर्व उड्डाणे रद्द, जाणून घ्या

Nepal Political Crisis : पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्यानंतर, आता नेपाळची सूत्रे कोणाच्या हाती? ही नावे आली समोर, जाणून घ्या
4

Nepal Political Crisis : पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्यानंतर, आता नेपाळची सूत्रे कोणाच्या हाती? ही नावे आली समोर, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.